Maharashtra Live News Update: ट्रम्प यांनी लादलेला टॅरिफ बेकायदेशीर - यूएसए सुप्रीम कोर्ट

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२६, राज्यातील राजकीय घडामोडी, हवामान अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

ट्रम्प यांनी लादलेला टॅरिफ बेकायदेशीर - यूएसए सुप्रीम कोर्ट

Sujay vikhe patil : गाडीतून खाली उतरत सुजय विखेंनी स्वतः केली वाहतूक सुरळीत

अमरावतीच्या जंगल परिसरात भीषण आग

अमरावतीच्या वडाळी परिसरातील SRPF कॅम्प नजिकच्या जंगल परिसरात भीषण आग...

आगीत जंगलातील झाडे जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती..

आगीचे लोळ रहिवासी भागापर्यंत दिसतं असल्याने भीतीचं वातावरण.

आगीचं कारण अस्पष्ट, नागरिकांच्या माहितीवरून वनविभागाचे पथक घटनास्थळी..

आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती.

Shirdi : 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्न आणि धर्मांतरासाठी दबाव; आरोपीला अटक

mumbai : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ज्वेलर्स व्यावसायिकाकडे २० लाखांची खंडणी

लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने खंडणी प्रकरण

विलेपार्ले येथील ज्वेलर्स व्यावसायिकाला २० लाखांची खंडणीची मागणी

अनोळखी व्यक्तीकडून स्वतःला ‘लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य’ असल्याचा दावा

पैसे न दिल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

शेअर बाजारात अखेर पुन्हा एकदा तेजीचे वातावरण पाहायला मिळाले

या तेजीमुळे गुंतवणूकदारांनी तब्बल 1.73 लाख कोटी रुपयांची कमाई केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर महात्मा फुले दांपत्यांचा अवमान; विंश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

व्हॉट्सअॅप स्टेटसवर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी विंश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्त्या तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानी तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादीनुसार, नाशिक जिल्ह्यातील बॉम्बे नाका परिसरातील महात्मा फुले दांपत्यांच्या स्मारकाजवळ एका युवकाने व्हिडिओ चित्रित करून त्यामध्ये महापुरुषांबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

संबंधित व्हिडिओ व्हॉट्सअॅप स्टेटसवर प्रसारित करण्यात आला होता.

कृत्य हे महापुरुषांचा जाणीवपूर्वक अवमान करून त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या घटनेप्रकरणी कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलीसांकडे केली आहे.

गोकुळकडून दूध दरवाढ – उत्पादकांना दिलासा, ग्राहकांना फटका

गोकुळ दूध संघ यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. मात्र या निर्णयाचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. आज संध्याकाळ पासून नवे दर लागू होणार आहेत.

कोरोना काळात झालेल्या कामांची चौकशी होणार

नवी मुंबई महापालिकेच्या पहिल्याच महासभेत कोरोना काळात आणि प्रशासकीय काळात नवी मुंबई महापालिकेने केलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून

त्यामुळे गणेश नाईक यांनी निवडणूक काळात कोरोना आणि प्रशासकीय काळात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी होणार असे सांगितले असल्याने त्यांची आता समिती मार्फत चौकशी होणार हे नक्की झाले आहे

अमोल कोल्हे यांचा गौप्य स्फोट

अमोल कोल्हे यांचा गौप्य स्पोट

छगन भुजबळ जाणार होते राज्यसभेवर

अजित पवारांची होती इच्छा

अजित दादांनी दिलेले शब्द सुनेत्रा ताईंना पाळला

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांच्या कन्या मुक्ताचा विवाह सोहळा आज उत्साहात पार पडत आहे.या शुभप्रसंगी उपस्थित राहण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला होता. दादांचा तो शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लग्न मंडप परिसरात दाखल झाल्या.आमदार शेखर निकम आणि निकम कुटुंबीयांनी त्यांचे आतिथ्यपूर्वक स्वागत केले. सुनेत्रा पवार यांनी नववधू मुक्ताला आशीर्वाद देत दोन्ही कुटुंबांतील जिव्हाळ्याचे संबंध अधोरेखित केले. सोहळ्याला त्यामुळे विशेष भावनिक रंग चढला आहे.

