कोमल दामुद्रे
उन्हाळा सुरु झाला की, बाजारात सर्वत्र आंबे पाहायला मिळतात.
आंब्यापासून आपण अनेक टेस्टी आणि हेल्दी पदार्थ बनवतो.
जर तुम्हालाही आंब्यापासून झटपट काही बनवायचे असेल तर आंब्याची आइस्क्रीम बनवू शकता. जाणून घ्या सोपी रेसिपी
हापूस आंबा प्युरी - १ वाटी, फुल फॅट दूध - १ कप, दूध पावडर- १ कप, फ्रेश क्रीम- १ कप, पिठीसाखर- १/२ कप
मिक्सरच्या मोठ्या भांड्यात दूध, दुधाची पावडर, फ्रेश क्रिम, हापूस आंब्याचा गर आणि पिठीसाखर घालून नीट ग्राइंड करुन घ्या.
तयार मिश्रण एका भांड्यात घेऊन वरुन आंब्याच्या फोडी घाला. डब्याला झाकण लावून १० ते १२ तास फ्रीजरमध्ये सेट होण्यास ठेवा.
सेट झालेले आंब्याचे मिश्रण सर्व्हिंग बाउलमध्ये स्कूपने काढा. वरुन टूट्री-फूट्री, ड्रायफ्रूट्स आणि आंब्याचे काप घाला.
सर्व्ह करा गारेगार आंब्याची आइस्क्रिम.