children yandex
लाईफस्टाईल

तुमच्या मुलांचा स्क्रीन टाईम अधिक आहे? तर या आजाराचे ठरू शकतात बळी

गेल्या दशकात जगभरात अनेक प्रकारच्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्याचा परिणाम सर्व वयोगटातील लोकांवर होताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या दशकात जगभरात अनेक प्रकारच्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्याचा परिणाम सर्व वयोगटातील लोकांवर होताना दिसत आहे. यात लहान  मुलानं देखील समावेश आहे. अलिकडच्या वर्षांत मुलांमध्ये टाइप 1 मधुमेहासह हृदयविकार, श्वसन रोगाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.  एका अभ्यासात, आरोग्य तज्ज्ञांनी मुलांमध्ये डोळ्यांशी संबंधित आजर वाढण्याबाबत सावधगिरी बाळगली आहे.

ब्रिटीश जर्नल ऑफ ऑप्थाल्मोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जगभरातील मुलांची दृष्टी हळूहळू खराब होत आहे.  तीनपैकी एका मुलास मायोपियाचे निदान केले जात आहे. अशी स्थिती ज्यामध्ये दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसू शकत नाहीत.  या अहवालात आरोग्य तज्ञांनी सर्व लोकांना सतर्क केले आहे आणि सांगितले आहे की, जर या समस्येचे प्रमाण असेच वाढत राहिले आणि प्रतिबंधात्मक उपाय केले नाहीत तर येत्या २५ वर्षात ही समस्या जगभरातील लाखो मुलांना हा आजार होऊ शकतो. २०५०पर्यंत ४० टक्के मुले या डोळ्यांच्या समस्येला बळी पडू शकतात.मुलांमध्ये वाढत्या मायोपियाच्या समस्येची कारणे आणि प्रतिबंध याबद्दल जाणून घेऊया.

मायोपिया समस्या -

मायोपियाला जवळचा दृष्टी दोष म्हणतात. ज्यामध्ये आपण जवळच्या गोष्टी स्पष्टपणे पाहू शकता.परंतु दूरच्या गोष्टी पाहण्यास त्रास होतो. मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये मायोपियाच्या घटनांमध्ये गेल्या ३० वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. त्याची एकूण प्रकरणे १९९० मध्ये २४ टक्के होती, जी २०२३ मध्ये वाढून ३६ टक्के झाली आहेत. 

चीनच्या सन यत-सेन विद्यापीठातील संशोधकांनी सर्व सहा खंडांतील ५० देशांमधील ५.४ दशलक्षाहून अधिक मुले आणि किशोरवयीन मुलांचा समावेश असलेल्या २७६ अभ्यासांच्या निकालांचे विश्लेषण करून त्यांचे निष्कर्ष काढले. 

मायोपियाची प्रकरणे का वाढत आहेत?

या अभ्यासात असे आढळून आले आहे की, मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये ही समस्या यापूर्वीही दिसून येत होती. कोविड लॉकडाऊन दरम्यान, मुले घरामध्ये आणि मोबाईल-लॅपटॉप सारख्या स्क्रीनवर जास्त वेळ घालवत असल्याने त्यांच्या दृष्टीवर परिणाम झाला आहे.  मायोपिया ही एक गंभीर समस्या असू शकते, ज्याची वेळीच काळजी न घेतल्यास किंवा उपचार न केल्यास, दृष्टी कमी होऊ शकते.

मायोपियामुळे होणारी समस्या -

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बालपणातील मायोपिया ही केवळ चष्म्यावरील अवलंबित्वाची समस्या नसून त्यामुळे काचबिंदू आणि रेटिनल डिटेचमेंट यासारख्या डोळ्यांच्या इतर आजारांचा धोकाही वाढतो.  काही अभ्यासांचा अंदाज आहे की २०५०पर्यंत जगातील जवळजवळ निम्मी लोकसंख्या, मुले वगळता, मायोपियाने ग्रस्त असू शकतात.  भारतातही लहान मुलांमध्ये मायोपियाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.  

बहुतेक प्रकरणांमध्ये, मायोपियाचे निदान बालपणात होते.  या समस्या केवळ डोळ्यांपुरत्या मर्यादित नसून त्यामुळे मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होण्याचा धोका असतो.

स्क्रीनवर जास्त वेळ घालवणे धोकादायक आहे -

नेत्ररोग तज्ज्ञांच्या मते, स्क्रीन टाइममुळे लहान मुले आणि तरुणांमध्ये मायोपियाचा धोका पूर्वीपेक्षा खूपच वाढला आहे.  स्मार्ट डिव्हाइस स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्याने ३० टक्क्यांनी मायोपियाचा धोका  वाढतो. याच बरोबर संगणकाच्या अतिवापरामुळे हा धोका जवळपास ८० टक्क्यांपर्यंत वाढला आहे.  मुलांचा स्क्रीन टाइम कमी करणे सर्वात महत्वाचे आहे.

Edited by - अर्चना चव्हाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT