Maharashtra Live News Update: कोरेगाव भिमा शोर्यदिन सोहळ्यात बिबट्याची दहशत कायम

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५, महापालिकेसाठी अर्ज करण्याची आज अखेरचा दिवस, महायुती आणि मविआमध्ये जागावाटप, राज्यात थंडी ओसरली, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

कोरेगाव भिमा शोर्यदिन सोहळ्यात बिबट्याची दहशत कायम

कोरेगाव भिमा शोर्यदिन सोहळ्यात बिबट्याची दहशत कायम असल्याचं पाहायला मिळत आहे

वनविभाग कडुन पेरणे फाटा,कोरेगाव भिमा येथे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले

उद्यापासून कोरेगाव भिमा परिसरात लाखोंच्या संख्येने भिम अनुयायी उपस्थित रहाणार आहे

या पार्श्वभूमीवर बिबट्याच्या दहशतीमुळे वनविभाग अलर्टमोडवर आलाय

कोल्हापुरात बारा पोलिसांवर कारवाईची टांगती तलवार, कारण?

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविक रिव्होलवर घेऊन गेल्याचे प्रकरण पोलिसांना भोवले

अंबाबाई मंदिर सुरक्षेत कुचराई केल्याप्रकरणी 12 पोलिसांवर ठपका

एक पोलीस अधिकारी आणि इतर 11 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकाने काढली कारणे दाखवा नोटीस

काल दुपारी अंबाबाई मंदिर परिसरातील चारही दरवाजांवर सुरक्षेसाठी असणाऱ्या बारा पोलिसांवर कारवाईची टांगती तलवार

शिंदेंच्या शिवसेनेचा प्रमिला केणी यांना मोठा धक्का

शिंदेंच्या शिवसेनेचा प्रमिला केणी यांना मोठा धक्का बसला

-आव्हाडांच्या राष्ट्रवादीतून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रमिला केली यांना तिकीट नाकारले

-२०१७ च्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने प्रमिला केणी झाल्या होत्या विजयी

-मात्र पराजित झालेल्या मनाली पाटील यांना दिले तिकीट

-प्रमिला केणी आता अपक्ष निवडणूक लढणार

-शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार मनाली पाटील यांच्याविरोधात थोपटले दंड.

नागपुरात शिवसेनेच्या चिन्हावर भाजपचे ८ उमेदवार, शिवसैनिक नाराज 

नागपुरात भाजप - शिवसेना युती झाली मात्र ही युती कार्यकर्त्यांना न्याय देणारी नाही

शिवसेनेला(शिंदे गट) 8 जागा भाजप कडून देण्यात आल्या मात्र त्यातही काही जागांवर भाजप चे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर लढत असल्याने कार्यकर्ते नाराज

नाराज कार्यकर्ते नागपुरातील शिवसेना शिंदे गटाच्या विभागीय कार्यालयात पोहचून विरोध प्रदर्शन करणार आहे

Nashik : नाशिकमध्ये मुस्लिम बहुल भागात भाजपकडे उमेदवारच नाही

- स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपकडे प्रभाग 14 मध्ये एकही उमेदवार नाही

- शिंदेंच्या शिवसेनेसोबत एक एक जागेवर भांडणाऱ्या भाजपने चक्क प्रभाग क्रमांक 14 सोडला रिकामा

- 122 जागा लढण्याची घोषणा करणाऱ्या भाजपाने प्रत्यक्षात मात्र 118 जागांवरच दिले अधिकृत उमेदवार

- जुने नाशिक येथील मुस्लिम बहुल भागात येणाऱ्या प्रभाग 14 मध्ये भाजपने एकही उमेदवार न दिल्याने आश्चर्य

- मुस्लिम बहुल भाग म्हणून ओळखला जातो नाशिकचा प्रभाग 14

दिंडोशीमध्ये भाजपमध्ये बंडखोरी 

दिंडोशीमधील महिला आरक्षित वॉर्ड क्रमांक ३७ मध्ये भारतीय जनता पक्षात बंडखोरी.

माजी नगरसेविका आणि कुरार गावातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्या असलेल्या सुचित्रा नाईक यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने आधीच अटीतटीचा सामना असलेल्या प्रभागात सुचित्रा नाईक यांनी अर्ज दाखल केल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.

राज ठाकरे मातोश्रीवरून घरी निघाले

राज ठाकरे मातोश्रीवरून घरी निघाले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची दोन तास चर्चा झाली.

गोवंडीमध्ये पिता-पुत्र निवडणुकीच्या रिंगणात

मुंबईच्या गोवंडी वॉर्ड क्रमांक १३७ आणि १३८ मधून पिता पुत्र निवडणुकीच्या रिंगणात पिता महादेव राव आंबेकर हे शिवसेना ठाकरे पक्षातून निवडणूक लढवत आहेत. तर डॉ अमोल आंबेकर हे शिवसेना शिंदे पक्षातून निवडणूक लढवत आहेत. यामुळे सध्या परिसरात पिता पुत्रांचा चर्चेचा विषय ठरत आहे.

नांदेड महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजनची आघाडी

काँग्रेस 61 जागावर लढणार तर वंचितने दिले 20 जागेवर उमेदवार

मित्र पक्षातील तिन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार.

दादाच्या राष्ट्रवादीने 81 पैकी 65 ठिकाणी दिले उमेदवार.

शिंदे शिवसेनेच्या वतीने 81 पैकी 73 उमेदवार रिंगणात

महायुती कोल्हापूरकरांना कसा विश्वास देणार? सतेज पाटील यांचा सवाल

कोल्हापूर महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी आज महायुतीवर जोरदार टीका केली. महायुतीमध्ये प्रचंड गोंधळ, अविश्वास आणि समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप करत, काँग्रेस-शिवसेना महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Mumbai: राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल

राज ठाकरे मातोश्रीवर दाखल

राज ठाकरेउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल

अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मनसेकडून मुंबईत ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

राKolhapur: भाजप आता मूळ कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलेला नाही - सतेज पाटील

इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी इचलकरंजीत पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली आहे.

