Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

Shikhar Dhawan: शिखर धवनच्या घरी लग्नाची सनई वाजणार आहे. त्याने त्याच्या संगीत नाईट्सचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शिखर धवनच्या घोषणेमुळे चाहते खूप आनंदी आहेत.
Shikhar Dhawan
Shikhar DhawanSaam tv
Published On

Shikhar Dhawan : क्रिकेट चाहत्यांमध्ये 'गब्बर' म्हणून ओळखला जाणारा शिखर धवन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो त्याची गर्लफ्रेंड सोफी शाइनश लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या क्रिकेटपटूने इंस्टाग्रामवर सोफी शाइनसोबतचे फोटो शेअर केले आहेत. पोस्टमध्ये त्याने असे काही लिहिले आहे ज्यामुळे त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

शिखर धवन दुसऱ्यांदा लग्न करणार?

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये शिखर धवन ऑफ-व्हाइट इंडियन ड्रेसमध्ये दिसत आहे. सोफीने सोनेरी रंगाचा चमकदार लेहेंगा घातला आहे. हे कपल एकमेकांमध्ये हरवलेले दिसत आहे. शिखर त्याच्या भावी जोडीदाराचा हात धरून फिरताना दिसत आहे. या कपलच्या चेहऱ्यावर मोठे हास्य आहे.

Shikhar Dhawan
Hardik Pandya: हार्दिक पंड्याचा गर्लफ्रेंडसोबत स्विमिंग पूलमध्ये रोमान्स, केले खास फोटो शेअर

त्याच्या प्रेमासोबतचा फोटो शेअर करताना क्रिकेटपटूने लिहिले आहे, "संगीत रात्र. सून द धवन." या कॅप्शनमुळे चाहते थक्क झाले आहे. चाहते असा अंदाज लावत आहेत की क्रिकेटपटू लग्न करत आहे. या कॅप्शनवरून त्याच्या आयुष्यात एका नवीन सुरुवात होणार असल्याचे चाहते म्हणत आहेत.

Shikhar Dhawan
Rajpal Yadav : तुरूंगाबाहेर येताच राजपाल यादवची नको ती मागणी, मुख्यमंत्र्यांना भेटून सगळे काही सांगणार

सोफी शाइन कोण आहे?

सोफी शाइन ही एक आयर्लंड मॉडेल आहे. शिखर धवन आणि सोफीचे रिलेशनशिप २०२५ मध्ये दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यादरम्यान सुरू झाले. ते स्टँडमध्ये एकत्र दिसले आणि मे २०२५ मध्ये तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून त्यांच्या नात्याची माहिती दिली. ते काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिखर सोफीपेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे. शिखरने अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये त्याच्या वडिलांशी पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com