Sakshi Sunil Jadhav
गोव्यातील खाद्यसंस्कृती आपल्या खास चवीने प्रसिद्ध आहे. त्यातीलच एक पारंपरिक आणि तोंडाला पाणी सुटेल अशी डिश म्हणजे गोवन स्टाईल आंबट बटाटा.
हलकं आंबट, थोडं तिखट आणि नारळाच्या चवीने भरलेला हा पदार्थ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खावासा वाटतो.
४ ते ५ बटाटे स्वच्छ धुवून सोलून त्याचे उभे काप करून घ्या.
थोड्या पाण्यात चिंच भिजवून कोळ तयार करा. यामुळे आंबटपणा मिळेल.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि मेथी दाणे घाला. मोहरी तडतडली की बटाटे टाका.
बटाटे थोडे परतून झाकण ठेवून शिजवून घ्या.
मिक्सरमध्ये ओला नारळ, हिरवी मिरची, काळी मिरी, धणे घालून पेस्ट बनवा.
शिजलेल्या बटाट्यांमध्ये चिंचेचा कोळ आणि लाल तिखट घालून एकजीव करा. तयार केलेली खोबरं-पेस्ट घालून मिश्रण नीट एकत्र करा.
थोडी साखर आणि मीठ घाला. शेवटी चिरलेली कोथिंबीर मिक्स करा. फक्त एक वाफ काढून गरमागरम भातासोबत किंवा पोळीबरोबर सर्व्ह करा.