भाजप आता मूळ कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलेला नाही, असा गंभीर आरोप सतेज पाटील यांनी केला आहे.

Solapur: सोलापुरात भाजप - आरपीआय युती अखेर तुटली, सन्मानजनक जागा न मिळाल्याने आठवले गटाचा निर्णय

सोलापूर -

सोलापुरात भाजप - आरपीआय युती अखेर तुटली

भाजपकडून आरपीआयला सन्मानजनक जागा न मिळाल्याने सोलापुरात आरपीआय आठवले गट उतरला स्वबळावर

आरपीआय आठवले गटाकडून भाजपकडे 10 जागांची करण्यात आली होती मागणी भाजपाकडून फक्त 2 जागा तोडल्याने अखेर आरपीआयने युती तोडली

सोलापूर महापालिकेत आता आरपीआय आठवले गट 4 जागांवर लढावणार आहे निवडणूक

Jalna: भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ

जालना -

भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ

पक्षांतर केल्यानंतर सोबत येऊनही तिकीट कापले

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या समोर स्टँडिंग नगरसेविका राहिलेल्या संगीता पाचगे यांचा गोंधळ

तिकीटासाठी पाया पडून विनवणी

माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा काढता पाय

मांजरसुंबा रोडवरील वैद्यकिन्ही टोल नाक्यावर तिघांना बेदम मारहाण

बीडच्या पाटोदा ते मांजरसुंबा रोडवर असलेल्या वैद्यकीय टोल नाक्यावर भावा बहिणीसह भाच्याला रोड व लाकडी दांड्यांनी मारहाण

आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलनचा इशारा नातेवाईकांनी दिला

आयुष कोमकरच्या आईने भरला उमेदवारी अर्ज

आयुष कोमकर च्या आई ने भरला उमेदवारी अर्ज

कल्याणी कोमकर ने भरला नाना पेठ प्रभागातून भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

आंदेकर टोळीने केली होती ५ सप्टेंबर रोजी आयुष कोमकर ची हत्या

परभणीत भाजप आणि शिवसेना युती तुटली

शिवसेना आणि भाजप स्वबळावर निवडणूकायच्या रिंगणात

भाजप 65 जागांपैकी 45 जगावर स्वबळावर निवडणुक लढवणार

शिवसेना शिंदे गटाचे 30ते35 उमेदवाराचा अर्ज दाखवलं

शेवटपर्यंत भाजप आणि शिवसेनेचा युतीचा सुरू मात्र काही जागांवर युती तुटली

उमेदवारी नाकारल्याने इच्छुक उमेदवाराच्या कुटुंबाचा आमदार सुरेश भोळे यांना घेराव

-भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्याने इच्छुक उमेदवाराच्या कुटुंबाने आमदार सुरेश भोळे यांना हॉटेल रॉयल पॅलेस या ठिकाणी घेराव घातला. यावेळी इच्छुक उमेदवार संगीता पाटील यांनी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आमदार सुरेश गोळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. आम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला बोलत आहोत त्याप्रमाणे तुम्ही देखील वरिष्ठांशी बोला, आमच्यासाठी त्यांच्याशी भांडण असे यावेळी इच्छुक उमेदवार संगीता पाटील यांनी सुरेश भोळे यांना सांगितले. यावेळी आमदार सुरेश भोळे हतबल झाल्याचे दिसून आले.

जळगाव जामोद येथून बदली झालेल्या शिक्षकांच्या रुजूकरणासाठी ठिय्या आंदोलन

जळगाव जामोद तालुक्यातून नांदुरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत बदली झालेले शिक्षक अद्याप रुजू होऊ न शकल्याने पालकामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

संबंधित शिक्षकांना तात्काळ रुजू करून घ्यावे.

या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या कॅबिनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले.

उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा वेळ संपला जे अर्ज टेबल वर असतील तेच अर्ज स्वीकारणार

परभणी शहर महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता तीन वाजेपर्यंत ही वेळ होती, मात्र तीनच्या नंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या टेबलवर जे अर्ज आलेले आहेत तेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्याच्यावर एकही अर्ज स्वीकारला जाणार नाही उमेदवाराची धावपळ झाली.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभाग क्रमांक २०७ च्या उमेदवार शलाका हरयाणा यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केला दाखल.

शलाका हरयाणा
शलाका हरयाणा

शिवसेना शिंदे गटात असंतोष उफाळून आला

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अवघा एक तास उरला असतानाच मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटात असंतोष उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे इच्छुक उमेदवार वैष्णवी पुजारी यांना डावलून बाहेरील उमेदवार भाजपाकडून लादण्यात आला आहे याचा निषेध करण्यासाठी शिंदे गटाचे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवत आमदार प्रकाश सुर्वे आणि उमेदवार प्रकाश दरेकर यांचा निषेध नोंदविण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणावर समर्थकांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी इतर मतदारसंघात तडजोड करावी लागल्यामुळे हा मतदारसंघ भाजपाला गेल्याचा दावा प्रकाश पुजारी यांच्याकडून करण्यात आला सोबतच या ठिकाणी कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून वरिष्ठ नेत्यांनी बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर केल्याचे वैष्णवी पुजारी यांनी म्हटले आहे.

