Health News  Saam Tv
लाईफस्टाईल

पुरूषांनो वेळीच व्हा सावधान! स्पर्मची संख्या वेगानं घटतेय, 'या' सवयी आजपासूनच मोडा

Health News: लॅपटॉप आणि मोबाईलचा अतिवापर करणाऱ्या पुरूषांसाठी महत्वाची बातमी आहे. मांडीवर लॅपटॉप आणि खिशात मोबाईल ठेवत असाल तर पुरूषांनी वेळीच सावध व्हा. यामुळे स्पर्मची संख्या वेगाने कमी होत आहे.

Priya More

Summary -

  • लॅपटॉप मांडीवर ठेवणे आणि खिशात मोबाईल ठेवण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक.

  • कोलकाता विद्यापीठाच्या संशोधनात स्पर्मची संख्या झपाट्याने घटल्याचे आढळले.

  • १२०० पुरुषांपैकी ७०८ जणांमध्ये अझोस्पर्मिया निदान.

  • इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे वंध्यत्वाचा धोका वाढतो.

लॅपटॉप आणि मोबाईलचा वापर करणाऱ्या पुरूषांसाठी महत्वाची बातमी आहे. लॅपटॉप मांडीवर ठेवून काम केल्यामुळे आणि पँटच्या खिशात मोबाईल ठेवल्यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. यामुळे तुमच्या स्पर्मची संख्या झपाट्याने कमी होऊ शकते. कोलकाता विद्यापीठ आणि जेनेटिक्स रिसर्च युनिटने यासंदर्भात एक संशोधन केले. या संशोधनातून असे दिसून आले की, लॅपटॉप मांडवर ठेवून काम केल्यामुळे आणि खिशात मोबाईल ठेवल्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे पुरुषांमध्ये वंध्यत्व आणि नपुंसकत्वाचा धोका वाढू शकतो.

या संशोधनामध्ये २० ते ४० वयोगटातील १२०० पुरूषांचा समावेश करण्यात आला होता. त्यांच्या वीर्य नमुन्यांसह, त्यांची लाईफस्टाईल, खाण्याच्या सवयी, काम करण्याच्या पद्धती आणि मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर याबद्दल तपशीलवार माहिती गोळा करण्यात आली. संशोधन पथकाने निरीक्षण केले की, किती जण त्यांचा मोबाईल त्यांच्या पँटच्या खिशात ठेवतात किंवा लॅपटॉप मांडीवर ठेवून तासंतास काम करतात.

जूलॉजीचे असोसिएट प्रोफेसर सुजय घोष यांनी या संशोधनावर बोलताना सांगितले की, ५ तासंपेक्षा जास्त काळ खिशात मोबाईल ठेवणाऱ्या पुरूषांमध्ये व्यंध्यत्वाच्या समस्या जास्त प्रमाणात आढळतात. हा धोका विशेषत: ३० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील पुरूषांमध्ये जास्त होतो. संशोधनात असे देखील आढळून आले की, १२०० पुरूषांपैकी ७०८ पुरूषांना अझोस्पर्मिया म्हणजेच त्यांच्या विर्यामध्ये स्पर्मनसल्याचे आढळून आले. हा आकडा खूपच चिंताजनक आहे. यामधील ६४० जणांमध्ये स्पर्मची संख्या सामान्य होती. या निष्कर्षांनी जगभरातील अनेक अभ्यासाचे खंडन केले आहे.

यापूर्वी करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या संपर्कात आल्याने स्पर्मची संख्या कमी होते हे चुकीचे सिद्ध झाले होते. पण आता कोलकाता विद्यापीठ, जेनेटिक्स रिसर्च युनिट आणि मेडिकल इन्स्टिट्यूटने केलेल्या या नवीन संशोधनाने जुन्या संशोधनाच्या निष्कर्षांना आव्हान दिले आहे. आतापर्यंत असा दावा करण्यात आला आहे की, मोबाईलच्या रेडिएशनमुळे वंध्यत्वाचे कोणतेही पुरावे नाहीत. अमेरिकेतील युटा विद्यापीठाच्या एका पेपरमध्येही हे म्हटले आहे. अमेरिकन संशोधनात असे देखील म्हटले आहे की, स्पर्मची संख्या प्रत्येक तासा-तासाने, दिवसा-दिवसाने आणि महिन्या-दर-महिन्याने बदलू शकते.

या संशोधनातून हे स्पष्ट करण्यात आले आहे की, तांत्रिक उपकरणांचा गैरवापर पुरूषांच्या प्रजनन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे नेहमी खिशात मोबाईल फोन ठेवणाऱ्यांनी आणि मांडीवर लॅपटॉप ठेवून तासंतास काम करणाऱ्यांनी वेळीच काळजी घ्यावी आणि त्यांची ही सवयी मोडावी. आपले आरोग्य लक्षात घेऊन वेळीच सावध होणे आणि आपली सवयी सुधारणे हाच यामागचा योग्य उपाय राहिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST Rate Cuts: मोठी बातमी! AC, TV, पनीर, दूध झाले स्वस्त; जीएसटी टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल; निर्मला सितारामान आज करणार घोषणा

Trishansh Yog 2025: 30 वर्षांनी कर्मदाता शनीने बनवला अद्भुत योग; 'या' राशींची होणार अचानक चांदीच चांदी

Thurday Horoscope : मोठं घबाड हाती लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार नवं वळण

OBC Reservation : लक्ष्मण हाकेंनी सरकारविरोधात दंड थोपटले; आंदोलनातून आंदोलनाला प्रत्युत्तर देणार, VIDEO

Shukra Gochar 2025: 27 महिन्यांनी शुक्र करणार बुधाच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींना आहेत धनलाभाचे योग

SCROLL FOR NEXT