Bhakri Tips: भाकरी लगेच कडक होते? पिठात घाला फक्त १ चमचा 'हा' पदार्थ, दिवसभर राहील मऊ

Sakshi Sunil Jadhav

भाकरीची रेसिपी

दररोजच्या जेवणात भाकरी असतेच, पण अनेकदा भाकरी बनवल्यानंतर काही वेळातच ती कडक होते. त्यामुळे खाण्याचा आनंदच कमी होतो.

how to keep bhakri soft | google

तुम्हाला माहीतीये का?

फक्त हा १ चमचा घरगुती पिठात घातल्यास भाकरी दिवसभर मऊ राहते. तुम्हाला ही शिळी झाल्यावर खाता येऊ शकते.

how to keep bhakri soft

भाकरी कडक का होते?

भाकरी लगेच कडक होण्याचे मुख्य कारण म्हणजे पिठात ओलावा कमी असणे आणि मळताना पुरेसे पाणी न वापरणे. काही वेळा जास्त भाजल्यामुळेही ती कोरडी होते.

bhakri recipe

सिक्रेट टिप

फक्त १ चमचा तेल किंवा दुधाची साय पिठात घातल्याने भाकरी मऊ राहते. हा पदार्थ पिठात ओलावा टिकवतो आणि भाकरी मऊ राहते.

bhakri recipe

पाणी कोमट वापरा

भाकरीचे पीठ मळताना थंड पाण्याऐवजी कोमट पाणी वापरल्यास पिठाची लवचिकता वाढते आणि भाकरी फुगते तसेच मऊ राहते.

bhakri recipe

थोडे तूप घाला

पिठात थोडे मीठ आणि १ टीस्पून तूप घातल्यास भाकरीची चव आणि मऊपणा दोन्ही वाढतात.

bhakri recipe

पीठ झाकून ठेवा

मळलेले पीठ १५-२० मिनिटे झाकून ठेवल्यास ते नीट फुलते आणि भाकरी जास्त मऊ होते.

bhakri recipe

गॅस मध्यम ठेवा

भाकरी भाजताना फास्ट फ्लेमवर न भाजता मध्यम आचेवर भाजल्यास ती मऊ राहते आणि कोरडी होत नाही.

bhakri recipe | google

भाकरी झाकून ठेवा

भाकरी भाजून झाली की लगेच झाकण ठेवून ठेवा. त्यामुळे वाफ टिकून राहते आणि भाकरी जास्त वेळ मऊ राहते.

bhakri recipe | google

NEXT:  थोडं तिखट, झणझणीत आणि घरगुती चवीचं काहीतरी खायचंय? मग ही मराठवाडा स्टाईल कुरडई भाजी होऊन जाऊदेत

Kurdai Bhaji | google
येथे क्लिक करा