राहूल गांधी उद्या भिवंडी न्यायालयात हजर रहाणार

आर.एस.एस. संघटनेच्या मानहानी प्रकरणी भिवंडी न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणीसाठी लोकसभा विरोधीपक्ष नेते व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी भिवंडी न्यायालयात हजर रहाणार असल्याची माहिती त्यांचे वकील ऍड.नारायण अय्यर यांनी दिली आहे.

वसई विरार महापालिकेची पहिली महासभा संपन्न

वसई विरार महापालिकेची पहिली महासभा संपन्न खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

पहिल्या महासभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड करण्यात आली आहे

बहुजन विकास आघाडीचे सभागृह नेता म्हणून प्रफुल साने यांची निवड करण्यात आली आहे

तर भाजपा विरोधी पक्षनेता म्हणून मनोज पाटील यांची निवड करण्यात आली आहे

परभणीत चालत्या ईर्टीगा गाडीने घेतला पेट

चालत्या ईर्टीगा गाडीने भीषण पेट घेतल्याची घटना परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील विटा गावाजवळ घडलीय सुदैवाने गाडीतील ४ ही जण वेळीच खाली उतरल्याने कुठलीही जीवितहाणी घडली नाही बघता बघता गाडी पूर्णतः जळून खाक झाली..मिळालेल्या माहितीनुसार ही सय्यद झाकिर हे विटा गावातून सोनपेठ कडे दुपारच्या सुमारास त्यांच्या ईर्टीगा गाडीने निघाले होते मात्र गावच्या बाहेर जाताच गाडीतून धूर निघू लागल्याने गाडीतील ४ ही जण हे बाहेर पडले आणि गाडीने भीषण पेट घेतला बघता बघता आगीने अक्षरशः रौद्र रूप धारण केले आणि काही वेळातच गाडी पूर्णतः जळून खाक झाली.

अभिनेता सोनू सूद साईचरणी नतमस्तक

अभिनेता सोनु सुद याने साईबाबांच्या माध्‍यान्‍ह आरतीला उपस्थित राहून साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.. साईदर्शनासाठी पुन्हा पुन्हा यावेसे वाटते, कॉलेज जिवनापासुन मी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येत असून नविन वर्षात आज येण्याचा योग आला.. साईबाबांची कृपा सर्वांवर राहो तसेच त्यांचे मार्गदर्शन सतत लाभो हिच साईचरणी प्रार्थना केल्याच सोनू सुद याने म्हणटलय.. दर्शनानंतर साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने अभिनेता सोनु सूद याचा सत्कार करण्यात आला

मंगळवेढ्यात दहा तोतया विद्यार्थ्यांवर कारवाई

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील परीक्षा केंद्रावर

पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर देताना दहा तोतया विद्यार्थ्यांना पकडले

