Tanvi Pol
गर्भधारणेदरम्यान काळात शांत आणि सकारात्मक विचार ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
दररोज ध्यान, प्राणायाम किंवा योगसाधना करून मन स्थिर ठेवा.
कुटुंबीय आणि मित्रांशी नियमित संवाद ठेवल्यास मानसिक आधार मिळतो.
चिंता, भीती वाटत असल्यास ते मनात न ठेवता डॉक्टरांशी मोकळेपणाने बोला.
हसत-खेळत राहणं, चांगले संगीत ऐकणं यामुळे मन आनंदी राहतं.
पुस्तक वाचन, चित्रकला, शिवणकाम यासारखे छंद जोपासा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.