T20 World Cup 2026
T20 World Cup 2026SAAM TV

T20 World Cup 2026: पाकिस्तानी खेळाडू म्हणतो, भारत सेमीफायनलपर्यंत जाणारच नाही; कारणंही सांगितलं

Mohammad amir prediction: टी२० वर्ल्डकप २०२६ च्या सुपर ८ फेरीपूर्वी मोहम्मद आमिरने टीम इंडियाच्या सेमीफायनल संधींवर धक्कादायक वक्तव्य केलं आहे. तो नेमकं काय म्हणालाय ते पाहूयात.
Published on

आयसीसी टी२० वर्ल्डकप २०२६ चा खेळ आता सुपर ८ राउंडपर्यंत येऊन पोहोचलाय. २१ फेब्रुवारीपासून हा राऊंड खेळवण्यात येणार असून यामध्ये आठ टीम्स सेमीफायनलचं तिकीट मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. या टीम्सना दोन गटात विभागण्यात आलंय. भारत, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या टीम्सचा ग्रुप ए मध्ये समावेश आहे. तर श्रीलंका, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांचा दुसरा ग्रुप आहे. दरम्यान या सामन्यांपूर्वी माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने एक धक्कदायक विधान केलंय.

मोहम्मद आमिरचा धक्कादायक दावा

सुपर ८ फेरी सुरू होण्यापूर्वी मोहम्मद अमीरने केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा रंगलीये. त्याने भाकीत केलंय की, टीम इंडिया या स्पर्धेची सेमीफायनल गाठणार नाही. म्हणजेच त्यांचा प्रवास सुपर ८ फेरीतच संपुष्टात येणार आहे.

T20 World Cup 2026
Abhishek Sharma : सिराजची जर्सी घातली, पण धावांचा 'अभिषेक' नाहीच! वर्ल्ड नंबर १ शर्मा पुन्हा शून्यावर आऊट, कारण चक्रावणारं

या स्पर्धेचा यजमान आणि गतविजेता भारताने त्यांच्या ग्रुपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलीये. गेल्या टी-२० वर्ल्डकपपासून टीम इंडियाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. तरीही मोहम्मद अमीर याने केलेल्या वक्तव्यामुळे सर्वच आश्चर्यचकित झालेत.

काय म्हणाला मोहम्मद अमीर?

मोहम्मद अमीरने जिओ टीव्हीवरील एका कार्यक्रमात सांगितलं की, "भारत टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनल फेरीत पोहोचू शकणार नाही. पाकिस्तानविरुद्धचा सामना वगळता प्रत्येक सामन्यात भारतीय फलंदाजी लाइनअप चांगली नव्हती. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज ज्या पद्धतीने खेळतायत त्यामुळे ते कोणत्याही टीमला हरवू शकतात."

T20 World Cup 2026
Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

सुपर ८ फेरीत ग्रुप १ बऱ्यापैकी मजबूत आहे. ग्रुप १ मधील चारही टीम्सने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारताव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजनेही प्रत्येकी चार ग्रुप सामने जिंकलेत.

T20 World Cup 2026
जो जीता वही 'सिकंदर' ! टी २० वर्ल्डकपमध्ये दुसऱ्यांदा सर्वात मोठा उलटफेर, झिम्बाब्वेचा करिष्मा; आधी ऑस्ट्रेलियाला, आता श्रीलंकेला लोळवलं

सुपर 8 मध्ये कसे असणार भारताचे सामने?

सुपर ८ फेरीत टीम इंडिया २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये भारताचा सामना झिम्बाब्वेशी होणार आहे. भारताचा शेवटचा सुपर ८ सामना १ मार्च रोजी कोलकातामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध रंगणार आहे. सेमीफायनलचं तिकीट मिळवण्यासाठी टीम इंडियाला दोन सामने जिंकावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com