Amaravati Express Fire : दादर रेल्वे स्थानकात अमरावती एक्सप्रेसला आग, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

Amaravati Express Fire Latest Update : अनेकांकडून सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वे प्रवासाला पसंती दिली जाते. मात्र, याच एक्सप्रेसला किरकोळ आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी दादर रेल्वे स्थानकात घडली.
Amaravati Express Fire :
Amaravati Express Fire :Saam tv

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : उन्हाळा सुरु झाल्याने अनेक प्रवासी मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे. मुंबईत काम करत असलेल्या नोकरदारांना या दिवसांत शहरातून गावाकडे जाण्याचा ओढा असतो. त्यात स्त्यावरील वाढते अपघात पाहता अनेकांकडून सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वे प्रवासाला पसंती दिली जाते. मात्र, याच एक्सप्रेसला किरकोळ आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी दादर रेल्वे स्थानकात घडली.

विदर्भातून अमरावती एक्सप्रेस मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकात आली. अमरावती एक्स्प्रेस दादर रेल्वे स्थानकात आल्यानंतर तिला किरकोळ आग लागली. एक्स्प्रेसच्या ब्रेकमधून धूर निघू लागला. ही घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.

Amaravati Express Fire :
Malshej Ghat Accident: मोठी बातमी! माळशेज घाटात भीषण अपघात; पती पत्नीसह चौघांचा मृत्यू

एक्सप्रेसला किरकोळ आग लागल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रवाशांना गाडीतून बाहेर काढले. एक्स्प्रेसच्या कोचमधून धूर लागल्याने यंत्रणा सतर्क झाली. त्यानंतर तातडीने या आगीवर यश मिळविण्यास यश आलं.

Amaravati Express Fire :
Amaravati Water Crisis News | अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भीषण पाणीटंचाई, पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल

किरकोळ आगीवर नियंत्रण

एक्सप्रेसच्या कोचमधून धूर लागल्याने प्रवाशांना उतरवलं. त्यानंतर आगीवर तातडीने नियंत्रण मिळवून अमरावचीच्या दिशेने ट्रेन रवाना करण्यात आली. अमरावती एक्स्प्रेसच्या बी ९ कोच मधून धूर येत असल्याचं लक्षात येताच यंत्रणा सक्रिय झाल्या. त्यांनी या किरकोळ आगीवर नियंत्रण मिळवलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com