जागा वाटपाची चर्चा फिसकटल्याने पिंपरी चिंचवड शहरात भाजप शिवसेना युती तुटली : श्रीरंग बारणे

युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला सन्मान जनक जागा न मिळाल्याने कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही युती तोडली अशी घोषणा पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाकडे एकूण 128 जागां पैकी एकुण 29 जागांची मागणी केली होती. चर्चांती भाजपा पक्ष आम्हाला दहा जागा देण्यासाठी तयार झाला होता. मात्र आम्हाला कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी युती तोडावी लागली अशी माहिती श्रीरंग बारणे यांनी दिली आहे. मी माझ्या कुटुंबातील माझा पुतण्या तसेच माजी नगरसेवक निलेश बारणे आणि माझा मुलगा युवासेना प्रमुख विश्वजीत बारणे यांना दोन जागा देण्यासाठी भाजपकडे देखील आग्रही होतो. मात्र अंतिम क्षणी चर्चा फिस्कटल्याने आम्ही युती तोडण्याचा निर्णय घेतला अशी माहिती श्रीरंग बारणे यांनी दिली आहे

जळगाव जामोद येथून बदली झालेल्या शिक्षकांच्या रुजूकरणासाठी ठिय्या आंदोलन...

जळगाव जामोद तालुक्यातून नांदुरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत बदली झालेले शिक्षक अद्याप रुजू होऊ न शकल्याने पालकामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. संबंधित शिक्षकांना तात्काळ रुजू करून घ्यावे या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या कॅबिनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले.

बदली आदेश अधिकृतरित्या निर्गमित होऊनही प्रशासनाकडून अडथळे आणले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा परिषद कार्यालयात दाखल होत थेट सीईओंच्या कॅबिन मध्ये ठाण मांडून बसले. ..या आंदोलना ची तातडीने दखल घेत शिक्षणधिकारी विकास पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

दरम्यान, जर शिक्षकांचे रुजूकरण तात्काळ झाले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देण्यात आला आहे....

Kolhapur: कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक आखाड्यात तृतीयपंथी उमेदवार

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी कोल्हापुरातून तृतीयपंथीय उमेदवार शिवानी गजवर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. माझी उमेदवारी ही कोल्हापूरकर शहराच्या विकासासाठी आहे. राजकीय पक्षांनी जरी आमची उमेदवारी नाकारली असली तरी कोल्हापूरकर मला साथ देतील असा विश्वास शिवानी गजबर यांनी साम टीव्ही सोबत बोलताना व्यक्त केला आहे.

नागपुरात राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं

नागपुरात राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं

उमेदवारीचा अर्ज न दिल्याने कार्यकर्ते नाराज

लातूर मनपा निवडणुकीत भाजपचा स्वबळाचा नारा

लातूर महापालिकेच्या निवडणुकीत मागच्या काही दिवसापासून युतीसाठी , भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात बैठक आणि चर्चा होत्या

मात्र महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीची युती बिचकली आहे

युती होण्यामध्ये नवऱ्याच्या पेटीएम निर्मितीचा काळ टाकल्याचा आरोप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला.

लातूर महानगरपालिककेत आता भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार हे स्वतंत्र लढणार आहेत.

नववर्ष स्वागतासाठी रायगडमध्ये जड आणि अवजड वाहनांवर तात्पुरती वाहतूक बंदी

नववर्ष स्वागतानिमित्त रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. यापार्श्वभुमीवर दिनांक 31 रोजी सकाळी 8 पासून दिनांक 1 जानेवारी 2026 रात्री 12 वाजेपर्यंत जड आणि अवजड वाहनांवर तात्पुरती वाहतूक बंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी खारपाडा, कशेडी, माणगाव, ताम्हाणी घाट, कर्जत, खोपोली, पालीफाटा, वडखळ अलिबाग, मुरुड, मांडवा आदी प्रमुख मार्गांवर राहणार आहे. दूध, पेट्रोल, गॅस, औषधे, पाणी, रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवांना मात्र वगळण्यात आले आहे. पर्यटक व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटलांचा तडकाफडकी राजीनामा

महापालिका निवडणुकीत जागा लढण्यावरून जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासोबत मतभेद झाल्याने राजीनामा दिल्याची माहिती..

महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी राजीनामा दिल्याचे यावर त्याला दुजारा दिला असून पक्ष कार्यालयात राजीनामा दिल्याचे सांगितलं..

दरम्यान महापालिका निवडणूक लढवून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये दुफळी आजी वाद निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे

नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची आघाडी.

काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस सोबतच्या आघाडी संदर्भात केली घोषणा.

नांदेड शहरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेचे वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि काँग्रेसचे नेते उपस्थित.

भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि वंचितची आघाडी.

वंचित आघाडी 20 जागेवर तर 61 जगावर काँग्रेस लढणार.

61/20 जागेचा फार्मूला ठरला.

काँग्रेसचे माजी नगरसेवक एमआयएम मध्ये गेले आहेत. हे भाजपाचे षडयंत्र आहे.

नांदेड महानगरपालिकेवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता येईल असा विश्वास काँग्रेचुलते माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला.

वंचितला जागा कमी मिळाले असल्या तरी हा काळ त्याग करण्याचा आहे. नांदेडची जनता आणि नांदेडची जमीन वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. निश्चितच नांदेड महापालिकेवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकेल असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांनी व्यक्त केला.

अकोला महापालिकेत 'भाजप-राष्ट्रवादी' युतीची घोषणा; 80 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी देणार उमेदवार.

अकोला महापालिकेत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युतीची घोषणा झालीय.. काही जागा वाटपावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तिढा होता. मात्र राष्ट्रवादीचे मंत्री इंद्रनील नाईक, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि भाजपचे आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे यांच्या चेर्चेतून अखेर तिढा सुटलाये. भाजप आणि राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषदेतून युतीची घोषणा केलीय.. 80 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी निवडणूक लढणार तर उर्वरित जागांवर भाजप उमेदवार देणारेये.. काही जागांवर भाजप मैत्रीपूर्ण लढतीच्या तयारीत असल्याचे चित्र आहेये.. मात्र, शिंदेसेनेने स्वबळाचा नारा दिला

भाजपचे विद्यमान आमदार पुत्राचा सक्रिय सदसत्वाचा राजीनामा

नागपुरातून भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांचे चिरंजीव रोहित खोपडे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपमधील सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

रोहित खोपडे भाजप युवा मोर्चामध्ये काम करत होते भाजपने एकाच घरात दोन लोकांना उमेदवारी देऊ नये या आधारावर त्यांना उमेदवारी नाकारली असं बोललं जात आहे.