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त

व्याख्यानासाठी विद्यार्थ्यांना चेकिंग करून सोडलं जात आहे

पोलिसांकडून विद्यार्थ्यांची तपासणी

सभागृहाबाहेर शिवप्रेमींची गर्दी

कासोद्यात ३४१८ गोण्यांचा साठा जप्त

कासोदा येथील युरिया टंचाईच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने केलेल्या धाडीत मोठा साठा सापडल्याने खत विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध नाही असे सांगितले जात असताना, तब्बल ६ दुकानांत ३४१८ गोण्यांचा साठा आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लहुराज विश्राम मराठे, जितेंद्र परशुराम तांदळे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी युरिया मिळत नसल्याची तक्रार जिल्हा कृषी विभागाकडे केली होती. त्यानुसार कृषी विभागाचे पथक कासोद्यात दाखल झाले.गावातील सर्व खत विक्रेत्यांच्या गोडाऊनची तपासणी करण्यात आली. त्यात युरीयाचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आला. मात्र शेतकऱ्यांना खत संपले आहे. असे सांगून परत पाठवले जात होते. दुकानांची दिवसभर झडती घेण्यात आली. अनेक दुकानांकडे विक्रीचीयोग्य नोंद उपलब्ध नव्हती. शेतकऱ्यांच्या नावावर अवास्तव बिले व रेकॉर्डमध्ये तफावत दिसून आली. ६ दुकानांत एकूण ३४१८ गोण्या अवैध साठा यामुळे संबंधित विक्रेत्यांचे परवाने रद्द करावेत, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

पंढरपुरात पुंडलिक मंदिराला सोन्याचा कळस

पंढरपुरातील चंद्रभागेच्या काठावर असणाऱ्या भक्त पुंडलिक मंदिराला आज सोन्याचा कळस चढवण्यात आला. श्रीमती विजया कोकाटे पाटील यांच्या इच्छेवरून पुंडलिक मंदिराला सोन्याचा कळस बसवण्यात आला. आज सकाळी सोन्याच्या कळसाची पंढरपूर शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर डॉ. सुशांत व अनुजा कोकाटे पाटील यांनी विधिवत पूजा करून पुंडलिक मंदिराला सोन्याचा कळस चढवला. या कळसावर किती सोने आहे याबाबत मात्र कोकाटे पाटील परिवाराने गुप्तता पाळली आहे. यापूर्वी विजया कोकाटे पाटील यांनी देहू, आळंदी, मुक्ताईनगर अशा ठिकाणच्या मंदिरांमधील देवतांनाही सोन्याचे कळस दिले आहेत. यामध्येच आता भक्त पुंडलिक मंदिराला सोन्याचा कळस चढवण्यात आला.

कोल्हापुरात ठाकरेसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर | Kolhapur | ThackeraySena

कोल्हापुरात स्वीकृत नगरसेवक निवडीवरून ठाकरेसेनेतील वाद चव्हाट्यावर आलाय. सुनील मोदी यांची काँग्रेसमधून नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर ठाकरेसेनेतील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलीय... सुनील मोदी हे ठाकरेसेनेचे पदाधिकारी आहेत.. मात्र त्यानी काँग्रेसमधून नगरसेवकपद का घेतलं याबाबत कार्यकर्तांनी त्यांना जाब विचारलाय.. या घडामोडींमुळे ठाकरेसेनेत अंतर्गत मतभेद उफाळल्याचे चित्र दिसत आहे.

संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात खाजगी सावकाराच्या छळाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जरंडी येथील दत्तात्रय रघुनाथ मुठे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दत्तात्रय मुठे यांच्याकडे सुमारे चार एकर शेती होती. शेतीची मशागत आणि पेरणीसाठी त्यांनी बँक तसेच खासगी सावकाराकडून मिळून सुमारे पाच लाखांचे कर्ज घेतले होते. खासगी सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी दोन एकर शेती विकून व्याजासह चार पट रक्कम परत दिल्याची माहिती समोर येत आहे

भाजप बंडखोराना कारवाईचा इशारा | Warning of action against BJP rebels | Ravindra Chavan

कारल्याची भाजी केल्याने मुलाने केली आईची हत्या

कारल्याची भाजी का बनवली, या क्षुल्लक कारणावरून मुलाने आपल्या आईची हत्या केली. मन सुन्न करणारी ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे उघडकीस आली. सुमित्रा पेटकुले (६५) असे मृतक आईचे नाव आहे.

Maharashtra Live News Update: धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार

धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी एका चालत्या कारने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना घडलीये..जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावाजवळ ही घटना घडलीये.. सुदैवाने, कारमधील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला असून, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही...

