Shreya Maskar
दिवाळी सणाला उत्साहात सुरुवात झाली आहे. दिवाळीत दिव्यांनी घर सजवले जाते. तसेच घरासमोर रांगोळी काढली जाते.४-५ दिवस मस्त फराळाचा आस्वाद घेतला जातो.
दिवाळी म्हटले की, फटाके उडवणे आले. मात्र दिवाळीत फटाके उडवताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून वायू प्रदूषण होणार नाही. तसेच नागरिकांना, प्राण्यांना आणि पक्ष्यांना इजा होणार नाही.
फटाके फोडताना सुती कपडे परिधान करावेत. तसेच पायात चप्पल कायम घालून ठेवा. जेणेकरून गरम फटाक्यांचा चटका पायाला लागणार नाही.
लहान मुलांसोबत कायम मोठ्या लोकांनी रहावे. जेणेकरून कोणतीही समस्या येणार नाही. तसेच मुलांना फटाके फोडण्याचा न घाबरता आनंद घेता येईल.
फटाके फोडताना छोटी मेडिकल किट आणि एक पाण्याची बॉटल कायमसोबत ठेवा. जेणेकरून फटाका कोणाला लागल्यास किंवा भाजल्यास त्वरित उपचार करता येतील.
फटाके फोडण्यासाठी अगरबत्ती आणि फुलबाजीचा वापर करावा. इमारतीच्या जिन्यावर, टेरेसवर फटाके फोडू नयेत. यामुळे नागरिकांना त्रास होईल.
दिवाळीला फटाके कमीत कमी फोडा. जेणेकरून जास्त वायू प्रदूषण होणार नाही. तसेच विद्युत तारेजवळ, हवेत फटाके फोडू नका.
फटाके फोडताना प्राणी-पक्ष्यांची काळजी काळजी घ्या. गाडीजवळ फटाके फोडू नका. अनेक वेळा कुत्रे येथे झोपलेले असतात. तसेच हवेत फटाका फोडल्यामुळे पक्ष्यांना देखील त्रास होतो.