भाजप–शिंदे सेनेच्या युतीमुळे बंडखोरीची शक्यता

कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची युती झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. युतीमुळे काही ठिकाणी नाराजीचे सूर उमटत असून मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा–सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कल्याण–डोंबिवली महापालिकेच्या क प्रभागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आज, २९ रोजी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने महापालिका परिसरात सकाळपासूनच हालचालींना वेग आला आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने अर्ज भरण्यासाठी दाखल झाले असून परिसरात प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत महायुती तुटली

शिंदे गट आणि भाजप दोन्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असून स्वबळाचा नारा दिला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप ९५ जागांवर स्वतःचे उमेदवार उभे करणार

तिकीट वाटपात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांनी खूप दक्षता घेतली आहे.

नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी

- नाशिकच्या पंचवटी विभागीय कार्यालयाबाहेर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या इच्छुक उमेदवारांचा गोंधळ . उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिल्याने इच्छुक उमेदवारांची होतेय पळापळ

अंबाबाई मंदिरात रिव्होलवर घेऊन जाणाऱ्या वर गुन्हा दाखल

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात मुंबईहून राहुल चतुर्वेदी हा तरुण आपल्या कुटुंबीयांसोबत दर्शनासाठी आला होता. या तरुणाकडे स्वयंरक्षणासाठी लायसनधारी रिवाल्वर त्याच्या कमरेला होती. अंबाबाई मंदिरात प्रवेश करत असताना मेटल डिटेक्टर मधून जावं लागतं. यावेळी तो मेटल डिटेक्टर मधून आल्यानंतर त्याला तिथे असणाऱ्या कोणत्या यंत्रणेने अडवलं नाही किंवा त्याची अंग झळती देखील घेतली नाही. शेवटी राहुल चतुर्वेदी आणि संभाजी उर्फ बंडा साळुंखे या दोघांनी अंबाबाई मंदिर परिसरातलं मेटल डिटेक्टर बंद असल्याचा पर्दाफाश केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कोल्हापूर पोलिसांनी तत्परता दाखवत ज्याने मेटल डिटेक्टर ची पोलखोल केली त्याच्यावरच गुन्हा दाखल केला आहे. मात्र अंबाबाई मंदिर परिसरातील कार्यरत असणाऱ्या आणि कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मात्र कोणतीच कारवाई केलेली नाही... त्यामुळे या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी चोर सोडून संन्यासाला फाशी दिल्याचे प्रकरण चर्चेचा विषय ठरलाय

तिकीट न मिळाल्याने लातूर मध्ये पहिला भाजपाच्या कार्यकर्त्याचा राजीनामा

लातूर महापालिकेसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी अगदी काही तास शिल्लक असताना भाजपातील नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे, भाजपाच्या लातूर शहर संघटनातील संघटन सरचिटणीस पदाचा राजीनामा निखिल गायकवाड यांनी दिला “काम करण्याचे फळ मिळाले, धन्यवाद” असा भावनिक पोस्ट समाज माध्यमावर टाकत राजीनामा दिल्याची माहिती मिळते आहे. पक्षाकडून अचानक उमेदवारी न मिळाल्याने हा राजीनामा देण्यात आल्याची चर्चा आहे. निखिल गायकवाड हे भाजपाचे जुने व सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते,मात्र महापालिकेच्या तोंडावर इतर राजकीय पक्षांमधून मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्ते, भाजपात दाखल झाल्याने, जुन्या कार्यकर्त्यांमध्ये आता नाराजीचा सुरू दिसतो आहे

भाजपच्या यादीत गंभीर गुन्ह्याचा आरोपी,   आमदार जोरगेवार करणार तक्रार

चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या यादीवर आमदार किशोर जोरगेवार यांचा तीव्र आक्षेप... सुधीर मुनगंटीवार यांच्या दोन समर्थकांना उमेदवारी दिल्याबद्दल जोरगेवार यांची तीव्र नाराजी, वरिष्ठापर्यंत तातडीने या उमेदवारांबद्दलचे आक्षेप जोरगेवारांनी नोंदवत केली उमेदवार बदलण्याची मागणी, प्रभाग क्रमांक 4 मधून अजय सरकार आणि प्रभाग क्रमांक 3 मधून पूजा पोतराजे यांना उमेदवारी देण्याबद्दल जोरगेवार यांना आहे तीव्र आक्षेप, अजय सरकार याच्यावर 302 सहित वीस गंभीर गुन्हे दाखल असल्याचा जोरगेवार यांनी दिला हवाला तर दुसरीकडे पूजा पोतराजे यांचे पती मनोज पोतराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात समाज माध्यमावर बदनामीकारक कॅम्पेन चालवण्याचा जोरगेवार यांचा आरोप

Solapur: सोलापूर शहर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना मातृशोक..!

सोलापूर शहर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती सिद्रामप्पा देशमुख,वय वर्ष 90 वृद्धापकाळाने निधन झाले आहे. आज सायंकाळी चार वाजता काळजापूर मारुती नजीक असलेल्या आमदार देशमुख यांच्या घराजवळून अंत्ययात्रा निघणार आहे.सोलापूर जवळील देगांव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

देगाव येथील त्यांच्या देशमुख मळा या शेतामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात मुले,मुली,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या.त्यांच्या जाण्याने परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Mumbra: शिंदेंच्या शिवसेनेला मुंब्र्यातून मोठा धक्का

शिंदेंच्या सेनेचे चार नगरसेवक लढणार राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून..

