Menstrual Cycle Canva
लाईफस्टाईल

पालकांनो! मासिक पाळीविषयी मुलींशी बोलतात पण मुलांशी बोलता का? कशी द्याल माहिती

Menstrual Cycle Knowledge: मासिकपाळी हा मुलीसाठी खूप महत्वाचा विषय आहे. मासिकपाळी या विषयावर बोलतांना पालकांनी मुलांना सुद्धा माहिती सांगणे महत्त्वाचे आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मासिकपाळी हा मुलीसाठी खूप महत्वाचा विषय आहे. मासिकपाळी या विषयावर बोलतांना पालकांनी मुलांना सुद्धा माहिती सांगणे महत्त्वाचे आहे. बदलत्या वातावरणामुळे आणि पारंपारिक पद्धती मागे सोडून लोकांचा मासिकपाळीकडे बघण्याचा दृष्टीकोन हा बदलत चालला आहे. परंतु मुलांना या संदर्भात अधिक माहिती नसते. मुलं मोठी होत असताना त्यांना मासिक पाळी म्हणजे काय याबद्दल माहितीच नसते. त्यामुळे मुलांचा पाळीकडे बघण्याचा दृष्टिकोन चूकीचा ठरत असतो. मासिकपाळीचे अनेक गैरसमज आणि चुकीचे माहिती मुलांना असते. त्यामुळे मासिककाळात मुलं मुलींवर हसतात. त्यांची मस्करी करतात. यामुळे मासिकपाळी म्हणजे काय आणि त्या विषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी मुलांना त्या विषयी माहिता देणे महत्त्वाचे ठरते.

मासिकपाळी म्हणजे काय

मुली वयाने मोठी होत असताना मुलीच्या शरीरात बदल घडत असतात. त्याचाच भाग म्हणजे मासिकपाळी होय. मुली वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्त्राव होतो त्याला मासिकपाळी, असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षीची असताना मासिकपाळी सुरू होते.

मुलांमधील गैरसमज दूर करा

मासिकपाळीविषयी पालकांनी आपल्या मुलींसोबतच मुलांना माहिती देणं गरजेचे आहे. मासिकपाळीमध्ये मुलींना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो त्यामुळे मुली अशक्त होतात. अशा काळात तिला आरामाची नितात गरज असते. कधीकाळी मासिकपाळीची तारिख मागेपुढे झाल्याने अचानक शाळेत किंवा महाविद्यालयामध्ये तिला मासिकपाळी आल्याने मुलींना अडचणींना सामोरे जावे लागते. त्याचवेळी जर शाळेतील मुलांना समजलं की, मुलीलाल मासिक पाळी आली आहे. तर ते त्यावर विनोद करतात. परंतु जर पालकांनी मुलींप्रमाणे मुलांनाही याविषयी माहिती दिली तर ते त्या मुलीला मदत करू शकतात. मासिक पाळी हा कुठला आजार नसून मुलीच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. हे माहिती असणे महत्त्वाचे ठरेल.

मासिकपाळी दरम्यान मुलींना अनेक वेदना होतात. जास्त रक्त स्राव असल्यास मुलींनी आराम केला पाहिजे. आजकालच्या चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे मुलींमध्ये पीसीओडी ही समस्या अनेकदा दिसून येते. पिसीओडी या आजारामुळे मुलींना अनियमीत पाळी येते आणि यामुळे वजन वाढणे, लठ्ठपणा, अनेक शारीरीक आणि मानसीक आजार होण्याची शक्यता आहे. पिसीओडीचा त्रास असल्यास आहारात प्रोटीन आणि पोषक घटकांचा समावेश करा. तसेच नियमित व्यायम आणि योगा केल्यामुळे पाळी वेळेवर येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! मुंडकं छाटलं अन् प्रायव्हेट पार्ट कापला; शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

SCROLL FOR NEXT