शरद पवार पुन्हा खासदार होणार का? संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले...

Rajya Sabha election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त जागांवरून राजकीय हालचालींना वेग. शरद पवार पुन्हा राज्यसभेत जाणार का, यावर संजय राऊत यांची स्पष्ट भूमिका.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ७ जागा रिक्त होत आहेत, त्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपत आहे. आयोगाकडून राज्यसभेच्या या जागांसाठी निवडणूक करताच सत्ताधारी आणि विरोधकांकडून जुळवाजुळव सुरू आहे. शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा आहे. पण संख्याबळामुळे मतांची जुळवाजुळव कशी होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली. दरम्यान, राज्यसभा, विधान परिषदेवरून मविआमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा सध्या रंगल्या आहेत. मविआकडे संख्याबळ कमी असल्यानं मविआ फक्त एकच उमेदवार निवडून आणू शकते, या प्रश्नावर ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी एक सूचक विधान केले आहे.

संजय राऊत म्हणाले की, राज्यसभेबाबत ३ पक्षांना मिळून निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकाही आहेत. त्याच्यावरही निर्णय घ्यावा लागेल. प्रत्येक पक्षाला वाटते की आम्ही मविआचे महत्त्वाचे घटक आहोत. त्यामुळे आम्हाला संधी मिळावी हे प्रत्येकाला वाटणे साहजिक आहे. पण आम्ही एकत्र बसू आणि महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेऊ. मराठी भाषिकांनी संसदेमध्ये जाऊन महाराष्ट्राचे प्रश्न मांडावे यासाठी आम्ही सगळे तिथे जातो. त्यामुळे त्याच गुणवत्तेवरती कुणी तिथे जाऊन प्रतिनिधित्व करायचे हे तीन पक्ष एकत्र बसून ठरवतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com