राजन किने अनिता किने मोरेश्वर किने या सर्वच माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा एबी फॉर्म स्वीकारला असून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकींना शिंदेंची साथ सोडत राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत..

मुंब्रा शिवसेना शाखेचा वादामध्ये राजन किने यांचा मोठा सहभाग होता मुंब्रा मध्ये शिवसेनेला वाढवण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान ठरले आहे.. त्यांच्या या निर्णयामुळे मुंब्रातील राजकीय खेळी बदलण्याची शक्यता..

राष्ट्रवादीच्या या स्वबळाच्या राजकीय खेळीमुळे आतापर्यंत भाजप शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष व मनसे अशा सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा कौल हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे वाढताना दिसून येतोय..

Dhule: धुळ्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला..

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला..

काँग्रेस 30, ठाकरे सेना 30, राष्ट्रवादी शरद पवार गट 14 जागा...

ठाकरे सेनेचा कोट्यातून मनसेला देण्यात येणार जागा..

शिवसेना ठाकरे गटाचे एबी फॉर्म वाटपास सुरुवात..

भारतीय जनता पार्टी तर्फे उमेदवारी डावलण्यात आलेल्या निष्ठावंतांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून घेतले एबी फॉर्म.

गजा मारणेची पत्नी राष्ट्रवादीकडून भरणार फॉर्म

गजा मारणे ची पत्नी जयश्री मारणे प्रभाग 10 मधून उमेदवारी अर्ज राष्ट्रवादीकडून भरणार एबी फॉर्म भेटला

Nashik: नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं

- शिंदेंची शिवसेना ९२ ते ९५ जागा लढवणार तर अजित पवारांची राष्ट्रवादी २७ ते ३० जागा लढवणार, सूत्रांची माहिती

- तर रिपब्लिकन सेनेला २ जागा दिल्या जाणार असल्याची माहिती

- नाशिकमध्ये सेना राष्ट्रवादी युतीत शिंदेंची सेना मोठा भाऊ

Sangli: सांगलीत राष्ट्रवादी अजित पवार गटात इन्कमिंग सुरूच

सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटातले इन्कमिंग अजून चालूच आहे.शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कुपवाड शहराध्यक्षासह भाजपाचे पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे आणि भाजपाला राष्ट्रवादीने धक्का दिला आहे.मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते

शिवसेना ठाकरे गटाचे कुपवाड शहराध्यक्ष रुपेश मोकाशी व भाजपाचे पदाधिकारी प्रशांत देशमुख यांचा हा प्रवेश झाला.माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.गेले काही दिवसापासून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये इनकमिंग सुरू आहे,मिरज,सांगली नंतर आता कुपवाड मध्ये देखील अजित पवार गटात झालेल्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ताकद आणखी वाढली आहे.

Nashik: नाशिकमध्ये उमेदवारी जाहीर करण्यासाठी भाजपची दमछाक

- एकीकडे नाशकात शिंदे सेना, अजित पवारांची राष्ट्रवादी युती तर भाजप स्वबळावर

- भाजपकडून १२२ जागांवर १०६६ इच्छूक उमेदवार

- बंडखोरी टाळण्यासाठी अंतिम क्षणी उमेदवारांना AB फॉर्म देण्याची भाजपची खेळी

- उमेदवारी अर्ज भरण्याच्या अर्धा ते एक तास अगोदर AB फॉर्म दिले जाणार, सूत्रांची माहिती

- बंडखोरांना रोखण्यासाठी भाजपची रणनीती

- ठरलेल्या उमेदवारांना AB फॉर्म देतांना AB फॉर्मवर उमेदवारांचं नाव देखील टाईप करून देणार असल्याची माहिती

Nagpur: नागपुरात वंचितची काँग्रेससोबत आघाडी नाही.

- वंचित २४ प्रभागांत स्वतंत्र लढणार.

- महापालिकेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडे ३६ जागांचा प्रस्ताव ठेवला.

- काँग्रेसच्या शहर नेतृत्वाने तुमचे अस्तित्व कुठाय? असे म्हणून हेटाळणी केली. केवळ ४ जागा सोडण्याची तयारी दर्शविली.

- मुंबई महापालिकेत आघाडी झाल्याच्या पार्श्वभूमीवर वंचितने सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु, नागपुरात काँग्रेसचे स्थानिक नेतृत्वाने वंचित पुढे चार जागेचा प्रस्ताव ठेवल्याने वंचित असमर्थन दाखवत एकला चलोरेचा नारा दिला.

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजप शिवसेना स्वबळावर लढणार

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक अपडेट

शिवसेना भाजप नवी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढवणार

शिवसेना-भाजप युतीचा फॉर्मुला जुळला नसल्यामुळे दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्म उमेदवारांना देण्यात आले आहे

त्यामुळे नवी मुंबईमध्ये गणेश नाईक विरुद्ध शिवसेना असा सामना नवी मुंबईच्या राजकारणात रंगणार आहेत

Nagpur: नागपूरात महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता, उबाठा स्वबळावर लढण्याची शक्यता...?

- कॉंग्रेसकडून उबाठाला सन्मानजनक जागा मिळत नसल्याने नाराज...

- जागा वाटपावरून काँग्रेस उबाठा मध्ये रस्सीखेच सुरू आहे, 4 ते 5 जागांसाठी आघाडी तुटण्याची शक्यता

- आजच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास उबाठा नागपूरात स्वबळावर लढणार

- काँग्रेसने जागा वाटपात चर्चेत व्यस्त ठेवल्याचा उबाठाचा आरोप.

- राष्ट्रवादीला 12 जागा मिळत असल्याने समाधानी नाही, त्यामुळे वेगळा पर्याय निवडण्याच्या तयारीत, स्वबळावर लढण्याचा निर्धार...

