Medu Vada SAAM TV
लाईफस्टाईल

Medu Vada : १ थेंबही तेल न वापरता घरी १५ मिनिटांत बनवा कुरकुरीत मेदूवडा, नोट करा सोपी रेसिपी

Oil Free Medu Vada : अनेकांना आवडणारा मेदूवडा तेलाचा वापर न करता काही मिनिटांत घरी बनवता येतो. सोपी रेसिपी जाणून घ्या आणि आपले आरोग्य जपा. आपल्या डाएटमध्ये १ थेंबही तेल न वापरता बनवलेल्या मेदूवड्याचा आजच समावेश करा.

Shreya Maskar

नाश्त्याला सर्वात जास्त प्रमाणात खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे मेदूवडा. कारण एक मेदूवडा खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. मात्र मेंदू वडा जास्त प्रमाणात तेल खात असल्यामुळे आरोग्यास घातक ठरतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढून हृदयासंबंधित समस्या निमार्ण होतात. तसेच तेलामुळे कॅलरीज वाढून लठ्ठपणा येतो.

आरोग्याच्या समस्या उद्भवू नये आणि आपल्याला मेदूवड्याचा मनसोक्त आस्वाद घेता यावा यासाठी आपण तेलाचा वापर न करता मेदूवडा बनवायला शिकणार आहोत. साधी, सोपी रेसिपी पटकन नोट करा.

साहित्य

कृती

तेल न वापरता चटपटीत मेदूवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम उडीद डाळ ५ ते ६ तास भिजवून मिक्सरला बारीक वाटून घ्यावी. तसेच यात एक तुकडा बर्फ, धणे, आलं टाकून छान पेस्ट करून घ्या. मिक्सरमध्ये बर्फ घातल्यामुळे डाळ मस्त बारीक होते. तयार झालेली पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर, ओले खोबरे, हिंग आणि कढीपत्ता घालून छान मिक्स करून घ्या. आता हे तयार झालेले पीठ ८ तासांसाठी बाजूला ठेवून द्या. त्या पीठावर आवर्जून ओला कपडा ठेवा.

पीठ व्यवस्थित झाले हे तपासण्यासाठी छोटा पिठाचा गोळा घेऊन पाण्यात टाका जर गोळा पाण्यात तरंगला म्हणजे पीठ मस्त तयार झाले. या पिठापासून बनवलेले वडे खायला चविष्ट लागतील आणि मऊ होतील. जेव्हा वडे करायची वेळ येईल तेव्हा त्यामध्ये तांदळाचे पीठ आणि मीठ घालून मिश्रण छान एकजीव करून घ्या. थोड्या वेळाने त्यात इनो घाला. आता दुसरीकडे एका मोठ्या पॅनमध्ये गरम पाणी करा. कारण त्यात आपल्याला वडे तळायचे आहे. पाण्यावर वडे तळण्यासाठी चहाच्या गाळणीमध्ये वड्याचे पीठ ठेवून ती गाळणी गरम पाण्यात ठेवा आणि त्यावर छोटे झाकण ठेवा. पाण्याच्या वाफेमुळे वडा ८ते १० मिनिटांत चांगला शिजेल. त्यानंतर पॅन गरम करून त्यावर हा वाफवलेला वडा शेलो फ्राय करून घ्या. अशाप्रकारे तेलाचा वापर न करता कुरकुरीत मेदूवडे तयार झाले. तुम्ही नारळाच्या चटणीसोबत किंवा सांबार बरोबर याचा आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT