Sakshi Sunil Jadhav
लांबसडक, घनदाट आणि चमकदार केस हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. पण आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, प्रदूषणामुळे आणि चुकीच्या केअरमुळे केसांची नैसर्गिक चमक कमी होते.
केस कोरडे पडणे, तुटणे, गळणे किंवा दोन टोकांचे होणे हे आज बहुतेक महिलांचे सामान्य प्रश्न झाले आहेत. पार्लर ट्रीटमेंटऐवजी, एकदा घरच्या घरी एलोवेरा आणि नारळ तेलाने बनवलेला नैसर्गिक हेयर मास्क वापरून बघा.
२ टेबलस्पून एलोवेरा जेल, १ टेबलस्पून नारळ तेल, १ टीस्पून कॅस्टर ऑईल, काही थेंब लिंबाचा रस इ.
एका स्वच्छ बाऊलमध्ये एलोवेरा जेल घ्या. त्यात नारळ तेल आणि कॅस्टर ऑईल घाला. त्यानंतर काही थेंब लिंबूरस मिसळा आणि हे मिश्रण फेटून स्मूद, क्रीमी पेस्ट तयार करा.
मास्क लावण्याआधी केस व्यवस्थित कंगव्याने विंचरा. गुंता काढल्याने मिश्रण केसांवर समान पसरते आणि परिणाम जास्त चांगला होतो.
हेयर ब्रश किंवा हातांच्या मदतीने हा मास्क स्काल्पपासून केसांच्या टोकांपर्यंत नीट लावा. संपूर्ण केसांची लांबी झाकली गेली पाहिजे.
मास्क लावल्यानंतर सुमारे ३० ते ४० मिनिटे केस तसेच ठेवा. जेणेकरून मिश्रण स्काल्पमध्ये व्यवस्थित शोषले जाईल.
नंतर कोमट पाण्याने आणि हलक्या सल्फेट-फ्री शॅम्पूने केस धुवा. शेवटी हलका कंडिशनर लावा.
सर्वोत्तम परिणामांसाठी हा मास्क आठवड्यातून १ ते २ वेळा वापरा. नियमित वापराने केस होतील रेशमी, मऊ आणि चमकदार.