Bachelor Party : खास मित्र-मैत्रिणांना तुम्हाला बॅचलर पार्टी द्यायची का? तर बकेट लिस्टमध्ये 'या' बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन्सचा समावेश करा

Bachelor Party destinations: आज आपण बॅचलर पार्टीसाठी साजरी करण्यासाठी काही बजेट फ्रेंडली डेस्टिनेश पाहणार आहोत.
Bachelor Party destinations
Bachelor PartySaam Tv
Published On

लग्नसराई सुरू झाली असून प्रत्येकजण आपल्या खास दिवसाच्या तयारीत व्यस्त आहे.  लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो, ज्याला खास बनवण्यासाठी लोक खूप प्रयत्न करतात.  लग्न समारंभ अनेक दिवस अगोदर सुरू होतात आणि आणखी काही दिवस सुरू राहतात.  बॅचलर पार्टी ही या उत्सवाची सुरुवात मानली जाते.  काही काळापासून याची क्रेझ वधू-वरांमध्ये झपाट्याने वाढू लागली आहे.  हा एक प्रसंग आहे जेव्हा वधू आणि वर लग्नापूर्वी त्यांच्या मित्रांसोबत अनेक संस्मरणीय क्षण जगतात. बॅचलर पार्टीसाठी तुम्ही ही ठिकाणे निवडू शकता.

जर तुमचे खास मित्रही नजीकच्या काळात लग्न करणार आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी बॅचलर पार्टी आयोजित करण्याचा विचार करत असाल, तर या बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन्स नक्की विचार करा.

१.श्रीलंक -कमी बजेटमध्ये उत्तम बॅचलर पार्टी (Bachelorette Party) देण्यासाठी तुम्ही देश श्रीलंकेला जाऊ शकता.  हे देश त्यांच्या शांत सोनेरी किनारे, आकर्षक पर्वत आणि संस्कृतीने समृद्ध गावांसाठी ओळखले जातात आणि या वैशिष्ट्यांमुळे, हा देश(Country) बॅचलर पार्टीसाठी उत्तम आहे.

२.भूतान

भूतान हा भारताचा आणखी एक सुंदर शेजारी देश आहे, जो स्वस्त पर्यटनासाठी ओळखला जातो.  या बजेट फ्रेंडली डेस्टिनेशनमध्ये तुम्हाला अनेक सुंदर दृश्ये पाहायला मिळतील.  तसेच तुम्ही हिमालयाच्या पर्वतरांगा, शांत रिसॉर्ट्स आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

३. थायलंड

थायलंड देखील बॅचलर पार्टीसाठी एक उत्तम डेस्टिनेशन ठरेल.  बेटे, शांत समुद्रकिनारे, स्नॉर्कलिंग, खरेदी आणि बजेट-अनुकूल वातावरण यामुळे बॅचलर पार्टीसाठी हे योग्य ठिकाण आहे.

४. व्हिएतनाम

जेव्हा जेव्हा प्रवासाचा विचार केला जातो तेव्हा व्हिएतनामला लोकांची पहिली पसंती असल्याचे म्हटले जाते.  सुंदर समुद्रकिनारे, आकर्षक वास्तुकला आणि अप्रतिम संस्कृतीमुळे हे बॅचलर पार्टीसाठी योग्य ठिकाण ठरेल.

५. बाली

बाली हे जगभरातील पर्यटनासाठीही आवडते ठिकाण आहे.  स्वच्छ पाणी, सोनेरी समुद्रकिनारे आणि परवडणाऱ्या किमतींमुळे तुम्ही येथे संस्मरणीय बॅचलर पार्टीचा आनंद घेऊ शकता.

६.मलेशिया

बॅचलर पार्टीसाठी मलेशिया देखील एक उत्तम ठिकाण आहे.  तुमची पार्टी संस्मरणीय बनवण्यासाठी इथले खाद्यपदार्थ, खरेदी, मनोरंजन पुरेसे आहे. कमी बजेटमध्ये तुम्ही इथे खूप मजा करू शकता.

Bachelor Party destinations
New Year सेलिब्रेशनचा प्लॅन करताय?, तुमच्या नजीकच्या 'या' शहरात करा सुट्ट्या एन्जॉय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com