Chetan Bodke
‘का रे दुरावा’ फेम अभिनेत्री सुरुची अडारकरने पियुष रानडेबरोबर ६ डिसेंबरला लग्नगाठ बांधली.
सुरुची आणि पियुष यांच्या लग्नसोहळ्याला दोघांचेही नातेवाईक आणि काही कलाकार मंडळी उपस्थित होते.
नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर मराठमोळ्या अंदाजामध्ये खास फोटोशूट केले आहे.
सुरूचीने शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये, मोरपंखी रंगाच्या नऊवारी साडीत खास फोटोशूट केले आहे.
अभिनेत्रीने मोरपंखी रंगाच्या नऊवारी साडीवर जांभळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान करत सुंदर फोटोज् शेअर केले आहेत.
‘Love & Peace’ असे कॅप्शन देत सुरुचीने नऊवारी साडीतील फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्रीचा हा मराठमोळा लूक नेटकऱ्यांना प्रचंड भावला असून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहे.
झी मराठीवरील ‘का रे दुरावा’ या मालिकेतून सुरुची घराघरात लोकप्रिय झाली.
नुकतीच सुरुची ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसली होती.