Maharashtra Live News Update: भिवंडीमध्ये मोठी बातमी: महापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ

भिवंडीच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. नारायण चौधरी यांची भिवंडी निज़ामपुर सिटी म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या महापौरपदी निवड झाली आहे.

अहिल्यानगरमध्ये भावानेच केला सख्ख्या भावाचा खून; मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बापाची मदत

जिल्ह्यातील डोंगरगण परिसरातील वांबोरी घाटात दोन दिवसांपूर्वी एका गोणीत मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मृतदेहाची ओळख पटवलीच, शिवाय हत्येचा थरारक उलगडा करत दोघा आरोपींना अटक केली आहे. मृत व्यक्तीचे नाव किरण शिवाजी कवाने असे असून, त्याची हत्या त्याचाच सख्खा भाऊ योगेश शिवाजी कवाने याने केल्याचे निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वडील शिवाजी शंकर कवाने यांनी देखील मदत केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी बाप-लेक दोघांनाही अटक केली आहे

भिवंडीत भाजपाला धक्का, बंडखोर नारायण चौधरी महापौरपदी

पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुरड्यावर हल्ला, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

  • पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुरड्यावर हल्ला

  • पुण्यातील घटना सी सी टिव्ही मध्ये कैद

  • भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात चिमुरडा थोडक्यात बचावला

  • भटक्या कुत्र्यांवर महापालिका प्रशासन काय उपाययोजना राबवणार?

  • पुणेकर महापालिका प्रशासनावर नागरिकांचा संताप

  • पुण्यातील किरकटवाडी येथील चैत्रांगण सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांनी केला हल्ला

  • मदतीसाठी धावून आलेल्या तरुणाने चिमुरडा थोडक्यात बचावला

शासनाच्या धोरणा विरोधात धुळ्यात मक्का उत्पादक शेतकरी आक्रमक

शासनाच्या धोरणा विरोधात धुळ्यात मक्का उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या क्यूमाईन क्लब परिसरात मक्याचे भरलेला ट्रॅक्टर आणून मक्का उत्पादक शेतकऱ्याने शासनाचा निषेध केला आहे, जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर मक्का फेकून शासनाचा करण्यात येणार होता निषेध परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याला रोखले, संबंधित शेतकऱ्याने प्रशासनाला दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, दहा दिवसात पुन्हा मक्का नोंदणी सुरू करण्यात न आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा संबंधित शेतकऱ्याने प्रशासनाला इशारा दिला आहे

राज्यातील वाहतूकदार करणार चक्काजाम, पुण्यातील आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन

राज्यात 5 मार्चपासून सुरू होणाऱ्या वाहतूकदार चक्काजाम आंदोलन करणार आहेत.पुणे शहरातील एटीएस अभावी पासिंगचे काम बंद असून त्याचबरोबर राज्यातील सर्व संघटना एकत्रित येऊन ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीद्वारे इ चलन प्रणाली द्वारे वाहन चालकांची होत. असलेली लूट येत्या आठ दिवसात राज्य सरकारने याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास चक्काजाम आंदोलन जाहीर केलेले आहे. पोलीस प्रशासनाकडून ही चलनाद्वारे वाहन चालकांकडून दंड वसुली केली जाते. परंतु या प्रणालीमध्ये आज अनेक इचलन नियमबाह्य पद्धतीने आकारलेले आहे. एक वर्षांपूर्वी सरकारने दिलेला शब्द पाळलेला नसल्यामुळे राज्यस्तरीय सर्व वाहतूक संघटना यांनी हा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने नुकतेच नवीन नियमावली मध्ये बदल करून ही चलनाचा दंड न भरल्यास वाहन जप्त करण्याचे निर्णय घेतलेला आहे. या सर्वाला विरोध म्हणून आज पुणे शहरातील सर्व संघटना कृती समिती बॅनरच्या खाली एकत्र येऊन आंदोलन करण्यात आलं

