Saam Tv
आज घरात कोणासोबत भांडण करणं टाळा. . ताणतणावाचे वातावरण राहील. सकारात्मकता आणावी लागेल.
भावंडांचे प्रेम मिळेल. जवळचे प्रवास घडतील. पत्रव्यवहार मार्गे लागतील. शेजाऱ्यांच्या सहकार्याने अडचणीतून पार पडाल.
कुटुंबीय एकत्र येऊन उत्साहाने आजचा सण साजरा कराल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आपला वट आणि दबदबा आज सर्वांवर राहील.
आपले आरोग्य आज उत्तम राहील. घरी पाहुण्यांची उठबस होईल. आपल्या स्नेहाने, तिळातिळाने गोडवा वाढेल. प्रेमाने मने जिंकाल.
जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. कदाचित न सुटणारी दुखणी मागे लागतील.
जुन्या आठवणींमध्ये रमाल. एखाद्या लहानपणीच्या मित्राची भेट होईल. संक्रांतीचा दिवशी तुम्हाला पैशाच्या चणचण जाणवणार नाही.
मुखात गोडवा आणि डोक्यावर बर्फ ठेवल्यास आजचे कामे विनासायास घडतील. अडचणी दूर होण्याचा आजचा दिवस आहे. आपली प्रतिष्ठा वाढेल.
गणेश उपासना आज फलदायी ठरेल. संक्रांतीचा सारखा सुंदर दिवस आहे. पुण्यकाळ पाळा. दानधर्म, अध्यात्म अशा गोष्टीत मन व्यस्त ठेवा. आपल्या राशीला त्याचा फायदा होईल.
घोड्यासारखे उमदे असणारे आपले व्यक्तिमत्त्व आहे. पण आज थोडा त्रास संभवतो आहे. वाहनांपासून काळजी घ्या. विनाकारण मनस्थिती खराब होणाऱ्या घटना घडतील.
जोडीदाराची साथ खंबीर राहील. आयोजन आणि नियोजन केल्याप्रमाणे संसाराची घडी व्यवस्थित बसेल. नवीन काहीतरी खरेदी होईल.
हितशत्रूंचा त्रास वाढेल. सहज घडणाऱ्या गोष्टी लांब जाताना दिसतील. विनाकारण कटकटी वाढतील. तब्येत जपा.
क्रीडा क्षेत्रामध्ये आज प्रगतीचा दिवस आहे. दत्तगुरूंची उपासना विशेष फलदायी ठरेल. शेअर्स, लॉटरी, सट्टा यामध्ये लाभ आहे.