Sakshi Sunil Jadhav
कुरडईची भाजी महाराष्ट्रात सर्वत्र केली जाते, पण मराठवाड्यात तिचा तिखट आणि मसालेदार अवतार खास लोकप्रिय आहे.
एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात कुरडईचा चुरा १५ ते २० मिनिटे भिजवून ठेवा. नंतर पाणी निथळून घ्या.
मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर आणि जिरे घालून बारीक पेस्ट तयार करा.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालून छान फोडणी द्या.
फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा घालून तो सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
आता त्यात तयार केलेली पेस्ट घालून चांगली परता. लसणाचा कच्चा वास गेल्यावर पुढची पायरी करा.
चिरलेला टोमॅटो घालून एक ते दोन मिनिटं परतून घ्या, म्हणजे मसाला एकजीव होईल. आता भिजवलेल्या कुरडया मसाल्यात घालून सगळं नीट मिसळा.
मीठ घालून झाकण ठेवून काही मिनिटं वाफ आणा. शेवटी अर्ध्या लिंबाचा रस घाला.
वरून कोथिंबीर टाकून गरमागरम कुरडईची भाजी पोळी, भाकरी किंवा फुलक्यासोबत सर्व्ह करा.