Health Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Health Tips: आरोग्याची काळजी घ्या! पावसाळ्यात मूत्रसंसर्गामध्ये वाढ, डॉक्टरांनी दिला सल्ला

Health Care Tips: सध्या राज्यभर पावसाचे दरमदार आगमन झालेले आहे. पावसासोबत अनेक आरोग्याच्या समस्याही व्यक्तीला होतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळ्यात मूत्रमार्गाचे संक्रमण (UTIs) आणि योनीमार्गाचे संक्रमणात वाढ होत असल्याचे दिसून येते. पावसाळ्यात केवळ जठरासंबंधी समस्याच उद्भवत नाहीत तर मूत्रमार्गाचे संक्रमण (यूटीआय) आणि योनीमार्गासंबंधीत संक्रमण देखील उद्भवते. हवेत असणारा ओलसरपणा आणि आर्द्रता हे सर्व घटक जीवाणू वाढीसाठी अतिशय अनुकूल वातावरण निर्माण करते. ज्यामुळे यूटीआय संसर्गाची शक्यता वाढते.

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा युटीआय (UTI) अर्थात मूत्रमार्गाला होणारा विषाणू संसर्ग मूत्रमार्ग प्रणालीमधील मूत्रपिंड (किडनी), मूत्राशय (ब्लॅडर) आणि मूत्रमार्ग (युरेथ्रा) यापैकी कोणत्याही भागाला होऊ शकतो. लघवी सहसा निर्जंतुक असते.मात्र विषाणू मूत्रमार्गात प्रवेश करतात आणि तिथेच वाढतात. या सर्वांमुळे वारंवार लघवी होणे तसेत लघवी होताना वेदना होणी तसेच ओटीपोटाक वेदना असे काही दुर्मिळलक्षणे दिसून येतात.

पुरुषांच्या तुलनेत महिलांना या संसर्गाचा धोका अधिक असतो. मोठ्या संख्येने महिलांना वारंवार युटीआयचा त्रास होऊ शकतो ज्यामुळे त्यांची मानसिक शांतता हिरावली जाते. पावसाळ्यामुळे महिलांमध्ये रोगप्रतिकारक (Immunity)शक्ती कमी होते आणि त्यांना यूटीआय संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.

अस्वच्छता, घट्ट तसेच सिंथेटिक पॅंटीजचा वापर, रसायनांनीयुक्त उत्पादनांचा वापर करणे हे युटीआय समस्येला आमंत्रण (invitation)देऊ शकते.शौचालयाचा वापर केल्यावर स्त्रिया मागून पुढच्या बाजूस पुसतात तेव्हा आतड्यातील जीवाणू मूत्रमार्गात पसरतात. पावसाळ्यात यूटीआय संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया लीलावती हॉस्पिटलच्या वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ किरण कोएल्हो यांनी स्पष्ट केले.

यूटीआय आणि इतर योनीमार्गाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी, पुरेसे पाणी (Water)पिऊन शरीर हायड्रेटेड राखणे तसेच लघवी रोखून न धरणे आणि मूत्राशय रिकामे करण्याचा प्रयत्न करा, सैल आणि सुती अंतर्वस्त्र वापरा, योनीमार्गाची चांगली स्वच्छता राखा, डाऊचिंग किंवा मागून पुढच्या दिशेने पुसणे टाळा.

या नाजूक भागात रसायनिक उत्पादनांचा वापर टाळा. प्रोबायोटिक्स खाऊ नका, ओले किंवा घामाचे कपडे ताबडतोब बदला आणि सार्वजनिक स्वच्छतागृहे वापरताना काळजी घ्या. प्रत्येक 4-5 तासांनंतर सॅनिटरी पॅड आणि टॅम्पन्स न चुकता बदला आणि योनिमार्गाची जागा धुतल्यानंतर ती कोरडी करायला विसरु नका.

आम्लयुक्त पदार्थ आणि पेयांचे सेवन टाळा जसे की चहा, कॉफी आणि सोडा ज्यामुळे मूत्राशयाची जळजळ होते. पावसाळ्यात प्युबिक क्षेत्रावरील केस काढणे हे देखील धोकादायक असू शकते कारण यामुळे एखाद्याला योनीमार्गाच्या संसर्गाचा त्रास होऊ शकतो असेही डॉ (Doctor)किरण कोएल्हो यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT