Weird Tradition Virginity: तुझ्या व्हर्जिनीटीचा पुरावा काय? गावातील विचित्र प्रथा पाहून तुमचंही डोकं चक्रावेल

स्वत: आई आपली मुलगी कौमार्य आहे की नाही हे तपासते.
Weird Tradition Virginity
Weird Tradition VirginitySaam TV
Published On

Traditions in Africa: लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे गैर आहे असं म्हटलं जातं. मात्र सध्याची तरुण पिढी लग्नाआधीच एकमेकांच्या फार जवळ आलेली असते. प्रत्येक देशात वेगेवगळ्या चालीरिती आहेत. अशात अफ्रिकेत आजही मुलींना लग्नाआधी त्यांचे कौमार्य म्हणजेच व्हर्जिनीटी सिद्ध करावी लागते. स्वत: आई आपली मुलगी कौमार्य आहे की नाही हे तपासते. (Latest Marathi News)

आफ्रिकेतल्या (Africa) झुलू जमातीमध्ये ही प्रथा मानली जाते. या परंपरेला उमेमुलो असंही म्हणतात. सदर परंपरेचा अनेक मुली विरोध करत आहेत. मुलांसाठी कोणतीही अट नाही आणि मुलींसाठी लग्नाआधी व्हर्जिनीटी सिद्ध करण्याच्या अटी आहेत. लग्नाआधी मुलीने शारीरिक संबंध ठेवणे गैर मानले जाते. आफ्रिकेतल्या या परंपरेची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

Weird Tradition Virginity
Delhi Metro Viral Video: किती तो नटापटा! पोरीनं थेट मेट्रो ट्रेनमध्ये उघडलं पार्लर; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

व्हर्जिनीटी पार्टी

झुलू जमातीच्या या प्रथेत मुलगी २१ वर्षांची झाल्यावर जंगी पार्टीचं आयोजन केलं जातं. या पार्टीला (Party) कुटुंबातील सर्व व्यक्ती आनंदाने सहभागी होतात. मुलीचे आई बाबा आपल्या मुलीसाठी पार्टीमध्ये तिच्या आवडीचे पदार्थ ठेवतात. तसेच परिवारातील सर्व पाहूण्यांना निमंत्रण दिले जाते. आमची मुलगी २१ वर्षांची झाली असून अजूनही ती व्हर्जिन आहे. असं पालक सर्वांना आनंदाने सांगतात.

व्हॉइस इंडियातल्या एका लेखात थेंबला या झुलू जमातीच्या महिलेने देखील आपल्या आयुष्यातील हा प्रसंग सर्वांना सांगितला आहे. तिने म्हटलं आहे की, मी २१ वर्षांची झाल्यावर ६ महिन्यांनी आमच्या घरी या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टीला सर्व नातेवाईक आले होते. या दिवशी माझ्यासाठी सर्वांनी सुंदर गिफ्ट्स देखील आणले होते.

Weird Tradition Virginity
Viral Cricket Video: फलंदाजाचा सुर्या स्टाईल सुपला शॉट अन् प्रेक्षकाने टिपला त्याहुन भन्नाट कॅच! VIDEO पाहायलाच हवा..

गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या परंपरेचा आता विरोध केला जात आहे. अनेक तरुणी अशा पद्धतीने टेस्ट करण्यास नकार देत आहेत. कारण येथे स्त्री- पुरुष समानतेचा मुद्दा उपस्थित राहतो. गावातील परंपरेनुसार, फक्त मुलींना त्यांचे कौमार्य सिद्ध करावे लागते त्यामुळे याचा विरोध होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com