Medu Vada Recipe: डाळ न भिजवता बनवा घरच्या घरी साउथ इंडियन स्टाईल मेदूवडा; सोपी रेसिपी वाचा

Medu Vada Recipe in Marathi: साउथ इंडियन पदार्श हे खाण्यासाठी चविष्ट आणि पचनासाठीही हलके असतात. अनेकांच्या घरी सुट्टीच्या दिवशी मेदूवडा बनवला जातो. मेदूवडा बनवण्यासाठी रात्री डाळ भिजवावी लागते.
Medu Vada Recipe: डाळ न भिजवता बनवा घरच्या घरी साउथ इंडियन स्टाईल मेदूवडा; सोपी रेसिपी वाचा
Medu Vada RecipeSaam TV
Published On

साउथ इंडियन पदार्थ हे सर्वांनाच आवडतात. इडली, डोसा, मेदूवडा हे पदार्थ लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडीने खातात. इडली डोसा किंवा मेदूवडा बनवण्यासाठी रात्रीच डाळ- तांदूळ भिजत घालावे लागतात. डाळ- तांदूळ भिजवल्याशिवाय ही रेसिपी होणे अशक्य आहे. परंतु अनेकदा आपण डाळ भिजत घालायला आपण विसरतो. परंतु तुम्ही डाळ भिजत न घालतादेखील कुरकुरीत मेदूवडा बनवू शकता.

डाळ भिजत न घालता मेदूवडा बनवण्यासाठी तुम्ही रवा आणि पोह्याचा वापर करु शकता. रवा आणि पोह्यांपासून मेदूवडा कसा बनवायचा याची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

साहित्य

पोहे, बारीक रवा, मीठ,दही, उकडलेले बटाटे, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, आले, हिंग, बेकिंग सोडा, तेल हे साहित्य तुम्हाला मेदूवडा बनवण्यासाठी आवश्यक आहे.

कृती

सर्वप्रथम तुम्ही पोहे मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. त्यात कपभर बारीक रवा टाका.या मिश्रणात आवश्यकतेनुसार मीठ मिक्स करा. या मिश्रणात एक कप दही टाकून घ्या. यात बिल्कुल पाणी टाकू नका. यानंतर मिश्रणाचे गोळे तयार करुन घ्या. या मिश्रणावर ५ मिनिटे झाकण टेवून द्या. पाच मिनिटानंतर या मिश्रणात उकडलेला बटाटा टाकून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या.

Medu Vada Recipe: डाळ न भिजवता बनवा घरच्या घरी साउथ इंडियन स्टाईल मेदूवडा; सोपी रेसिपी वाचा
Photography : फोटोग्राफी प्रेमींनी भारतातील 'या' ठिकाणांना आवर्जून भेट द्या, निसर्गाचे अद्भुत सौंदर्य अनुभवा..

या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले हिरवी मिरची, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर टाका. यात हिंग आणि बेकिंग सोडा टाका.हे मिश्रण एकत्र करुन घ्या. या पीठाचे वडे तयार करा. त्यानंतर कढईत तेल टाकून मंद आचेवर तळून घ्या. हे वडे तुम्ही सांबर किवा चटणीसोबत खाऊ शकता.

Medu Vada Recipe: डाळ न भिजवता बनवा घरच्या घरी साउथ इंडियन स्टाईल मेदूवडा; सोपी रेसिपी वाचा
Monsoon Energy Drinks : पावसाळ्यात हे एकदा ट्राय करून बघा! चहा-कॉफीला कराल टाटा, बाय-बाय!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com