Medu Vada Recipe: कुरकुरीत आणि टेस्टी; नाश्त्याला बनवा टम्म फुगलेला मेदूवडा

How To Make Medu Vada At Home: अण्णा जसा मेदूवडा बनवतो तसा सॉफ्ट आणि ऑईल फ्री मेदूवडा अनेकांना घरामध्ये बनवता येत नाही. त्यामुळे आज घराच्याघरी बनवता येईल यासाठी याची परफेक्ट रेसिपी जाणून घेऊ
Medu Vada Recipe: कुरकुरीत आणि टेस्टी; नाश्त्याला बनवा टम्म फुगलेला मेदूवडा
Medu Vada RecipeSaam TV
Published On

बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असलेला मेदूवडा खायला सर्वांनाच आवडतो. दक्षिण भारतातल्या या पदार्थाने महाराष्ट्रातील नागरिकांना देखील वेड लावलं आहे. प्रत्येक व्यक्तीला या मेदूवड्याची चव चाखायला आवडते.

मेदूवडा डाळ, सांबार, खोबऱ्याची चटणी इतकंच नाही तर दह्यासोबत देखील अगदी चविष्ट लागतो. नाश्त्याला अनेक घरांमध्ये हा पदार्थ हमखास बनवला जातो. मात्र अण्णा जसा मेदूवडा बनवतो तसा सॉफ्ट आणि ऑईल फ्री मेदूवडा अनेकांना घरामध्ये बनवता येत नाही. त्यामुळे आज घराच्याघरी बनवता येईल यासाठी याची परफेक्ट रेसिपी जाणून घेऊ.

Medu Vada Recipe: कुरकुरीत आणि टेस्टी; नाश्त्याला बनवा टम्म फुगलेला मेदूवडा
Weird Tradition Virginity: तुझ्या व्हर्जिनीटीचा पुरावा काय? गावातील विचित्र प्रथा पाहून तुमचंही डोकं चक्रावेल

साहित्य

२ कप उडीद डाळ

२-४ हिरव्या मिरच्या

२ चमचे कोथिंबीर

१ टेस्पून आले

कढीपत्ता

१/४ कप ओल्या नारळाचे तुकडे

५-१० काळी मिरी

चवीनुसार मीठ

तळण्यासाठी तेल

आवश्यकतेनुसार पाणी

कृती

सर्वात आधी आदल्या दिवशी उडीद डाळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी ही डाळ मिक्सरला बारीक करून घ्या. डाळीची छान पेस्ट बनवून ती एका भांड्यात काढून ठेवा. सकाळी हे पीठ फॉरमेट होईल.

आता मेडूवडा बनवायला घेताना आधी पिठात थोडं मीठ घालून घ्या. तसेच यामध्ये थोडी मिरची कोथिंबीर देखील चिरून मिक्स करा. त्यानंतर पीठ जास्त घट्ट असेल तर सैल करण्यासाठी यामध्ये थोड पाणी मिस्क करा.

पुढे कढईत तेल तापण्यासाठी ठेवा. या तेलात तुम्हाला मेदूवडा थेट टाकताना अंगावर तेल उडण्याची भीती वाटत असेल तर पाळीच्या साहाय्याने मेदूवडा त्यात सोडा. त्यानंतर झटपट सर्व मेदूवडे तळून घ्या.

चटणी बनवण्यासाठी

हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आले, मिरी, नारळाचे तुकडे एकत्र मिक्सरला बारीक करून घ्या. पुढे यामध्ये पाणी टाकून छान चटणी बनवून घ्या. या चटणीला कढीपत्ता आणि जिरे मोहरीची फोडणी द्या. त्यावर झाला तुमचा क्रिस्पी मेदूवडा आणि झणझणीत चटणी.

Medu Vada Recipe: कुरकुरीत आणि टेस्टी; नाश्त्याला बनवा टम्म फुगलेला मेदूवडा
Gudi Padwa Traditional Look: गुढीपाडव्याला पारंपारिक नऊवारी नेसाण्याचा विचार करताय? 'या' टिप्स फॉलो करा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com