Vishal Gangurde
अनेकांचा आवडता नाश्ता
अनेकांना नाश्त्यासाठी दक्षिण भारतीय पदार्थ खूप आवडतात. त्यापैकी एक मेदूवडा.
तुम्हाला इडली आणि डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर रवा मेदूवडा तयार करू शकता.
उदीड डाळीपासून बनवलेला मेदूवडा पचायला जड असतो, त्यामुळे रव्यापासून बनवलेला मेदूवडा पचायला सोपा असतो.
रवा मेदूवडा बनविण्यासाठी रवा एका कढईत टाकून पाणी, तेल आणि मीठ घालून शिजवून घ्या.
शिजवलेल्या रव्यामध्ये कढीपत्ता, काळी मिरी, जिरे मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस मिसळून घ्या.
गॅसवर कढईत तेल घालून कढई गरम करायला ठेवा. त्यानंतर रव्याचे मेदूवडे मध्यम आचेवर तळून घ्या.
तुमचे गरमगरम मेदवडे तयार, आता ते नारळाच्या चटणी, सांबारसोबत खाऊ शकता.