What Is a Silent Heart Attack saam tv
लाईफस्टाईल

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्यापूर्वी हात-पायांमध्ये दिसतात ५ मोठे बदल; 99% लोकं करतात दुर्लक्ष

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलंय. अनेकदा छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, यांसारख्या सामान्य लक्षणांवरून आपण हृदयविकाराचा धोका ओळखतो.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल हार्ट अटॅक अगदी सामान्य झाला आहे. अनेकांच्या म्हणण्यानुसार, याची लक्षणं दिसून येत नाहीत. मात्र कोणताही आजार होण्यापूर्वी त्याची लक्षणं दिसून येतात. हृदयविकाराचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD), जो हृदयापर्यंत रक्तपुरवठ्यावर परिणाम करतो.

हृदयविकाराचे धोका वाढतो यामागील एक महत्त्वाचं कारण म्हणजे जीवनशैलीतील घटक. यामध्ये मधुमेह, लठ्ठपणा, असंतुलित आहार, शारीरिक निष्क्रियता, मद्यपान, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचे वाढलेले प्रमाण आणि धूम्रपान यांचा समावेश होतो.

शरीर नेहमी देतं संकेत

आपल्याला अनेकदा वाटतं की, हृदयविकार अचानक होतो. मात्र प्रत्यक्षात शरीर आधीच काही संकेत देत असतं. ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. चेहरा, बोटं आणि पायांमध्ये होणारे बदल हे हार्ट अटॅकपासून आपल्याला वाचवू शकतात.

बोटं आणि पायांमध्ये गाठी

जर बोटं किंवा पायांमध्ये वेदनादायक गाठी निर्माण होत असतील तर ती एंडोकार्डायटिस नावाच्या स्थितीमुळे असू शकतं. याचा परिणाम हृदय किंवा रक्तवाहिन्यांवर परिणाम करते. या गाठी काही तासांपर्यंत राहू शकतात किंवा काही दिवसांत आपोआप नाहीशा होऊ शकतात. मात्र यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा

फाटलेले ओठ

जर तुमचे ओठ सारखे फुटत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. तज्ज्ञांच्या मते, सहा महिन्यांपासून पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये हा आजार होण्याचा धोका असतो. हा आजार रक्तवाहिन्यांवर परिणाम करतो. ही परिस्थिती उपचाराशिवाय 12 दिवसांत बरी होते. तरी त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

नखांचा आकार बदलणं

जर एखाद्या व्यक्तीच्या नखांचा आकार खालच्या बाजूला वाकलेला असेल आणि बोटांचे टोक सूजलेले असेल तर हे हृदयविकार किंवा फुफ्फुसाशी संबंधित समस्येचं लक्षण असू शकतं. जरी हे लक्षण सौम्य वाटत असलं तरी अशा नखांच्या स्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

डोळ्यांच्या आसपास पिवळ्या रंगाचे ठिपके दिसणं

डोळ्यांच्या आसपास किंवा त्वचेवर पिवळसर-केशरी रंगाचे ठिपके दिसत असतील तर ते शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळीचे संकेत वाढल्याचं लक्षण असू शकतं. काही दिवसांनी हे ठिपके ते हातांच्या रेषांवर किंवा पायांच्या मागच्या भागावरही दिसू शकतात. अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी असोसिएशनच्या माहितीनुसार, अशा वाढलेल्या भागांची नोंद घेतल्यास कोलेस्ट्रॉल तपासणी किंवा इतर वैद्यकीय चाचणी आवश्यक ठरू शकते.

पायाच्या तळव्यांमध्ये सूज

जर पायांमध्ये विशेषतः पायाच्या तळव्यांमध्ये वेदना किंवा सूज दिसत असेल, तर ते तुमचं हृदय योग्यरित्या कार्य करत नसल्याचं संकते आहेत. अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी असोसिएशनच्या माहितीनुसार, पायांमध्ये साचलेला द्रव सूज निर्माण करतो आणि ही सूज वरच्या पायांपर्यंत पोहोचू शकते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT