Solapur News: सोलापूर हादरले! डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीने संपवलं जीवन

Doctor End Life In Solapur: डॉक्टर पतीच्या शारिरीक आणि मानसिक त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सांगोलामध्ये घडली आहे. याप्रकरणी डॉक्टर पतीविरोधात सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Solapur News: सोलापूर हादरले! डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीने संपवलं जीवन
Sangola Police StationSaam Tv

भरत नागणे, पंढरपूर

डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सोलापूर हादरले आहे. सोलापूरच्या सांगोलामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सांगोल्याच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सांगोला पोलिसांनी (Sangola Police) डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिस फरार डॉक्टराचा शोध घेत आहेत.

डॉक्टर पतीच्या शारिरीक आणि मानसिक त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सांगोलामध्ये घडली आहे. या घटनेनंतर तीन दिवसांनी संशयीत आरोपी डॉक्टर सुरज रुपनर यांच्या विरोधात सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हायप्रोफाईल घटनेनंतर सांगोला आणि पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

संशयीत आरोपी डॉक्टर सुरज रुपनर यांच्यासोबत डॉक्टर ऋचा यांचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. त्यांना दोन लहान मुलं देखील आहेत. लग्नानंतर डॉक्टर सुरज हा पत्नी ऋचाला वारंवार मानसिक आणि शारिरीक त्रास देवून पैशाची मागणी करत होता. सुरज हा व्यभिचारी वागणूक करीत असताना आढळून आल्याने ऋचा यांनी त्यांना विचारणा केली होती. तर सुरज त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करून शारीरिक मानसिक त्रास देऊन बघून घेतो असे सातत्याने धमकावत होते.

आरोपी डॉक्टर सुरज रूपनर हे एमआरआय मशीन विकत घेण्याकरीता माहेरून पैसे घेऊन ये नाहीतर आत्महत्या कर म्हणून सातत्याने ऋचा यांना त्रास देत होता. त्यांच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर ऋचा रुपनर यांनी ६ जून रोजी सांगोला येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करून आपले जीवन संपविले. त्यानंतर सांगोला पोलिस स्टेशनमध्ये ऋचा यांचा भाऊ ऋषिकेश संजय पाटील यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर डॉक्टर सुरज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपी डॉक्टर सुरज रुपनर यांचा शोध सुरु आहे. आरोपीला अटक करून कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर ऋचा यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

डॉक्टर ऋचा यांचा विवाह सांगोला येथील प्रसिध्द फॅबटेक उद्योग समुहाचे प्रमुख आणि शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर यांचा मुलगा डॉक्टर सुरज भाऊसाहेब रुपनर यांच्याशी झाला होता. डॉक्टर सुरज आणि ऋचा हे सांगोला येथील फेबटेक इंजिनिअरिंग कॉलेज वसाहतीमध्ये राहत होते. डॉक्टर सुरज आणि डॉक्टर ऋचा दोघेही एमडी रेडिओलॉजिस्ट होते. दोघेही पंढरपूर येथे वैद्यकीय व्यवसाय करीत होते. डॉक्टर ऋचा यांच्या आत्महत्येमुळे सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com