Haldi Kunku special Ukhane saam tv
लाईफस्टाईल

Makar Sankranti Ukhane : महिलांनो हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या हटके उखाणे, लगेचच पाहा लिस्ट

Haldi Kunku special Ukhane : मकर संक्रांत हा हिंदू धर्मातला सर्वात मोठा आणि आनंदाचा सण मानला जातो. या दिवशी सुर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात होणार आहे.

Saam Tv

मकर संक्रांत हा हिंदू धर्मातला सर्वात मोठा आणि आनंदाचा सण मानला जातो. या दिवशी सुर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात होणार आहे. दरवर्षी हा सण १४ जानेवारीला साजरा केला जातो. हा सण महिलांसाठी खूप आनंदाचा असतो. या दिवसांमध्ये महिला हळदी-कुंकू , बोरन्हाण यांसारखे सण साजरा करतात. एकमेकांना शुभेच्छा देतात. महिला वेगवेगळे सण साजरे करतात. त्यावेळेस प्रत्येक महिला उखाणे घेत असते.

दर मकर संक्रांतीला तुम्ही तेचतच उखाणे म्हणत असाल तर यंदा तुम्ही सगळ्यात हटके उखाण्यांची लिस्ट पाहू शकता. मकर सण हा विवाहित महिलांसाठी खूप महत्वाचा असतो. त्या ऐकमेकींना घरी बोलवून हळदी कुंकू लावून ओटी भरतात. त्यावेळेस उखाणे सुद्धा आवर्जून घेतले जातात. चला तर पाहूया नवीन मॉर्डन उखाण्याची लिस्ट.

१) चांदीच्या दिव्यात लावली

तुपाची वात

...रावांचे नाव घेत करते

हळदी कुंकवाला सुरुवात...

२) मकर संक्रांतीला,

काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड,

....राव माझे पती नाहीत,

तर आहेत बेस्ट फ्रेंड.

३) लग्नानंतर मकर संक्रांतचा

पहिला सण करते साजरा,

.... रावांचा स्वभाव,

आहे फार लाजरा.

४) देवाने दिला असा जोडीदार,

....[पतीचे नाव] नाव घेतल्यावर

भरतो मनात आनंदाचा भार.

५) फेसबुकवर फ्रेंड्स अन्

इंस्टाग्रामवर फॅन्स,

....[पतीचे नाव]च आहेत

माझ्या आयुष्यातले

बेस्ट फ्रेंड!

६) व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये

जसा असतो फन,

....[पतीचे नाव]च आहेत

माझ्या आयुष्याचा

मुख्य पिलर अन् रन!

७) झाडाला लागते फळ,

... [पतीचे नाव]च आहेत

माझे संसाराचे बल.

८) तीळगुळ घ्या,

गोड गोड बोला,

... रावांचे नाव घेण्याचं

भाग्य मिळालं मला...

९) चांदीच्या दिव्यात लावली

तुपाची वात

...रावांचे नाव घेत करते

हळदी कुंकवाला सुरुवात...

१० ) ते उडवत होते पतंग,

आणि मी पकडली होती फिरकी,

...रावांच्या मागे,

सात जन्म अशीच

घेईन मी गिरकी...

११) जाई जुईच्या फुलांपेक्षा

शोभून दिसते शेवंती,

...रावांना सुखी ठेवा

हीच देवाला विनंती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT