Vishal Gangurde
गूळ शरीरासाठी आरोग्यदायी आहे. गूळ खाल्ल्याने शरीराला अनेक पोषकतत्वे मिळतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या ६ लोकांनी गूळ खाऊ नये.
मधुमेही रुग्णांनी गूळ खाऊ नये
१० ग्रॅम गुळामध्ये ९.७ ग्रॅम साखर आढळते. मधुमेह असणाऱ्यांनी गूळ खाल्ल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
तुम्ही वजन कमी करत असाल तर गूळ खाणे चांगले नाही. कारण १०० ग्रॅम गुळामध्ये ३८५ कॅलरी असते. कॅलरी अधिक असल्याने दररोज गुळाचं सेवन केल्यास वजन कमी करण्यास अडथळे येईल.
संधिवात आजार असलेल्या लोकांनी गूळ खाऊ नये
संधिवाताच्या आजाराने त्रस्त आहात, तर गूळ खाणे चांगले नाही. या आजारात गूळ खाल्ल्याने संधिवाताचा अधिक त्रास जाणवण्याची शक्यता असते.
बद्धकोष्ठता असताना गूळ खाऊ नये
बद्धकोष्ठता असताना गूळ खाणे टाळले पाहिजे. गूळ स्वभवाने उष्ण असतो,त्यामुळे त्याचे सेवन केल्याने पचनाची समस्या निर्माण होऊ शकते.
कोलायटिस हा आतड्याचा एक आजार आहे. या आजाराने त्रस्त असणाऱ्यांनी गूळ खाऊ नये.
उन्हाळ्यात अधिक प्रमाणात गूळ खाल्ल्यास नाकातून रक्तस्राव होण्याची समस्या निर्माण होते. नाकातून रक्तस्राव होण्याची समस्या असणाऱ्यांनी उन्हाळ्यात गूळ खाऊ नये.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा