त्वचेवरील डार्क स्पॉट्स हे लिव्हरच्या आरोग्याशी संबंधित संकेत असू शकतात.
लिव्हरच्या कार्यात बिघाड झाल्यास हार्मोनल असंतुलन व विषारी पदार्थ त्वचेला प्रभावित करतात.
अचानक दिसणारे राखाडी डाग हे लिव्हर समस्यांचे लक्षण असू शकतात.
त्वचेवर दिसणारे काळपट डाग म्हणजेच डार्क स्पॉट्स ही सौंदर्याशी संबंधित मोठी समस्या मानली जाते. चेहरा, हात आणि खांद्यांवर दिसणारे हे छोटे तपकिरी ठिपके बहुतेक वेळा harmlessअसतात आणि त्यांचा संबंध सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या अल्ट्राव्हायलेट रेडिएशनशी असतो. मात्र अलीकडील संशोधनातून असे आढळले की, त्वचेवरील पिगमेंटेशनमुळे होणारे बदल हे लिव्हरच्या आरोग्याशी संबंधित लक्षणे असू शकते.
लिव्हर हा शरीरातला एक अत्यंत महत्त्वाचा अवयव असून तो शरीरातले विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करतो. तसेच पित्त तयार करणे ,हार्मोन्स आणि मेटाबॉलिझमच्या कार्यामध्ये लिव्हरचा सहभाग असतो. लिव्हर योग्य प्रकारे कार्य करत नसल्यास त्याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो.
सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या डागांव्यतिरिक्त, काही वेळा त्वचेवरची हायपरपिगमेंटेशन म्हणजेच जास्त काळेपणा लिव्हरच्या समस्यांचे संकेत असू शकतो. ही समस्या बऱ्याचदा हार्मोनल असंतुलन किंवा शरीरात विषारी पदार्थ साचल्यामुळे होते. संशोधनात असं आढळले आहे की, सिरोसिस किंवा हेपाटायटिससारख्या दीर्घकालीन असणाऱ्या लिव्हरच्या आजारामध्ये त्वचेवर जास्त प्रमाणात हायपरपिगमेंटेशन तयार होण्याची शक्यता असते.
वाढत्या वयामुळे येणारे डाग आणि लिव्हरमुळे येणारे डाग यातला फरक ओळखणे महत्त्वाचे आहे. वय वाढल्यामुळे येणारे डाग म्हणजे एज स्पॉट्स हे हळूहळू वाढतात आणि उष्णतेमुळे काळ्या झालेल्या भागांवर दिसतात. हे डाग साधे, सपाट आणि एकसमान तपकिरी रंगाचे असतात. मात्र लिव्हरशी संबंधित डार्क स्पॉट्स अचानक दिसू लागतात आणि रंगाने थोडे गडद राखाडी किंवा मातीसारखे दिसतात. हे डाग चेहरा, मान, तळहात, पायांच्या तळव्यांवर किंवा काही वेळा जीभेवरसुद्धा दिसू शकतात.
लिव्हर हार्मोन्सच्या मेटाबॉलिझममध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा लिव्हर योग्य प्रकारे काम करत नाही तेव्हा शरीराचं हार्मोनल संतुलन बिघडतं. त्यामुळे मेलानोसाइट्स नावाच्या पेशींना जास्त प्रमाणात उत्तेजित करतात आणि त्यामुळे त्वचा काळवंडते. त्यामुळेच काही लोकांच्या चेहऱ्यावर किंवा हातांवर जास्त काळे ठिपके दिसतात.
लिव्हर कमकुवत झाल्यामुळे शरीरातील विषारी व्यवस्थित गाळले जात नाहीत. यामुळे शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो. त्यामुळे पेशींचे नुकसान होते आणि मेलानोसाइट्स सक्रिय होतात. त्यामुळे काही वेळा हे डाग शरीराच्या अनपेक्षित भागांवरही दिसू लागतात.
टीप: या लक्षणांचा सामना करत असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. लिव्हर फंक्शन टेस्ट्सच्या माध्यमातून लिव्हरची कार्यक्षमता तपासली जाऊ शकते.
त्वचेवरील डार्क स्पॉट्स आणि लिव्हरचा काही संबंध आहे का?
होय, लिव्हर योग्य प्रकारे कार्य करत नसल्यास शरीरात विषारी पदार्थ साचतात आणि त्वचेवर डार्क स्पॉट्स वाढू शकतात.
लिव्हरशी संबंधित डार्क स्पॉट्स कसे ओळखायचे?
हे डाग अचानक दिसतात, रंगाने गडद राखाडी किंवा मातीसारखे असतात आणि चेहरा, तळहात किंवा जीभेवर दिसू शकतात.
लिव्हर कमजोर झाल्याने त्वचेवर काळेपणा का वाढतो?
लिव्हर हार्मोन्सचे संतुलन राखतो. त्याच्या कार्यात बिघाड झाल्यास मेलानोसाइट्स जास्त सक्रिय होतात आणि त्वचा काळवंडते.
लिव्हर तपासण्यासाठी कोणती चाचणी करतात?
‘लिव्हर फंक्शन टेस्ट’ (LFT) च्या माध्यमातून लिव्हरची तपासणी केली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.