Nashik : जिल्हाधिकाऱ्यांचं व्हॉट्सअॅप पुन्हा हॅक! महसूल अधिकाऱ्यांना खटाखट मेसेज, प्रत्येकाकडे ३० हजारांची मागणी

Nashik Collector Ayush Prasad News : नाशिकमध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप अकाउंट तयार करून महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडे ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
Nashik Collector Ayush Prasad News
Nashik Collector Ayush Prasad News AI Image
Published On: 

अभिजित सोनावणे, नाशिक

नाशिकमध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप अकाउंट तयार करून महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडे पैशांची मागणी करण्यात आली. या प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट व्हॉट्सअॅप अकाउंटवरून महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांना मेसेज पाठवण्यात आले. या मेसेजमध्ये ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असतानाच एकाच वेळी अनेक अधिकाऱ्यांना अशा प्रकारचे मेसेज आले. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र, मेसेजची सत्यता तपासल्यानंतर हा जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने करण्यात आलेला फसवणुकीचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले.

Nashik Collector Ayush Prasad News
Gold Rate Today : लग्नसराईच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ; १ तोळ्याची किंमत काय? वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करून फसवणूक करण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. याआधीही १५ सप्टेंबर रोजी थायलंडच्या एका मोबाईल नंबरवरून जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पद आणि अधिकृत फोटो वापरून नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्याच नावाने बनावट अकाउंट तयार करून पैसे मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Nashik Collector Ayush Prasad News
Shirdi Vande Bharat : रेल्वेचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातली पहिली वंदे भारत एक्स्प्रेस 'या' स्थानकावरही थांबणार, कोणाला होणार फायदा?

या घटनेनंतर प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्यात आली असून, फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सरकारी अधिकारी किंवा वरिष्ठांच्या नावाने व्हॉट्सअॅपवर पैशांची मागणी करणारे मेसेज आल्यास त्यांची खातरजमा केल्याशिवाय कोणतीही रक्कम पाठवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.