Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शनिवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्रातील दिपोउत्सोव, राज्यातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

जळगाव विमानतळाच्या व्यवस्थापन समितीला मुहूर्त सापडेना

जळगाव विमानतळाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्राधिकरण व्यवस्थापन समितीची बैठक ८ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून झालेली नाही. या समितीच्या अध्यक्षपदी खासदार स्मिता वाघ असून, बैठक झालेली नसल्यामुळे विमानतळाशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय प्रलंबितच राहिले आहेत. परिणामी, प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, विमानतळ विस्तारीकरण, टर्मिनल इमारत आणि ॲप्रानसारख्या तांत्रिक बाबी मार्गी लागण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. विमानतळाच्या व्यवस्थापनासाठी ही समिती महत्त्वाची असून, तिच्या बैठकीतूनच धोरणात्मक निर्णय घेतले जातात. मात्र गेल्या आठ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून बैठक न झाल्यामुळे विमानतळाच्या विकास कामाचा प्रस्तावाचा पाठपुरावा तसेच अन्य सुविधा चर्चा यामुळे झालेली नाही

अमरावती जिल्ह्यात दिवाळी आली तरी 35 टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच

शासनाने दिवाळीपूर्वी अस्थिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल अशी हमी दिली होती. परंतु अमरावती जिल्ह्यात दिवाळी तोंडावर आली तरी आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांपैकी 35 टक्के शेतकरी अजूनही मदती पासून वंचित आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनातर्फे सर्व शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडे पाठविण्यात आल्या परंतु संचालित केल्या जाणाऱ्या थेट वितरण प्रणालीवर ताण आल्याने शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित राहिले आहे. जून ते सप्टेंबर या काळात अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झाले. यापैकी जून ते ऑगस्ट दरम्यान नुकसान झालेल्या 1 लाख 70 हजार 773 शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यामध्ये शासनाने त्यांच्यासाठी 111 कोटी 47 लाख 22 हजार रुपयाची तरतूद केली, परंतु अद्याप ती सर्वांपर्यंत पोहोचली नाही आता पर्यंत 1 लाख 13 हजार 131 शेतकऱ्यांनाच 72 कोटी 62 लाख 72 हजार रुपयांचे मिळाली तर इतर शेतकऱ्यांचे 38 कोटी 84 लाख 56 हजार रुपये अद्यापही वितरित व्हायचे आहे.

निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

प्रोटेक्शन मनी च्या नावाखाली खंडणी मागितल्याचे आणि स्वीकारल्याचे गुन्हे

या १० पैकी ८ गुन्हे कोथरूड पोलीस ठाण्यात तर वारजे आणि सिंहगड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल

कोथरूड मध्ये १७ सप्टेंबर रोजी झालेल्या गोळीबारात गायवळ वर मोक्का दाखल

निलेश घायवळ याच्यावर दाखल असलेले एकूण १० गुन्हे

१. १७ सप्टेंबर रोजी रात्री कोथरूड परिसरात गायवळ टोळीकडून गोळीबार

२. त्याच दिवशी टोळीतील सदस्यांकडून एका तरुणावर कोयत्याने हल्ला

३. निलेश गायवळ याच्या घरी आढळून आले जिवंत काडतुसे

४. गायवळ च्या वाहनांना बनावट नंबर प्लेट

५. पासपोर्ट बनवण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करणे

६. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांनी १० फ्लॅट नावावर करून घेतली खंडणी

७. सिम कार्ड दुसऱ्याच्या नावाने वापरणे

८. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रील्स बनवल्या प्रकरणी गुन्हा

९. मुसा शेख नावाच्या गांजा तस्करी प्रकरण गायवळ टोळीप्रमुख दाखवत गुन्हा

१०. एका कंपनी कडून ४५ लाख रुपयांची खंडणी वसूली प्रकरण

बारावीचा अर्ज भरण्याला मुदतवाढ; ३ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना संधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळमार्फत २०२६ मध्ये होणाऱ्या बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे

नियमित विद्यार्थ्यांना २१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत

तसेच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शुल्क भरण्यासाठी ७ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे

पुनर्परीक्षार्थी आणि खासगी विद्यार्थ्यांनाही या कालावधीत अर्ज करता येणार

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी चालवली रिक्षा...

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी चक्क रिक्षा चालवली.एका ठिकाणी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेलेले असताना तिथे रिक्षा मालकाने मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना रिक्षा चालवण्याचा आग्रह केला मग काय शिवेंद्रसिंहराजेंनी देखील रिक्षाचा ड्रायव्हिंग सीटवर बसून रिक्षा चालवली. या रिक्षा मालकाने रिक्षा चांगल्या पद्धतीने मॉडीफाय केली होती त्यामुळे त्याने शिवेंद्रसिंहराजे यांना रिक्षा चालवण्याचा आग्रह केला होता.

अतिवृष्टीच्या पावसातून वाचलेली फुलशेती दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना फायद्याची ठरली

वाशिम जिल्ह्यात अति पावसामुळे खरिपाच्या पिकांसह फुलशेतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. मात्र यातून वाचलेली फुलशेती दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना फायद्याची ठरली आहे. झेंडूच्या फुलांना ठोक मध्ये 25 ते 30 रुपये किलो भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात 35 ते 40 रुपये प्रति किलोला झेंडूच्या फुलाला भाव मिळत असल्याने उरलेल्या फुलशेतीतून शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळाल्याच बघायला मिळालं.

