Shocking: किराणा दुकानात प्रेम जुळलं, अवैध संबंधासाठी पतीचा काटा काढला; २ लाखांत पत्नीनं रचला रक्तरंजित खेळ

Wife Killed Husband Crime News: अलवर जिल्ह्यातील खेडली येथे पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा गळा आवळून खून; २ लाखांची दिली सुपारी. परिसरात खळबळ
Crime News
Wife Killed husband with help of lover and contract killers in Alwar RajasthanSaam TV News
Published On

अवैध संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली आहे. पतीचा काटा काढण्यासाठी तिने मारेकऱ्यांना २ लाख रूपये दिले होते. ही धक्कादायक घटना राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील खेडली पोलीस स्टेशन परिसरात घडली असून, पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

अनिता राज आणि काशी असे आरोपींची नावे आहेत. मृत व्यक्तीची पत्नी अनिता राज हिचे किराणाचे दुकान आहे. अनिता राजच्या किराणा दुकानात आरोपी रोज येत होता. तो दुकानातून सामान घ्यायचा. याच काळात अनिता आणि राज दोघांमधील मैत्री वाढली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. घरात कुणी नसताना आरोपी अनिताच्या घरी यायचा. दोघांनी संमंतीने शारिरीक संबंध ठेवलं.

Crime News
Shocking Crime: '२ हजार द्या डेडबॉडी गुंडाळतो'; मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा लाचखोर सीसीटीव्हीत कैद

या सगळ्यात प्रेयसीचा नवरा म्हणजेच वीरू जाटव प्रेमात अडथळा ठरत होता. यामुळे दोघांनी मिळून पतीचा काटा काढण्याचा प्लॅन रचला. ८ जून रोजी त्यांनी प्लॅन अंमलात आणण्याचं ठरवलं. पतीचा काटा काढण्यासाठी त्यांनी चार सराईत गुन्हेगारांना बोलावून घेतलं. यासाठी त्यांनी मारेकऱ्यांना २ लाख रूपये दिले. प्लॅननुसार, पत्नीने आधी पतीला दारू पाजली. नंतर वीरू झोपला. त्यानंतर त्याचा गळा आवळून खून केला. नंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

Crime News
Politics: मोठा राजकीय भूकंप! काँग्रेसमधील बडा नेता अजित पवार गटाच्या गळाला लागला; ११ हजार कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश

याची माहिती मृत व्यक्तीच्या घरच्यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मृत वीरूच्या भावाने यासंदर्भात आरोपींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून पत्नी अनिता राज, प्रियकर काशी आणि कॉन्ट्रॅक्ट किलर विश्वेंद्र जाटव या तिघांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com