Mumbai Shocking News: खळबळजनक! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये आढळलं माणसाचं कापलेलं बोट

Mumbai News: सोशल मीडियावर कायम अनेक विचित्र घटना समोर येत असतात. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरलही होतात. मात्र अशातच मुंबईमधून एक घटना समोर आली आहे,ज्यात एका महिलेनं आईस्क्रिम ऑनलाईन मागवले असता आईस्क्रीममध्ये कापलेलं बोट आढळून आलं आहे.
Mumbai News
Mumbai Shocking NewsSaam Tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईमधून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. जेथे एका महिलेनं ऑनलाईन आईस्क्रीम मागवलं होतं. मात्र ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये कापलेलं बोट आढळून आलं आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

Mumbai News
Shocking News : दिल्ली-वाराणसी विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन; प्रवाशांनी खिडकीतूनच मारल्या उड्या, धक्कादायक VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई(Mumbai) शहरातील मालाडमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवारी १२ जूनला एका आईस्क्रीममध्ये कापलेलं बोट आढळून आलं आहे. ऑनलाईन आईस्क्रीम मागवलं होतं. ऑर्लेम ब्रेंडेन सेराओ (वय २७) या नावाच्या व्यक्तीने बुधवारी ऑनलाइन डिलिव्हरी अॅपद्वारे आइस्क्रिमची ऑर्डर दिली होती. आईस्क्रीम खाताना त्यात कापलेलं बोट आढळलं.

या व्यक्तीने बटस्कॉच फ्लेव्हरचे आइस्क्रिम(Ice-Cream) मागवले होते. त्याने आईस्क्रीमच्या बॉक्सचे झाकण उघडताच त्याला बोट दिसले. त्यानं हे बोट बाहेर काढले. जवळपास २ सेमी लांबीच्या बोटाचा तुकडा दिसला. या घटनेमुळे ऑनलाईन कोणती गोष्ट मागवणे आता असुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.

ऑर्लेम ब्रेंडन सेराओ हे एमबीबीएस डॉक्टर(doctor) आहेत. त्यामुळे त्यांना आइस्क्रिममध्ये बोट असल्याचे समजले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी तपासणी करत आहे. आईस्क्रीममध्ये आढळलेल्या बोटाचा तुकडा प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवण्यात आला आहे. हे आईस्क्रीम कुठे बनवले जाते, कुठे पॅक केले जाते, याबाबत शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Mumbai News
Shocking News : जोरदार धडकेनंतर दुचाकीस्वार हवेत उडाला; मृतदेह पडला टपावर, तरीही कार १८ किलोमीटरपर्यंत दामटवली

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com