- दोन्ही पक्ष बाहेर पडल्यास कॉंग्रेसही स्वबळावर लढण्याची शक्यता नाकारता येत नाही...

छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी महापौर विकास जैन नाराज

माजी महापौर विकास जैन नाराज

शिंदे यांच्या शिवसेनेत शिस्त राहिलेले नाही

मी निवडणूक लढवणार नाही

पालकमंत्री असताना त्यांच्या घरावर टार्गेट करणं त्यांच्या मुलांना टार्गेट करणार हे योग्य नाही

Lonavala-Khandala: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा–खंडाळा पर्यटकांची पहिली पसंती....

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लोणावळा आणि खंडाळा ही पर्यटन स्थळे यंदाही पर्यटकांची पहिली पसंती ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने लोणावळा व खंडाळ्यातील विविध पर्यटन स्थळांवर दाखल होत आहेत. त्यामुळे या परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉइंट, टायगर्स पॉइंट, राजमाची पॉइंट, कार्ला–भाजे लेणी तसेच खंडाळ्यातील ड्यूक्स नोज, अमृतांजन पॉइंट या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. थंडगार हवामान, निसर्गसौंदर्य आणि मुंबई–पुण्याच्या जवळीकतेमुळे पर्यटकांचा ओढा वाढला आहे...

Ahilyanagar: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेला धक्का

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेला धक्का..

युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव विक्रम राठोड यांनी दिला राजीनामा..

पक्षांमध्ये सन्मान जनक वागणूक मिळत नसल्याचा केला आरोप..

पक्षाची विचारधारा बदलली असून कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने विना राजीनामा..

लवकरच शिंदे सेनेमध्ये करणार प्रवेश..

शिवसेना शिंदे सेना पक्षाकडून जी जबाबदारी मिळेल ती चोखपणे पार पाडणार..

पुण्यात कालपासून १० जणांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

पुण्यात अजित पवार सुसाट

काल दुपारपासून रात्रीपर्यंत १० जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षात केला प्रवेश

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काल एका दिवसात सर्व पक्षातील माजी नगरसेवकांसह अनेक स्थानिक नेत्यांचा प्रवेश

अजित पवारांनी वेळ साधली

आजही काही प्रवेश होण्याची शक्यता

भाजप, मनसे, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट ,एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून १० जणांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे शहरातील या मुख्य १० जणांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

धनंजय जाधव भाजप

जयराज लांडगे मनसे

दत्ता बहिरट : काँग्रेस

शंकर पवार : भाजप

मुकारी अलगुडे : भाजप

नीता मांजळकर : शिवसेना ( ठाकरे )

आनंद मांजळकर ( शिवसेना )

स्वप्निल दुधाने (राष्ट्रवादी श प)

मधुकर मुसळे (भाजप)

प्रकाश ढोरे ( मनसे)

Dhule: धुळ्यात अजूनही महाविकास आघाडीत जागा वाटपाचा पेच कायम

धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास काही तास शिल्लक राहिलेले असताना महाविकास आघाडीतील सुरू असलेल्या जागा वाटपातील तिढा आज सुटून युतीची घोषणा आज होणार का याकडे धुळ्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिल आहे,

काँग्रेस तर्फे राष्ट्रवादी शरद पवार गटाला 74 पैकी काँग्रेस 30 ठाकरेसेना 30 तर राष्ट्रवादी 14 असा प्रस्ताव मान्य नसून 25-25-24 हा फॉर्मुला करण्यात आला तरच आघाडी होईल, अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढण्याची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची भूमिका असून, जागा वाटपाचा तिढा हा काँग्रेस तर्फे सोडविण्यात येणार का आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा महाविकास आघाडी म्हणून आघाडीत निवडणूक लढणार का हे बघणं औचित्याच ठरणार आहे.

Sharad Pawar: शरद पवारांचे राष्ट्रवादी 40 प्रभागात प्रत्येकी एक उमेदवार देणार

शरद पवारांचे राष्ट्रवादी 40 प्रभागात प्रत्येकी एक उमेदवार देणार

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याने अजित पवारांची राष्ट्रवादी 125 शरद पवारांची 40 जागा लढणार

पॅनल निवडून येण्यास सोपे जाण्यासाठी अजित पवारांचे तीन उमेदवार आणि राष्ट्रवादी शरद पवारांचा एक उमेदवार प्रत्येक प्रभागात असणार

राजकीय अस्तितव टिकवण्यासाठी प्रत्येक प्रभागात आपला अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवारांचे राष्ट्रवादीची रणनीती

BMC Election: मुंबईत भाजपला १३७ तर शिवसेनेला ९० जागा

भाजपा आणि शिवसेना महायुतीचे मुंबईतील जागावाटप पूर्ण झाले असून 137 जागा भाजपा तर 90 जागा शिवसेना लढवणार आहे. महायुतीचे इतर घटकपक्ष यात समाविष्ट असतील.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात मुंबईच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईकरांचे जीवन सुकर करण्यासाठी विकासाची कामे कुणी केली, हे मुंबईकरांना चांगलेच ठावूक आहे. त्यामुळेच मुंबईकर महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि प्रचंड बहुमताने महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देतील, हा आम्हाला विश्वास आहे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Malegaon: मालेगाव महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती तुटली

नाशिक पाठोपाठ मालेगाव महापालिका निवडणुकीत सेना-भाजप यांची युती तुटली आहे,काल रात्री उशिरा गिरीश महाजन यांच्या सोबत झालेल्या बैठकीत भाजपात प्रवेश केलेल्या बंडू बच्छाव,अदवय हिरे यांचा प्रमुख्यने युतीला विरोध असल्याने अखेर मालेगाव महापालिकेत युती होऊ न शकल्याने दोन्ही पक्ष स्वबळावर निवणुका लढवणार असल्याचे सुत्रनी माहिती दिली आहे