भिवंडीत महापौर पदासाठी ३ जणांमध्ये लढत

भिवंडीत 9 पैकी 6 जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. महापौर पदासाठी आता नारायण चौधरी, आणि विलास पाटील आणि स्नेहा पाटील तिघांमध्ये लढत होणार आहे

सोलापूर महापालिका सभागृहात स्वीकृत सदस्य निवडीवरून गोंधळ

  • सोलापूर महापालिका सभागृहात स्वीकृत सदस्य निवडीवरून गोंधळ

  • भाजपकडून 9 सदस्यांची निवड आज होणार होती मात्र 8 सदस्यांची नावे जाहीर केल्याने विरोधी पक्ष नगरसेवकांनी घातला गोंधळ

  • शिवसेना नगरसेवक अमोल शिंदे आणि काँग्रेस नगरसेवक चेतन नरोटे यांनी घेतला आक्षेप

  • महापौर विनायक कोंड्याल यांच्या दालनात शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांनी घेतली धाव

  • महापौर विनायक कोंड्याल यांनी वाढता तणाव लक्षात घेऊन सभागृहाचे कामकाज थांबवले

शिवजयंती मिरवणुकीत विना परवाना डीजेवरून वाद, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

नांदेडमध्ये शिवजयंती मिरवणुकीत पोलिसांनी सौम्य स्वरूपाचा लाठीमार केलाय, या घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विना परवाना लावलेला डीजे काढण्यास पोलीस गेले होते, त्यावेळी तरुणांनी त्याला विरोध केला. यावेळी पोलिसांनी सौम्य स्वरूपाचा लाठीचार्ज केला. मात्र या घटनेनंतर युवकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. पोलीस जाणीवपूर्वक आम्हाला टारगेट करत आहेत असा आरोप युवकांनी केला. तर विनापरवाना लावलेला डीजे ताब्यात घेत असताना डीजेचे सामान पळून नेत असल्याने आम्ही रोखण्याचा प्रयत्न केल्याची माहिती भाग्यनगर पोलिसांनी दिली आहे.

अमरावती महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेला सुरवात

  • पहिल्याच सर्वसाधारण सभेला 15 पेक्षा अधिक नगरसेवकांची दांडी..

  • सातव्यांदा नगरसेवक म्हणून विजयी झालेले काँग्रेस पक्षाचे नेते माजी महापौर विलास इंगोले यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड

  • विरोधी पक्ष नेते म्हणून निवड झालेले विलास इंगोले हे अमरावती महानगरपालिकेतील सर्वात जेष्ठ नेते

  • सत्ता पक्षांचा सभागृह नेता म्हणून भाजपचे माजी महापौर चेतन गावंडे यांची निवड.

परभणीत पोलिसांची आंदोलक शेतकऱ्यांवर दडपशाही, शक्तिपीठ महामार्ग मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

परभणीत आज सहजपूर जवळा,आमडापूर आणि कोठाळा या ३ गावाच्या शिवारात शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया पार पडत आहे या प्रक्रियेला शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला आहे.मात्र पोलिसानी दंडेलशाही करत अनेक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे यावेळी विरोध करणाऱ्या महिलांचा आक्रोश पाहायला मिळाला शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ही ओतून घेतले मात्र शेतकऱ्यांचा हा विरोध पोलिसांनी मोडीत काढला आणि महसूल,भूमी अभिलेख आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोजणीला सुरुवात केली आहे

बीडमध्ये दहावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ

बीडमध्ये दहावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वीच शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला. बीड तालुक्यातील कुर्ला येथे दहावीचे परीक्षा केंद्र आहे. मात्र या केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थांना पेपर सोडविण्यासाठी चक्क मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थी संख्या वाढल्याचे कारण देत हा मंडप उभारण्यात आला असून येथेच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. शिवाय तापमान वाढत असल्याने उकाड्याचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. बारावी नंतर दहावीची परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असताना हा सावळा गोंधळ समोर आलाय.

