ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हेल्दी आणि फिट राहण्यासाठी, दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे.
व्यायाम करताना नकळत केलेल्या काही चुका हृदयाच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. यासाठी कोणत्या गोष्टी करु नये, जाणून घ्या.
जास्त व्यायाम किंवा जास्त वेट ट्रेनिंग केल्याने शरीरावर अधिक ताण येतो. यामुळे हृदयालाही हानी पोहोचू शकते.
वॉर्म अप न करता हाय इटेन्सिटी व्यायाम केल्याने दुखापत होऊ शकते. वॉर्म अप केल्याने शरीरासोबतच हृदयालाही व्यायामासाठी तयार केले जाते, त्यामुळे हृदयावर अचानक दबाव येत नाही.
अनेकदा बरेच लोक गरजेपेक्षा जास्त कार्डिओ करतात. कार्डिओमुळे हृदयावर जास्त दबाव पडतो, जो हृदयासाठी घातक ठरु शकतो.
काही लोक व्यायाम करताना पाणी पित नाहीत. शरीरात पाण्याची कमतरतेमुळे ब्लड प्रेशर आणि हार्ट रेटवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.