Pune: पुण्यात अजित पवार गट १२५ जागांवर लढणार

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार

40 जागांवर राष्ट्रवादी तुतारी लढणार

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अंकुश काकडे विशाल तांबे व इतर पदाधिकारी जागावाटप संदर्भात निर्णय घेताय

अजित पवार 125 जागांवरती निवडणूक लढणार

शरद पवार 40 जागा मित्र पक्षाला अजित पवार यांच्याकडून काही जागा ठेवण्यात आल्या आहेत

Yavatmal: उमरखेड येथील डायलिसिस केंद्रात शाॅर्टसर्किटमुळे आग

डायलिसिस केंद्राला शाॅर्टसर्किट,कर्मचाऱ्यांनी खिडकी फोडून आठ रुग्णांचे प्राण वाचविले

यवतमाळच्या उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक घटना,रुग्णालयातील मोफत डायलिसिस सेवा केंद्रात शाॅर्टसर्किटमुळे धुराचे लोळ पसरल्याने उडाली खळबळ

या घटनेने रूग्णालयातील रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांनी फायर सिलिंडरने शाॅर्टसर्किटवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला

घटने दरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रूग्णांना खिडकीच्या काचा फोडून बाहेर काढले,या घटने दरम्यान कोणतीही जिवितहानी अथवा कोणीही गंभीर जखमी झाले नाही,शाॅर्टसर्किटमुळे डायलिसिस केंद्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Kolhapur: कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसचे 69 उमेदवार अर्ज दाखल करणार

कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसचे 69 उमेदवार अर्ज दाखल करणार

यापूर्वी काँग्रेसने पहिली आणि दुसरी यादी जाहीर केली मात्र आता काँग्रेस तिसरी यादी जाहीर न करता उमेदवारांना थेट एबी फॉर्म देणार

आणखी नव्या 12 उमेदवारांना मिळणार संधी

81 जागांपैकी काँग्रेस 69 जागांवर तर शिवसेना 11 जागांवर लढवणार निवडणूक

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांना पाठवलं पुण्याला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मंत्री उदय सामंत यांना पाठवलं पुण्याला

शिवसेनेचे नेते अजित पवारांना भेटले, त्यानंतर रात्री उशिरा एका हॉटेलमध्ये बैठक घेऊन स्वबळाचा नारा देण्यासाठी विजय शिवतारे 12 वाजता पत्रकार परिषद घेणार होते

मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुण्यातील नेत्यांना निरोप....उदय सामंतांसोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय होणार...

पुण्यातील स्थानिक नेते स्वबळावर लढण्यासाठी आग्रही...

दहा वाजता होणार उदय सामंत आणि पुण्यातील प्रमुख नेत्यांची बैठक...

मंत्री उदय सामंत घेणार अंतिम निर्णय....

जालन्यात अजूनही महायुती महाविकास आघाडीचं ठरेना; अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस,

जालन्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज आज शेवटचा दिवस असून अद्यापही जालन्यामध्ये युती आणि आघाडी बाबत अधिकृत घोषणा झालेली नाही त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते संभ्रमात आहे तर दुसरीकडे जालन्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला आहे तर वंचित बहुजन आघाडी देखील स्वबळावर ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या जवळपास सात मॅरेथॉन बैठका होऊन देखील अद्यापही युतीबाबत निर्णय होऊ शकला नाही त्यामुळे जालन्यामध्ये युती होणार का आघाडी होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे...

Pune: पुण्यात शिवसेनेकडून ४० पेक्षा जास्त AB फॉर्म वाटप

शिवसेनेकडून 40 च्या वर एबी फॉर्म वाटप

25 जागांवरती महायुती झाली तर शिवसेना लढू शकते

सामंत भाजप नेत्यांची चर्चा करणार

त्यामुळे शिवसेना महायुतीत जर गेली तर 25 ते 30 जागांवरती लढू शकते आणि वेगळी लढली तर 40 जागांवर ते शिवसेना उमेदवार उभे करणार

Ratnagiri: रत्नागिरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी स्विकारला पदभार

रत्नागिरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी पदभार स्वीकारला. ढोल-ताशांच्या गजरात नूतन नगराध्यक्ष सुर्वे यांनी नगरपरिषदेमध्ये प्रवेश केला. नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्षांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरीचा आलेख चढता ठेवण्यासाठी रस्ते, पाणी आणि वीज हे मूलभूत प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील. तसेच नागरिकांचे प्रश्न, सुविधा आणि विकास या त्रिसूत्रीवर काम करणार असल्याचे आश्वासन रत्नागिरीच्या नूतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी दिले.

Pimpri Chichwad: पिंपरी चिंचवड शहरात आम आदमी पक्षाचा दिल्ली पॅटर्न

आम आदमी पक्षाने घेतलेल्या स्वतंत्र भूमिकेमुळे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक आणखी चुरशीची झाली आहे. आम आदमी पक्षाने पिंपरी चिंचवड शहरात कोणत्याही पक्षाशी युती न करता जवळपास सर्व 128 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत.

तसेच आम आदमी पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी स्वतः प्रभाग क्रमांक 26 मधून आपला महापालिका निवडणूक नामांकन अर्ज दाखल केला आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन करत रविराज काळे यांनी आपला निवडणूक नामांकन अर्ज दाखल केला आहे.

आम आदमी पक्षासाठी आयटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांची मत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. दिल्लीच्या धरतीवर नागरिकांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर, 20 हजार बेरोजगार तरुणांना नोकरी, ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन अशी आश्वासन आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी या निवडणुकीत दिली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक ही धनशक्ती विरोधात जनशक्ती असून या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा निश्चितच विजय होईल तसेच महापालिकेवर आम आदमी पक्षाचाच महापौर बसेल असा विश्वास आम आणि पक्षाचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी व्यक्त केला आहे.

