Crime
Crime Saam tv

Spa Centre: मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय, पोलिसांकडून भंडाफोड; १० महिला अन् ३ पुरूष ताब्यात

Shocking Crime News: छत्तीसगडच्या भिलाई शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पा सेंटरच्या आडून चालवल्या जात असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड करत पोलिसांनी छापा टाकून १० महिला आणि ३ पुरुषांना ताब्यात घेतलं आहे.
Published on

छत्तीसगडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी छापा टाकून १० महिला आणि ३ पुरूषांना ताब्यात घेतलं आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक आक्षेपार्ह साहित्य, रजिस्टर आणि पुरावे देखील जप्त केले आहेत. सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून, या घटनेची माहिती पसरताच खळबळ उडाली आहे.

छत्तीसगडमधील भिलाई शहरातील स्मृती नगर येथील सुर्या मॉलमध्ये पोलिसांनी छापा टाकला. तेव्हा पोलिसांना स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालू असल्याची माहिती उघडकीस आली. पोलिसांना ३ स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली. उर्वरित ५ मध्ये पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत.

Crime
Shocking: किराणा दुकानात प्रेम जुळलं, अवैध संबंधासाठी पतीचा काटा काढला; २ लाखांत पत्नीनं रचला रक्तरंजित खेळ

पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलं आहे. तसेच स्पा सेंटरमध्ये उपस्थित असलेल्या ग्राहकांनाही ताब्यात घेतलं आहे. सर्वांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेलं आहे.

एएसपी पद्मश्री तंवर म्हणाले की, रात्रीच्या वेळी पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला. अजून काही तपासातून निष्पन्न होतंय का, हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. भविष्यातही अशा केद्रांवर लक्ष ठेवले जाईल. सध्या ताब्यात घेतलेल्या मुली आणि पुरूषांची चौकशी सुरू आहे.

Crime
Maharashtra Politics: बडगुजर पक्षप्रवेशासाठी मुंबईकडे रवाना; भाजपच्या दिग्गज नेत्याच्या प्रतिक्रियेनंतर सस्पेन्स वाढला

शेकडो मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीला दहिसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इंस्टाग्रामवरून महिला आणि मुलींसोबत मैत्री करून नंतर त्यांचा लैंगिक छळ करणाऱ्या एका विकृत आरोपीला दहिसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ए आय तंत्राद्वारे तयार केलेल्या अश्लील फोटोंचा वापर करून तो मुलींना धमकावून त्यांच्याशी अश्लील संभाषण आणि न्यूड व्हिडिओ कॉल करून त्यांना ब्लॅकमेलिंग करत होता. अशा शेकडो मुलींचा लैंगिक छळ झाल्याचा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर दहिसर पोलिसांनी विकृताला कर्नाटक येथून अटक केली आहे. शुभम कुमार मनोज प्रसाद सिंग (वय वर्ष २५) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून, तो सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com