जळगावमध्ये प्रशासक नियुक्तीला सरपंचांचा विरोध आज ग्रामपंचायत बंद

जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आला असून त्या ठिकाणी प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे; मात्र निवडणुका तातडीने घेण्याऐवजी प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला सरपंच व पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. निवडणुका होईपर्यंत विद्यमान सरपंच व उपसरपंचांकडेच जबाबदारी द्यावी अशी मागणी पुढे येत आहे. या मागणीसाठी आज 'ग्रामपंचायत बंद'चा इशारा दिला आहे.जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक कालावधी डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत टप्याटप्याने संपला.

पहिल्या टप्यात ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व महापालिका निवडणुकांमुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित राहिल्या. सध्या राज्यभर ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असला तरी नियमित निवडणुकांबाबत हालचाल नसल्याने प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

टीडब्ल्यूजे कंपनीचा संभाजीनगरमध्येही १० कोटींचा गंडा

गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून राज्यातील मोठ्या शहरातल्या ११ हजार गुंतवणूकदारांना १२०० कोटींचा गंडा घालणाऱ्या टीडब्ल्यूजे कंपनीने आता छत्रपती संभाजीनगरमध्येही १० कोटींचा गंडा घातल्याचे समोर

परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

परभणी जिल्ह्यातील सहजपूर जवळा,आमडापूर आणि कोठाळा या ३ गावच्या परिसरात आज शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी केली जाणार आहे मात्र या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.पोलिसानी आज पहाटेच या महामार्गाला विरोध करणाऱ्या विविध पक्ष,संघटना आणि काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.ज्या ३ गावात जमीन मोजण्यासाठी अधिकारी येणार आहेत या अधिकाऱ्यांना आमचा जीव गेला तरी आम्ही आमची जमीन आम्ही मोजू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे यामुळे शेतकरी आज मोठ्या संख्येने एकवटले आहेत शेतकऱ्यांनी शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर बैलगाड्या उभा करून आम्ही आमच्या शेताकडे अधिकाऱ्यांना जाऊ देणार नाही असे म्हणत रस्त्यावर आंदोलन सुरू केले आहे.कुठल्याही परिस्थितीत प्रशासनाला मोजणी करायची असल्याने ३ ही ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे ज्यामुळे छावणीचे स्वरूप या परिसराला आले आहे.

पस्तीस हजार मीटर दोऱ्यातून साकारली शिवरायांची प्रतिमा

जयंतीनिमित्त सोलापूर शहरात उत्साहाचे वातावरण असताना एका आगळ्या वेगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकर्षक प्रतिमेने सोलापूरकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.सोलापूर मधील प्रतिभावान चित्रकार विपुल मिरजकर याने तब्बल २२ बाय २२ फुटांची (सुमारे ४५० चौरस फूट) शिवरायांची प्रतिमा दोरा अन् स्टीलच्या साहाय्याने साकारली आहे.

आजपासून दहावीच्या बोर्डाची परीक्षा

राज्यात १६ लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशाला मध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण

हॉल तिकीट चेक करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यात येत आहे

शाळेच्या परिसरातील सर्व झेरॉक्स चे दुकानं बंद

कॉपीमुक्त परीक्षांचे बोर्डाकडून अभियान

माझी वसुंधरा अभियानात कुडाळ नगरपंचायत विभागस्तरावर प्रथम

महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियानांतर्गत कुडाळ नगरपंचायतीने विभागस्तरावर १५ ते २५ हजार लोकसंख्या गटात प्रथम क्रमांक पटकावला असून ७५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे.

याबाबतचा अधिकृत शासन निर्णय १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यावरण विभागाकडून प्राप्त झाल्याची माहिती नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी दिली.

आगामी काळात कुडाळ नगरपंचायत पूर्ण ताकदीनिशी या अभियानात सहभागी होणार असून, विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून, हि नगरपंचायत राज्यस्तरावर अव्वल येण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत असेही बांदेकर यांनी सांगितले.

