Chetan Bodke
सध्या अनेक लोकं न्यू इयर किंवा ख्रिसमससाठी फिरण्याचा प्लॅन करीत आहेत.
देशात असे काही ठिकाण आहेत, त्या ठिकाणी तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता किंवा ख्रिसमसनिमित्त भेट देऊ शकता.
आज आम्ही तुम्हाला देशातील असे काही ठिकाणं सांगणार आहोत, या ठिकाणी तुम्ही ख्रिसमसनिमित्त भेट देऊ शकता.
तुम्ही शिमलाला भेट देऊ शकता. शिमल्यामध्ये रिज, जाखू मंदिर, चैल, कुफरी, नरकंडा या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.
दिल्ली जवळील मसूरीमध्येही सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी जाऊ शकता. मसूरी लेक, केम्पटी फॉल्स सह अनेक ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.
मनालीमध्ये तुम्ही ख्रिसमिसनिमित्त अनेक हिल स्टेशनला भेट देऊ शकता. इथे तुम्ही स्नोबोर्डिंगसोबत स्कीइंगसारखे उपक्रम करु शकता.
शिलॉंगमध्ये बहुसंख्य ख्रिश्चन धर्मीय आहेत. २५ डिसेंबरला याठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये येशु ख्रिस्तांचा जन्म साजरा करतात.
उत्तराखंडच्या कुशीत वसलेले हे ठिकाण खूप सुंदर आहे. तुम्ही येथे तलाव, धबधबे, नैना देवी मंदिर, हनुमान गढी सारख्या अनेक ठिकाणी भेट देऊ शकता.
राजस्थानमधील जयपूरमध्ये अनेक पर्यटक ख्रिसमसनिमित्त धमाल मस्ती करण्यासाठी जातात. येथील मुख्य आकर्षण म्हणजे किल्ला. उंट सवारी, हवा महल, सिटी पॅलेस इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकता.
तामिळनाडूमधील ऊटी शहरामध्ये फिरण्यासाठी खूप सुंदर ठिकाण आहे. बोटॅनिकल गार्डन, एमराल्ड लेक, थ्रेड गार्डनसारख्या ठिकाणी भेट देऊ शकता.
गोव्यामध्येही ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पर्यटन स्थळे, चर्च आणि घरे इत्यादी ठिकाणी विद्युत रोषणाई करत धुमधडाक्यात सण साजरा केला जातो.