Sakshi Sunil Jadhav
गरमागरम, टम्म फुगलेली आणि मऊ चपात्या खाण्याचा आनंदच काही वेगळाच असतो. पण अनेकदा चपात्या न फुलणे, कडक किंवा कोरड्या होणे ही समस्या प्रत्येक स्वयंपाकघरात दिसते. अशावेळी काही साध्या टिप्स लक्षात ठेवल्या तर चपाती फुगेल, नरम आणि चविष्ट बनेल.
चपात्यांसाठी मैदा नाही तर चांगल्या कॉलीटीचे गव्हाचे पीठ वापरा. पाणी थोडं-थोडं ओतत मळा. खूप घट्ट किंवा पातळ पीठ टाळा. kitchen tips
थोडं तेल घातल्याने पीठ मऊ राहतं आणि चपात्या लाटताना फाटत नाहीत. हेच पोळ्यांना लुसलुशीत बनवतं.
पीठ मळून कमीत कमी १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा. यामुळे ग्लूटेन विकसित होतं आणि चपाती सहज फुलते.
जास्त पातळ किंवा जाड चपात्या फुलत नाहीत. म्हणून चपाती समान जाडीची आणि गोलसर असावी. लाटताना हलक्या हाताने लाटा.
तवा फार गरम किंवा थंड नसावा. मध्यम आचेवर ठेवलेला गरम तवा चपात्या फुलवण्यासाठी योग्य असतो.
पहिली बाजू हलक्या तपकिरी डाग येईपर्यंत शिजवा आणि मग उलटा. जास्त वेळ ठेवला तर चपाती कोरडी होते.
दुसरी बाजू भाजताना हलक्या कपड्याने किंवा चमच्याने दाब दिल्यास चपाती फुलते आणि आतमध्ये वाफ तयार होते.
पोळी भाजून झाल्यावर लगेच तुपाचा लेप दिल्यास ती मऊ राहते आणि कोरडी होत नाही. पोळ्या झाल्यावर ताटात ठेवताना त्या झाकून ठेवा. त्यामुळे वाफ टिकते आणि पोळ्या दीर्घकाळ मऊ राहतात.