Monsoon Health Tips Saam tv
लाईफस्टाईल

Monsoon Health Tips : मुसळधार पावसात फक्कड चहा हवाच! पण 'या' चुका केल्यास आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Tea During Rainy Season : चहाचे सेवन करत असताना नकळत आपल्याकडून काही चूका होतात आणि आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम जाणवतात. त्यामुळे आज याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

मुसळधार पाऊस सुरू होताच वातावरणात गारावा पसरतो. पावसामुळे आपल्याला गरमागरम काही तरी खावं किंवा प्यावं असं वाटतं. त्यात फक्कड चहा तर प्रत्येकाचा ठरलेला असतो. चहामुळे सर्दी-खोकला अशा समस्या दूर होतात. मात्र चहा पिण्याची एक पद्धत असते. चहाचे सेवन करत असताना नकळत आपल्याकडून काही चूका होतात आणि आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम जाणवतात. त्यामुळे आज याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

रिकाम्यापोटी चहाचं सेवन

सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी काही व्यक्ती चहा पितात. मात्र अशा पद्धतीने चहाचे सेवन करणे चूक आहे. त्यामुळे तुम्हाला छातीत जळजळ होणे, गॅस, अॅसिडीटी यासह सतत अंबट ढेकर येणे अशा समस्या जाणवतात. या समस्यांपासून स्वताचा बचाव करण्यासाठी आजपासूनच सकाळी सकाळी रिकाम्यापोटी चहा पिण्याची सवय बंद करा.

जास्त मसाले

काही व्यक्ती चहाची चव वाढावी यासाठी त्यामध्ये दालचीनी, अद्रक, लवंग असे मसाले मिक्स करतात. या मसाल्यांनी चहाला चव वाढते, मात्र त्याचा आपल्या आरोग्यावर वेगळाच परिणाम होतो. दूधाच्या चहामध्ये हे मसाले आल्याने वात, पित्त आणि कफ यासमस्या जास्त वाढतात.

चहा जास्त वेळ उकळणे

चहाला जितकं जास्त उकळं जाईल तितकं जास्त कॅफेन यामध्ये तयार होतं. पावसाळ्यात प्रत्येकाला कडक चहा हवा असतो. त्यामुळे बरेच जण जास्त वेळ चहा उकळवतात. तु्म्ही देखील अशा पद्धतीने चहा उकळवत असाल तर आजच हे बंद करा. कारण त्याने आपली पचन क्षमता बिघडते शिवाय डोकेदुखी आणि झोपेवर सुद्धा परिणाम होतो.

जेवणानंतर चहा

थंडी वाजत असेल तर व्यक्ती जेवणानंतर सुद्धा चहा पितात. मात्र जेवणानंतर चहा प्यायल्याने पचन क्षमता बिघडते. शिवाय आपल्याला विविध पदार्थांतून मिळणारे पोषक तत्व आणि प्रोटीन हवे तसे मिळत नाहीत.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT