

उमेदवारी अर्जांच्या अखेरच्या दिवशी भाजपला मोठा धक्का
अमोल बालवडकर यांनी भाजप सोडून अजित पवार गटात प्रवेश केला
उमेदवारी नाकारल्याने उघड नाराजी व्यक्त
सागर आव्हाड, साम प्रतिनिधी
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपमध्ये नेत्यांची नाराजी उफाळून आलीय. या नाराजीचा फटका पुण्यात बसलाय. भाजपचे नेते अमोल बालवडकर यांनी पक्षाची साथ सोडत अजित पवार गटात प्रवेश केलाय. उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली आणि राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या हाती बांधलं.
विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याने माघार घेतली. एक लाखाच्या मताधिक्याने चंद्रकांत पाटील यांना निवडून आणलं त्यानंतरही भाजपने माझ्यासोबत दगा फटका केला. मला दोन दिवस अगोदर जरी सांगितलं असतं तरी मी ऐकलं असतं, मात्र ऐनवेळी मला उमेदवारी नाकारली. आता मी अजितदादांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे अमोल बालवडकर म्हणालेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता तो शब्द पाळला गेला नाही. यामध्ये भाजपचे नुकसान आहे, माझं नाही. मी विधानसभेला चंद्रकांत पाटलांच्या विरोधात काम केलं होतं. याचं नुकसान माझ्यापेक्षा जास्त भाजपाला होणार आहे, याचा फटका भाजपा बसेल, असंही ते म्हणाले. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या वादामुळेच त्यांना तिकीट देण्यास पक्षाने नकार दिल्याचं सांगितलं जात आहे. ऐनवेळी तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या अमोल बालवडकर यांनी जिजाई गाठत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
अमोल बालवडकर हे बाणेर-बालेवाडीमधून इच्छुक होते. याच प्रभागातून २०१७ ते २०२२ काळात ते नगरसेवक राहिले होते. तरीही पक्षाने त्यांना उमेदवारीसाठी शेवटपर्यंत ताटकळत ठेवले. निष्ठावंत असूनही पक्षाने दिलेल्या वागणुकीमुळे बालवडकर दुखावले गेले. शेवटी त्यांनी अजित पवार यांना फोन करून पक्ष प्रवेशाची बोलणी केली.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी अमोल बालवडकर हे इच्छुक होती. पक्षाकडे उमेदवारीसंदर्भात त्यांनी बोलणीही केली होती. परंतु पक्षाने चंद्रकांत पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. या सगळ्यात बालवडकर-चंद्रकांत पाटील यांच्यात छुपे युद्ध सुरू झाले. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी बालवडकर यांची समजूत काढून पुढील काळात न्याय देतो, असा शब्द दिला. परंतु महानगरपालिका निवडणुकीत त्यांना डावलण्यात आलं.
दरम्यान राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजपवर टीका केली आहे. पक्षाने माझ्यासोबत दगा फटका केला. शेवटच्या क्षणांपर्यंत मला झुंजवलं. पण ऐनवेळी मला तिकीट नाकारलं. त्यानंतर मी अजित पवार यांना संपर्क करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी मोठ्या मनाने उमेदवारी देखील दिली, यात माझे काहीही नुकसान झाले नसल्याचं बालवडकर म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.