Glass Piece Found In Coffee: चाललंय काय? हॉटेलमधील कॉफीत आढळले काचेचे तुकडे, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ, Video

Amaravati News: अमरावती शहरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती शहारातील एका हॉटेलमध्ये कॉफीत काचेचे तुकडे आढळल्याची घटना घडली आहे. या घटनेने अमरावतीत खळबळ उडाली आहे.
Glass Particles Found In Coffee: चाललंय काय? हॉटेलमधील कॉफीत आढळले काचेचे तुकडे, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ, Video
Glass Particles Found in Cold CoffeeSaam TV

अमर घटारे,साम टीव्ही प्रतिनिधी

अमरावती : मुंबईत बटरस्कॉच आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळल्याची घटना ताजी असताना एका हॉटेलमध्ये कॉफीच्या ग्लासमध्ये चक्क काचेचे तुकडे आढळल्याची घटना समोर आली आहे. अमरावतीत हॉटेलमधील कॉफीच्या ग्लासमध्ये काचेचे लहान-मोठे तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने कॉफी पिणाऱ्या युवकांना कोणतीही इजा झाली नाही. अशा प्रकारच्या वाढत्या प्रकारामुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या कॅम्प परिसरातील एका हॉटेलमध्ये कॉफी पिताना ग्राहकांच्या ग्लासमध्ये काचेचे तुकडे आढळले. कॉफी पिताना अचानक काचेचे तुकडे दिसल्याने ग्राहकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. या तरुणांनी हॉटेल संचालकाला जाब विचारला.

Glass Particles Found In Coffee: चाललंय काय? हॉटेलमधील कॉफीत आढळले काचेचे तुकडे, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ, Video
Ice cream : ऑनलाईन आईसस्क्रिम मागवताय, सावधान! आईसस्क्रीममध्ये सापडलं माणसाचं बोट; व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?

या घटनेत ग्राहकांना कोणतीही इजा झाली नाही. या प्रकरणी दोन्ही तरुणांनी हॉटेल संचालकाविरोधात अन्न आणि औषध प्रशासनात तक्रार केली आहे. या प्रकारामुळे हॉटेल संचालकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

अमरावतीमधील सुमेध इंगळे आणि अभिजीत वानखेडे हे दोन युवक शहरातील कॅम्प परिसरातील एनसीसीस कॅन्टीन समोरील एका हॉटेलमध्ये गेले होते. या दोघांनी कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. काही वेळानंतर दोन्ही युवकांना कॉफी देण्यात आली.

Glass Particles Found In Coffee: चाललंय काय? हॉटेलमधील कॉफीत आढळले काचेचे तुकडे, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ, Video
Mumbai Shocking News: खळबळजनक! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये आढळलं माणसाचं कापलेलं बोट

यावेळी कॉफी पिताना दोन्ही युवकांना ग्लासमध्ये काचेचे तुकडे आढळले. त्यानंतर कॉफी अर्धवट सोडून त्यांनी हॉटेल संचालकांना जाब विचारला. दरम्यान, हा गंभीर प्रकार वेळेत लक्षात आल्याने सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com