धनत्रयोदशी निमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

आज दीपावलीतील महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी.... धनत्रयोदशी निमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा बांधण्यात आली. ही पुजा आशुतोष कुलकर्णी, सचिन गोटखिंडीकर ,श्रीनिवास जोशी यांनी बांधली ... धन्वंतरी रूपातील अंबाबाई देवीची ही पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

डोंबिवलीत दिपोत्सवाच्या निमित्ताने मनसे-शिवसेना ठाकरे गट हम साथ साथ है

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली शहरातील फडके रोड परिसर रोषणाईने उजळला आहे. मराठी एकतेचा संदेश देणाऱ्या या उजळत्या सोहळ्यात यंदा एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. कारण मनसेच्या पारंपरिक ‘दिपोत्सव २०२५’ या कार्यक्रमाचे उद्घाटन यंदा शिवसेना उबाठाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले.

‘हम साथ साथ है’ या भावनेने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येत दिव्यांच्या प्रकाशात ऐक्याचा संदेश देत होते. या अनोख्या उपक्रमाने डोंबिवलीकरांमध्ये उत्सुकता आणि कौतुकाची लाट पसरली आहे.

डोंबिवलीकरांनी अनुभवला शिवराज्यभिषेक सोहळा

डोंबिवली पश्चिमेत देवी चौक गावदेवी मंदिराच्या आवारात जाणता राजा प्रतिष्ठान च्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे जागर शिवबाच्या नावानं या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात डोंबिवलीकरांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला . दिवाळीच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मल्लखांब,लाठीकाठी प्रात्यक्षिक , ढोल ताशा पथक मानवंदना तसेच युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट भारतातील किल्ल्यांचे मिनीएचर प्रदर्शन पर आधारित महाराष्ट्रातील आगळावेगळा विद्युत रोषणाई ,ध्वनी प्रणालीचा माहितीपट सादर करण्यात आला . शेकडो डोंबिवलीकरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

दिवाळीची गर्दी, उत्साह आणि विद्युत रोषणाईचा झगमगाटाचं

अकोल्यात दिवाळीचा उत्साह आता शिगेला पोहोचलाय. अकोलेकरांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत गर्दी केलीये. गेल्या तीन दिवसांपासून अकोल्याची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या गांधी रोडवर मोठी गर्दी पाहायला मिळतीये. अकोल्यातील दिवाळीची गर्दी, उत्साह आणि विद्युत रोषणाईच्या झगमगाटाचं विहंगम दृष्य

761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा अजित पवार करणार शुभारंभ

मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवारी सायंकाळी पाच वाजता लिहिला जाणार... तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. तसेच या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त 761 कोटी 17 लाख रुपयांच्या भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभही अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली..

अकोल्यात किल्ले तयार करण्याची स्पर्धा

अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिवाळीनिमित्त किल्ले बनवा स्पर्धा घेतलीये. खासदार सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या स्पर्धेचे आयोजन केलंय. मिटकरी यांच्या आरोग्यनगर भागातील निवासस्थान परिसरात ही स्पर्धा घेण्यात आलीय. या स्पर्धेत 200 च्या वर मुलांनी भाग घेतलाय. या स्पर्धेत एकूण 34 किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्यात आल्यात. महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ल्यांच्या अनेक प्रतिकृती यावेळी विद्यार्थ्यांनी साकारल्यात. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देत त्यांचा सन्मान करण्यात आलाय. ‌

आपण दिवाळी साजरी करतोय काही ठिकाणी आनंद आहे काही ठिकाणी पूर्व परिस्थिती आहे शेतकरी अडचणीत आहे परंतु शेतकऱ्याला सरकारने त्यांची दिवाळी काळी होणार नाही याची काळजी घेतली आहे शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याचे काम सरकारने केला आहे आणि म्हणून शेतकरी संकटातून सावरतोय शेतकऱ्यांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा देतोय त्यांच्या देखील आयुष्यामध्ये ही दिवाळी चांगले दिवस घेऊन येऊ दे त्यांचं दुःख संकट दूर हो
एकनाथ शिंदे

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

कोरोना काळात मर्जी विरुध्द अॅडमीट करुन घेणे त्या ठिकाणी रुग्णाच्या देविदास धोका होईल याची माहिती असताना सुधा अतिरिक्त जास्तीचा औषधाचा ढोस देऊन जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य करणे, अवाजवी अवास्तव बिल रक्क आकारणे, शरीराचे अवयवाची तस्करी व पुरावे नष्ठ करण्याच्या उद्देशाने करण्याचे उददेशश प्रेताची परस्पर विल्हेवाट लावणे. अशा प्रकारच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत....

डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधिर बोरकर, डॉ. मुकुंद तांदळे, डॉ. अक्षयदीप झावरे पाटील, डॉ. सचिन पांडुळे, आणि डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पीटल मधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टर अज्ञात कर्मचाऱ्यांचे गुन्ह्यामध्ये नावे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com