Pune : कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली फुलं; फुले उचलण्यासाठी नागरिकांची झुंबड!

Pune News : झेंडू, शेवंती, गंधराज, गुलाब या फुलांना बाजारात मोठी मागणी आहे. पुणे, शिरूर, खेड परिसरातील शेतकऱ्यांनी पहाटेपासूनच फुलतोड सुरू केली असून थेट फुलबाजारात पोहचवण्यासाठी गाड्यांची लगबग
Pune News
Pune NewsSaam tv
Published On

पुणे : दिवाळी सणांचा उत्साह घराघरात पोहचला आहे. या उत्सवाला दिवाळीच्या सणात घराघरात सजावटीसाठी फुलांची सजावट करण्यात येत असते. यामुळे गुलाम मोठी मागणी असते. मात्र यंदा पावसामुळे मोठ्या प्रमाणात फुल शेतीचे नुकसान झाले असून आता या फुलांना बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरलं. हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर फुलं फेकून दिली असून हे फुल उचलण्यासाठी नागरिकांची झुंबड पाहण्यास मिळत आहे. 

दिवाळीच्या सणात प्रत्येक घर सुगंधी फुलांनी सजवण्याची प्रथा आहे. त्यामुळे झेंडू, शेवंती, गंधराज, गुलाब या फुलांना बाजारात मोठी मागणी आहे. पुणे, शिरूर, खेड परिसरातील शेतकऱ्यांनी पहाटेपासूनच फुलतोड सुरू केली असून थेट फुलबाजारात पोहचवण्यासाठी गाड्यांची लगबग सुरू असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे दिवाळीच्या दिवसांत फुलांचा सुगंध केवळ देवघरातच नाही तर शेतकऱ्यांच्या घरातही आनंदाचा दरवळ घेऊन येतो. मात्र यंदा चित्र उलट दिसून येत आहे.  

Pune News
Dhangar Reservation : आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; सुसाईड नोट आढळल्याने खळबळ

कवडीमोल भाव मिळाल्याने फेकली फुले 

दिवाळीच्या सजावटीसाठी शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेली झेंडूची फुलं बाजारात घेऊन गेली, पण भाव न मिळाल्याने त्यांची निराशा वाढली. कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर फुलं फेकण्याचा निर्णय घेतला. निराश झालेल्या शेतकऱ्यांनी फुलं पुणे- आहिल्यानगर महामार्गावर सणसवाडी येथे रस्त्यावर फेकून दिली. अर्थात यात मोठे नुकसान शेतकऱ्याचे होत आहे. 

Pune News
Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

फेकलेली फुले उचलण्यासाठी झुंबड 

बाजारात विक्री करणाऱ्यांकडून फुले विकत न घेता फेडलेली फुलं फुकट मिळत असल्याचे समजताच नागरिकांनी ती उचलण्यासाठी झुंबड उडवली. दरम्यान शेतकऱ्यांच्या कष्टाचं सोनं व्हावं ही अपेक्षा असताना, त्यांच्या घामाने पिकलेली फुलं रस्त्यावर पडलेली पाहून नागरिक हिच फुलांच्या पिशव्या भरुन घेऊन जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com