Thane: ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमधील युतीचा तिढा अखेर सुटला

ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकी मधील युतीचा तिढा अखेर सुटला आहे.131 जागांपैकी शिवसेनेला 87 जागा तर मित्र पक्ष असणाऱ्या भाजपला 40 जागा देण्यात आल्या आहेत.तर मुंब्रा विकास आघाडीला 4 जागा सोडण्यात आल्या आहेत. ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी सेनेच्या अधिकृत उमेदवारांना अर्जाचे वाटप करण्यात आले. तर भाजपच्या वतीने देखील वर्तक नगर येथील कार्यालयात अर्जाचे वाटप करण्यात आले.आज सकाळी पासून उमेदवार अर्ज भरण्यास सुरुवात करणार आहेत.

पनवेल पालिका निवडणूक महाविकास आघाडीचे जागावाटप

पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा पूर्णत्वास येत आहे. आघाडीतील पक्षांना खालीलप्रमाणे जागा देण्याबाबत एकमत झाले आहे.महाविकास आघाडी अंतर्गत शेतकरी कामगार पक्षाला ३३ जागा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) १९ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना ७ जागा देण्यात येणार आहेत. याशिवाय काँग्रेस पक्षाला १२ जागा, मनसेला २ जागा, समाजवादी पार्टीला १ जागा आणि वंचित बहुजन आघाडीला १ जागा देण्यावर सहमती झाली आहे.

अकोल्यात महायुती फिस्कटली; भाजप-राष्ट्रवादी एकत्र लढणार, तर शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा

अकोल्यातून मोठी बातमी.. अकोल्यात महायुती फिस्कटली आहेये.. भाजप-राष्ट्रवादी एकत्र येत युतीची घोषणा केलीय...तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिलाय... महायुतीमधील जागावाटप फिस्कटल्याने अखेर शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.. काल रात्री उशिरापर्यत मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात पक्षाची बैठक पार पडली.. या बैठकीत शिवसेनेने हा 'ऐकला चलो रे'चा नारा दिलाय... त्यामुळे अकोला महापालिकेच्या निवडणूकीत भाजप अन अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित लढणारेये... तर शिवसेना पक्ष 80 जागांवर आपले उमेदवार देणारेये, अशी घोषणा शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केलीए.. मात्र, नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी मोजके काही तास राहिले, अशातही मंत्री संजय राठोड यांनी महायुती टिकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटलेये.

अकोला महापालिकेत 'भाजप-राष्ट्रवादी' युतीची घोषणा; 80 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी देणार उमेदवार

अकोला महापालिकेत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युतीची घोषणा झालीय.. काही जागा वाटपावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तिढा होता. मात्र राष्ट्रवादीचे मंत्री इंद्रनील नाईक, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि भाजपचे आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे यांच्या चेर्चेतून अखेर तिढा सुटलाये. भाजप आणि राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषदेतून युतीची घोषणा केलीय.. 80 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी निवडणूक लढणार तर उर्वरित जागांवर भाजप उमेदवार देणारेये.. काही जागांवर भाजप मैत्रीपूर्ण लढतीच्या तयारीत असल्याचे चित्र आहेये.. मात्र, शिंदेसेनेने स्वबळाचा नारा दिलाय

अकोल्यात शिंदेसेनेच्या सुरु बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची हजेरी, कारण...

भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती अकोल्यात जाहीर झाली खरी, मात्र ही युती जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री इंद्रनील नाईक आणि आमदार अमोल मिटकरी शिंदे यांच्या शिवसेनेची बैठक सुरू असलेल्या हॉटेलमध्ये दाखल झाले.. आणि भाजपसोबत युती का केली?, याची भूमिका मंत्री संजय राठोड आणि शिवसेनेच्या नेत्यांना समजावून सांगितली. अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेला महायुतीत न घेतल्यामुळे शिंदे सेनेवर स्वबळावर लढण्याची वेळ आलीय.. मूर्तिजापूर रोडवरच्या शिंदेंच्या शिवसेनेची बैठक सुरू असलेल्या आरजी हॉटेलमध्ये इंद्रनील नाईक आणि मिटकरी यांनी मंत्री संजय राठोड आणि सेनेच्या नेत्यांची भेट घेतलीय. युती न झाल्यामुळे दुरावा नको म्हणून भेट घेतल्याचं मंत्री इंद्रनील नाईकांनी स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान, अकोल्यात भाजप 80 पैकी 66 जागा तर अजित पवारांची राष्ट्रवादी 14 जागांवर लढणारेये.

अमित देशमुख यांच्या या भाषणानंतर लातूर मध्ये काँग्रेसची सहानुभूती वाढणार...

महापालिकेच्या तोंडावर लातूर शहरात काँग्रेसला गळती लागल्याच चित्र पाहायला मिळाल, माजी महापौर यांच्यासह अनेक काँग्रेसच्या नगरसेवकांनी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश केला , त्यामुळे महापालिका निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांची प्रतिष्ठा ही, खऱ्या अर्थाने पणाला लागली आहे ,मात्र लातूरची संस्कृती ही, वेगळी आहे., इथे विकासाला आणि गुणवत्तेला मत दिलं जातं ,बंडखोरीला नाही. एखादा पक्ष बदलल्यानंतर राज्यात आणि देशात काय घडत ते आपण पाहतो. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलला तरी लातूरची जनता ही विकासाच्या आणि गुणवत्तेच्या पाठीमागे उभी राहते. लातूरने जेव्हा-जेंव्हा लोकप्रतिनिधी निवडले तेंव्हा त्यांनी कधीही कर्तव्यात कसूर ठेवली नाही, हे लातूरच वेगळं वैशिष्ट्य असल्याच आ अमित देशमुख त्यांनी एका भाषणादरम्यान सांगितलं, तर त्यांच्या या भाषणामुळे गळती लागलेल्या काँग्रेसला लातूर मध्ये सहानुभूतीची चर्चा होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com