Shocking News : जोरदार धडकेनंतर दुचाकीस्वार हवेत उडाला; मृतदेह पडला टपावर, तरीही कार १८ किलोमीटरपर्यंत दामटवली

Vijayawada Crime News: दिल्लीत जानेवारी २०२३ मध्ये घडलेल्या भीषण अपघाताच्या घटनेची पुनरावृत्तीच आंध्र प्रदेशात पाहायला मिळाली. अनंतपूर जिल्ह्यात वाय कोटापल्लीजवळच्या राष्ट्रीय मार्गावर भरधाव कारच्या धडकेत चोलसमुद्रम गावातील एका ३५ वर्षाच्या तरूणाचा करूण अंत झाला.
Vijayawada Crime News
Vijayawada Crime NewsSaam Tv

विजयवाडा (Vijayawada) :

मिट्ट काळोख...भयाण शांतता अन् अचानक झालेला कानठळ्या बसवणारा आवाज....भरधाव कार अन् नशेत तर्र असलेला चालक...काही कळायच्या आत सुसाट कार दुचाकीला जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार अक्षरशः हवेत उडून टपावर जोरानं आपटला. तरीही तर्राट असलेल्या चालकानं काही फूट, मीटरपर्यंत नव्हे तर तब्बल १८ किलोमीटरपर्यंत कार दामटवली. हा सगळा थरार रविवारी रात्री आंध्र प्रदेशातील कोटापल्लीजवळच्या राष्ट्रीय मार्गावर घडला.

दिल्लीत जानेवारी २०२३ मध्ये घडलेल्या भीषण अपघाताच्या घटनेची पुनरावृत्तीच आंध्र प्रदेशात पाहायला मिळाली. अनंतपूर जिल्ह्यात वाय कोटापल्लीजवळच्या राष्ट्रीय मार्गावर भरधाव कारच्या धडकेत चोलसमुद्रम गावातील एका ३५ वर्षाच्या तरूणाचा करूण अंत झाला. कारचालक नशेत होता. अनियंत्रित झालेली कार दुचाकीला धडकली. धडकेनंतर जिनी इरा स्वामी हा ३५ वर्षांचा तरूण दुचाकीवरून हवेत उडाला आणि कारच्या टपावर पडला. तरीही, मद्यधुंद चालकानं कार वेगाने दामटवली. गंभीर जखमी झाल्यानं दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. कहर म्हणजे चालकानं टपावर मृतदेह असूनही कार तब्बल १८ किलोमीटरपर्यंत वाऱ्याच्या वेगानं पळवली.

तरूण पेशानं ट्रॅक्टर मॅकेनिक होता. तो दुचाकीवरून रात्री घरी परतत होता. त्याचवेळी भरधाव कारनं त्याच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तरूण काही फूट हवेत उडून कारच्या टपावर जोरानं आपटला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कारचालक दारूच्या नशेत होता. त्यानं अपघातानंतरही कार थांबवली नाही. टपावर मृतदेह असूनही त्यानं कार १८ किलोमीटरपर्यंत नेली, असंही पोलिसांनी सांगितलं.

टपावर मृतदेह बघितल्यानंतर कारचा पाठलाग

अपघाताच्या घटनेनंतर तिथं पोहोचलेल्या स्थानिकांनी आणि इतर चालकांनी टपावर मृतदेह बघितला. त्यांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकानं कार दामटवली. स्थानिक आणि इतर चालकांनी वाहने घेऊन भरधाव कारचा पाठलाग सुरू केला. बेलुगुप्पा मंडलमधील हनुमीरेड्डीपल्लीजवळ त्यांनी कार थांबवली. कारचालकानं तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. काही अंतरावरच त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. तो दारूच्या नशेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Vijayawada Crime News
Buldana Crime News : नाचण्यावरून वाद झाल्याने चाकूने वार करत तरुणाची निर्घृण हत्या; बुलढाण्यातील थरारक घटना

पोलिसांनी कार केली जप्त

पोलिसांनी संबंधित कार जप्त केली आहे. तसेच घटनेचा तपास सुरू केला. मृत तरूणाच्या पश्चात त्याची पत्नी आणि दोन मुले आहेत. तो तरूण घरातला एकमेव कमावता होता. रविवारी तो सासुरवाडीला गेला होता. तिथून रात्री घरी परतत असतानाच हा अपघात झाला.

Vijayawada Crime News
Pune Cyber Crime: CBI चौकशीची भिती दाखवून डॉक्टरला घातला ३० लाखांचा गंडा; पुण्यातील धक्कादायक घटना!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com