Saam Tv
इंग्रजी नववर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत.
सक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करुन हा सण साजरा केला जातो.
नवविवाहितेसाठी पहिली संक्रांत जशी महत्वाची असते तशी लहान मुलांसाठी सुद्धा महत्वाची असते.
बोरन्हाण घालण्याचा कालावधी रथसप्तमीपर्यंत असतो.
बोरन्हाणला बाळाला काळं झबलं आणि हलव्याचे दागिने घातले जातात.
या कार्यक्रमात लहान मुलांना बोलवून लहान बाळाचं बोरन्हाण केलं जातं.
यात लहान बाळाच्या डोक्यावर चुरमुरे, हलवा, बोरं, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, पैसे, चॉकलेट एकत्र करून घालतात.
तर सुवासिनींना किंवा पाहूण्या आलेल्या बाळांच्या आईंना हळदी कुंकू केलं जातं.