Dog Attack : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाचा मुलावर हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Pimpri Chinchwad News : सेक्टर 12 स्वराज्य नगरी या ठिकाणी असलेल्या बिल्डिंगमध्ये पाळीव प्राणी पाळण्यास बंदी असल्यावर देखील काही कुटुंब प्राणी प्रेमीच्या नावाखाली घरात सर्रास आक्रमक प्रजातीची श्वान आणि मांजर पाळत आहेत
Dog Attack
Dog AttackSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील सेक्टर १२ स्वराज्य नगरी या ठिकाणी पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाने केलेल्या हल्ल्यात एक चिमुकला मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जर्मन शेफर्ड श्वानाने चिमुकल्या मुलावर हल्ला करत असतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. 

रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा त्रास नेहमीच पाहण्यास मिळत असतो. मात्र पिंपरी चिंचवड शहरात एका पाळीव जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. शहरातील सेक्टर १२ स्वराज्य नगरी येथील B 14 मदनगड आणि B 15 जयगड या बिल्डिंग जवळ काही चिमुकली मूल सोसायटीच्या मोकळ्या जागेत क्रिकेट खेळत होती. याच वेळी पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाला घेऊन त्याचा मालक रस्त्याने जात होता.  

Dog Attack
Ahilyanagar Crime : धक्कादायक! खोटे रिपोर्ट बनवून चुकीचे उपचार; मृत्यूनंतर अवयवांची तस्करी, ६ डॉक्टरांवर गुन्हे दाखल

क्रिकेट खेळणाऱ्या मुलावर हल्ला 

मात्र हाताला हिसका देऊन या श्वानाने क्रिकेट खेळणाऱ्या एका चिमुकल्या मुलाकडे धाव घेतली. घाबरून मुलांनी घरात जाण्यासाठी पळ घेतला असता कुत्रा देखील मागे धावत जात त्याच्यावर अचानक हल्ला करत त्याला चावा घेतला आहे. जर्मन शेफर्ड श्वानाने चावा घेतल्याने चिमुकला मुलगा गंभीर जखमी झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व धक्कादायक प्रकार जर्मन शेफर्ड श्वानाच्या मालकासमोर घडला आहे.

Dog Attack
Pune : कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली फुलं; फुले उचलण्यासाठी नागरिकांची झुंबड!

जर्मन शेफर्ड श्वानाच्या मालकाने श्वानाच्या गळ्यातील पट्टा निष्काळजीपणामुळे सोडल्याने हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुळात सेक्टर 12 स्वराज्य नगरी या ठिकाणी असलेल्या बिल्डिंगमध्ये पाळीव प्राणी पाळण्यास बंदी असल्यावर देखील काही कुटुंब प्राणी प्रेमीच्या नावाखाली घरात सर्रास आक्रमक प्रजातीची श्वान आणि मांजर पाळत आहेत. बिल्डिंगमध्ये सदनिकेत पाळण्यात आलेले प्राण्यांचा त्रास आता तेथील नागरिकांना होऊ लागला आहे. या प्रकरणात पिंपरी चिंचवड महापालिकेने तसेच पोलीस विभागाने योग्य कायदेशीर कारवाई करून दोषीवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com