Women Health Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Working Women: 'या' शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांनो सावधान, होऊ शकतो जीवघेणा आजार

Women Health Tips: शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी महत्वाची बातमी आहे. नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना दम्यासारखा गंभीर आजार होत आहे. एका संशोधनातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

Priya More

पुरूषांप्रमाणे महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिला चूल आणि मुल यातून बाहेर पडून सध्या पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. पुरूषांप्रमाणे त्या सर्वच शिफ्टमध्ये काम करतात. मग ती मॉर्निग शिफ्ट असो, जनरल शिफ्ट असो, सेकंड शिफ्ट असो किंवा नाईट शिफ्ट असो. पण या नाईट शिफ्टमुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. दिवसा काम करणाऱ्या महिलांपेक्षा नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना दम्याचा धोका असतो. एका नवीन अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.

नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये दम्याचा त्रास असल्याचे आढळून आले आहे. पण रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना दिवसा काम करणाऱ्या महिलांपेक्षा दम्याचा धोका जास्त असतो. २,७४,५४१ लोकांचा समावेश असलेला हा अभ्यास ERJ ओपन रिसर्चमध्ये प्रकाशित झाला आहे. दिवसा किंवा रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या पुरुषांमध्ये दम्याची समस्या आडळून आली नाही. अभ्यासात असे आढळून आले की, फक्त रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना दिवसाच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांपेक्षा मध्यम किंवा गंभीर दम्याचा धोका जवळपास ५० टक्के जास्त असतो. युकेच्या मँचेस्टर विद्यापीठाचे डॉ. रॉबर्ट मेडस्टोन यांनी सांगितले की, 'पुरुषांपेक्षा महिलांमध्ये दम्याचा परिणाम जास्त तीव्र असतो. दम्यामुळे महिलांचे रुग्णालयात दाखल होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण देखील जास्त असते.'

शिफ्टमध्ये काम आणि दम्यामधील लिंग-आधारित फरक तपासणारा हा पहिला अभ्यास आहे. संशोधकांना हे संशोधन करत असताना असे आढळून आले की, ५.३ टक्के लोकांना दमा होता. त्यापैकी १.९ टक्के लोकांना मध्यम किंवा गंभीर दमा होता. म्हणजेच ते दम्याची औषधे आणि इनहेलर घेत होते. रात्रीच्या शिफ्ट आणि दमा यांच्यात संबंध का आहे? हे संशोधनात स्पष्ट करण्यात आले नाही, परंतु संशोधकांचे म्हणणे आहे की ते बॉडी क्लॉकमधील गडबडीमुळे असू शकते. ज्यामुळे पुरुष आणि महिला संप्रेरकांच्या पातळीवर परिणाम होतो.

पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची उच्च पातळी दम्यापासून संरक्षण प्रदान करते, जे महिलांमध्ये कमी असते. याशिवाय पुरुष आणि महिला वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतात, जे एक कारण असू शकते. डॉ. मेडस्टोन यांनी सांगितले की, 'रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये एचआरटी दम्यापासून संरक्षण करू शकते. पण यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे.' हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी न घेतलेल्या पोस्टमेनोपॉझल महिलांमध्ये दम्याचा धोका जास्त असल्याचे आढळून आले. दिवसा काम करणाऱ्या महिलांच्या तुलनेत रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या अशा महिलांमध्ये दम्याचा धोका दुप्पट होता. आता ते सेक्स हार्मोन्स आणि शिफ्ट वर्क आणि दम्यामध्ये काही संबंध आहे का? हे शोधण्याचा प्लान आखला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT