Shreya Maskar
अनेकांना चहा प्यायला खूप आवडते. पण चहाचे अतिसेवन आरोग्यास घातक ठरते.
लोक शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी सायंकाळी चहा आवर्जून पितात.
पण शरीराच्या या समस्या असलेल्या लोकांनी संध्याकाळी चहा पिऊ नये.
ज्या लोकांना रात्री झोप येत नसेल त्यांनी संध्याकाळी चहा पिणे टाळावे.
वाताचा त्रास असलेल्या लोकांनी चहा पिऊ नये.
संध्याकाळी चहा प्यायल्याने वजन वाढते. त्यामुळे लठ्ठ लोकांनी चहा पिऊ नये.
ज्या लोकांना कमी भूक लागते त्यांनी संध्याकाळचा चहा सोडावा.
वारंवार ॲसिडीटीची समस्या असलेल्या लोकांनी सायंकाळी चहा पिऊ नये.
सतत केस गळती होत असल्यास संध्याकाळी चहा पिऊ नये.
सायंकाळी चहा प्यायल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्यांचे प्रमाण वाढते.
ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.