Sakshi Sunil Jadhav
तुम्ही ऐकलंच असेल की दारु प्यायल्यावर माणसं अचानक Emotional होतात आणि त्यांना जुनी नाती आठवतात.
दोन पेग घेतली की काही लोक अचानक शांत होतात, त्यांच हसणं थांबतं आणि काहींना अश्रू अनावर होतात. पण असं का? जाणून घेऊयात.
मेंदूचा पुढचा भाग आपल्याला काय बोलायचंय, काय टाळायचं हे ठरवतो. दारू प्यायल्यावर हा भाग नीट काम करत नाही, त्यामुळे नियंत्रण कमी होतं.
प्रेम, राग, पश्चात्ताप, दुःख या भावना आपण शुद्धीत लपवतो. नशेत त्या थेट बाहेर पडतात.
दारूमुळे मेंदूत उत्साह निर्माण होतो. त्या क्षणी 'काहीही करू शकतो' असं वाटतं. लाजाळू किंवा शांत स्वभावाचे लोक नशेत जास्त बोलतात आणि भावूक होतात.
उद्या काय होईल, समोरचा काय समजेल याचा विचार राहत नाही. त्या क्षणाची भावना खरी वाटते.
दारूमुळे मेंदू एका आठवणीत अडकतो. जुनं प्रेम, नाती, आठवणी डोळ्यासमोर येत असतात.
भावना लगेच व्यक्त कराव्यात असं वाटतं. म्हणूनच रात्री उशिरा फोन किंवा मेसेज केले जातात. भावनिक नियंत्रण कमी झाल्यामुळे काहीजण रडतात, तर काहीजण पुर्ण वेळ हसतात.