Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ असून ते जीवनातल्या विविध अडचणींवर भाष्य करत असतात. सल्ले देत असतात.
चाणक्यांचा मते तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला खूप जीव लावत असाल, प्रेम करत असाल आणि ती व्यक्ती तुम्हाला कामापुरती वापरत असेल तर तुम्ही पुढील सल्ले वाचले पाहिजेत.
आचार्य चाणक्य सांगतात की, चांगले असणे ही तुमची ताकद आहे, कमजोरी नाही. खूप जास्त नम्रपणा दाखवला की लोक तुम्हाला गृहीत धरतात आणि वापर करून घेतात.
प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावी. कोणावरही जास्त अवलंबून राहू नका आणि प्रत्येकाशी एकसारखे वागू नका.
चाणक्य सांगतात, जो फक्त गरजेच्या वेळीच तुम्हाला विचारतो, तो खरा मित्र नाही. असा व्यक्ती तुमच्या भावना नाही तर तुमचा उपयोग बघतो.
जे लोक तुमचं मन दुखवतात किंवा वारंवार तुमचा वापर करतात त्यांच्यापासून लांब राहा. नाहीतर ते तुमचा आत्मविश्वास आणि शांतता दोन्ही घालवतील.
जर एखादा माणूस तुमचा आदर करत नाहीतर त्याच्या सहवासात राहणे म्हणजे स्वतःचा अपमान आहे. अशा नात्यांपासून हळूहळू दूर जा.
नेहमी हो म्हणणारा माणूस इतरांच्या वापराचा विषय बनतो. चाणक्य सांगतात, गरज असेल तेव्हा नाही म्हणा त्याने तुमचे वर्चस्व वाढेल.
चाणक्य म्हणतात, प्रत्येक नातं निभावणं आवश्यक नसतं. विशेषतः ते जे तुम्हाला भावनिक किंवा मानसिक त्रास देतं. स्वतःसाठी योग्य निर्णय घ्या.