अमरावती विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ सुविधा एप्रिलपासून सुरू होणार.

अमरावती विमानतळावर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून आवश्यक यंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

डीजीसीएची (DGCA) टीम पाहणीसाठी अमरावतीत येणार आहे.पाहणीनंतर रात्री विमानांची ये-जा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल.

विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येनार असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (MADC) कामांना गती देण्यात येत आहे.

धावपट्टी वाढ व इतर पायाभूत सुविधांमुळे विमानतळ अधिक सक्षम होणार

ह्या नाईट लँडिंग मुळे अमरावती जिल्ह्याच्या व्यापार, पर्यटन व उद्योग क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार.

पुणे जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला

वाढत्या उन्हामुळे वन्यप्राण्यांचे हाल होऊ नये म्हणून विशेष सोय

वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे भोर तालुक्यातील विसगाव खोऱ्यात वन विभागाने वन्यप्राण्यांसाठी पाण्याची विशेष सोय

जंगलातील नैसर्गिक झरे व पाणवठे कोरडे पडल्याने मोर, ससे, हरीण, काळवीट, रानडुक्कर यांसारखे वन्यजीव पाण्यासाठी नागरी वस्त्यांकडे वळत आहेत

या पार्श्वभूमीवर वनक्षेत्रात ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे

वन्यप्राणी व पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे

रानडुकरांची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक

जंगली रांडुकरांना पकडून त्यांची तस्करी करणाऱ्या १२ जणांच्या टोळीला भंडाऱ्याच्या तुमसर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पथकानं अटक केली. वनपरिक्षेत्राधिकारी यांचं पथक पहाटेच्या सुमारास तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या झंझेरिया बीटाच्या वाघसांध्या तलाव परिसरात गस्तीवर असताना, काही तरुण या भागात संशयास्पद आढळून आले. त्यांची चौकशी केली असता बोलोरो वाहनामध्ये रानडुक्कर, काही धारदार हत्यार आणि डुक्कर पकडण्याचे साहित्य आढळून आले. हे सर्व रानडुक्कर तस्कर असून त्यांनी छत्तीसगड, मध्यप्रदेशसह नागपुरमध्ये रानडुक्कर विक्री केल्याची त्यांनी कबुली दिली. सर्वांवर वन गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या कारवाईत आरोपींकडून एक बोलेरो वाहन, धारदार शस्त्र, लाठ्याकाठ्या, रानडुक्कर पकडण्याचे साहित्य आणि १२ मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.

सिंधुदुर्गात ऐन उन्हाळ्यात दाट धुक्याची चादर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र आज पुन्हा दाट धुके पाहायला मिळाले. ग्रामीण भागासह शहरीभागात पहाटे पासून दाट धुके पडल्याने रस्ते धुक्यात हरवले होते. ऐन आंबा, काजूच्या हंगामात धुके पडत असल्यामुळे याचा थेट परीणाम मोहरावर होणार आहे. आधीच हापूस आंबा मोहरावर खार पडल्यामुळे जळून गेला आहे त्यातच पुन्हा धुके पडत असल्यामुळे याचा मोठा परीणाम आंबा काजू पिकावर होणार आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे बागायतदार शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.

गंगापूर रोडवरील पिटीसीसमोरील ६२ एकर जमिनीची मूळ कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातून गायब

जमीन व्यवहारातील गंभीर प्रकार उघड, महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

संबंधित जमीन सन १९९६ मध्ये शासनजमा, मात्र २००३ पासून महत्त्वाची फाईल बेपत्ता

माहिती आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने अवमान याचिका दाखल

न्यायालयाच्या फटकारणीनंतर अखेर नाशिक पोलिस आयुक्तालयात गुन्हा नोंद

दहावीची आजपासून परीक्षा; जळगाव शहरातील १५ केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

दहावी बोर्ड परीक्षेला आज पासून सुरुवात होत असून सकाळी ११ ते २ या वेळेत मराठीचा पहिला पेपर आहे. शहरातील १५ केंद्रावर परीक्षा होणार सर्व ठिकाणी सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. ज्या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे नाही तेथे मोबाइलवरून झूम अॅपच्या - साहाय्याने थेट लक्ष ठेवण्यात येणार आहे. यंदा जळगाव जिल्ह्यातून ५९,४७८ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. प्रशासनाने कॉपी मुक्त अभियान राबवण्यासाठी कंबर कसली असून नियम मोडणाऱ्यांवर भेंट फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे परीक्षा केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही तर परीक्षा केंद्रांसाठीही कसोटी ठरणार आहे.

सामूहिक कॉपी प्रकरण उघड करणाऱ्या भरारी पथकाच्या सन्मानाची मागणी

वाशिम जिल्ह्यात उघडकीस आलेल्या सामूहिक कॉपी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सुबोध सावजी यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना पत्र पाठवून सखोल चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच अचानक छापा टाकून गैरप्रकार उघड करणाऱ्या भरारी पथकाच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या शासकीय सन्मानाचीही मागणी करण्यात आली आहे....

पुण्यातील बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई होणार

परिवहन विभागाच्या निर्देशांची अंमलबजावणी होत नसल्याने पुणे शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर आरटीओ कठोर कारवाईचा बडगा उगारणार

गेल्या १० महिन्यात ५१७ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई

सुमारे ३.५ लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे

बेशिस्त रिक्षा चालकांवर वारंवार कारवाई करूनही नियम पाळले जात नसल्याने आता आरटीओने रिक्षा चालकाचा वाहन परवाना (लायसन्स) तात्पुरता निलंबित किंवा थेट रद्द करण्याचा निर्णय

आरटीओ कार्यालयाती नोंदीनुसार, पुणे शहरात २०२५ अखेरपर्यंत सुमारे एक लाख २९ हजार रिक्षाचालक आहेत

शिवीगाळ करणे म्हणजे अश्लीलता ठरत नाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

- केवळ शिवीगाळ करणे म्हणजे अश्लीलता ठरत नाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

- भादंवि कलम २९४ लागू होण्यासाठी ‘अश्लीलतेची कसोटी’ आवश्यक, मात्र तक्रारी शिव्यांचा उल्लेख नसल्याने २०१९ मधील प्रकरणात गुन्हे रद्द

- कलम ३८४, ३८५ अंतर्गत खंडणीची अपुरे ठरले, ठोस वैद्यकीय पुरावे नसल्याचे न्यायालयाचे निरीक्षण.

- राजकीय वैमनस्यातून तक्रार दाखल झाल्याचा आरोपीचा दावा ग्राह्य धरत दाखल गुन्हे रद्द

- अकोला येथील महानगर नगरसेवकावर आरोप करत 2019 मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते.

शिवजयंतीच्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटात वाद.

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे गावात रात्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून दोन गट आमने-सामने आले होते. यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली सध्या पिंपळगाव काळे गावात शांतता असून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

- राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात..

- नागपूर जिल्ह्यात 58 हजार 458 विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा.. पहिला पेपर मराठीचा असणार..

- मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 2 हजार 368 विद्यार्थी संख्येत वाढ.. परिक्षेकरीता 222 केंद्रे निश्चित..

- नागपूर जिल्ह्यातील 29 परीक्षा केंद्र अतिसंवेदनशील घोषित..

- परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रश्न पत्रिकांची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी 84 गोपनीय केंद्राची स्थापना..

- कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी शिक्षण विभागाकडून 6 भरारी पथक तैनात..

चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

- दक्षिण सोलापूर तालुक्यातील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

- दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज- तिलाटी गेट परिसरात चेट्टीनाड सिमेंट कंपनी आहे

- कंपनीत असलेल्या ट्रान्सफार्मरला आग लागल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात

- दरम्यान या घटनेत कोणीही जखमी नसून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरूय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com