त्वचेचे सौंदर्य जपणे प्रत्येकाला आवडते. त्यासाठी आपण अनेक उपाय करतो. रोजच्या धावपळीमुळे त्वचा टॅन होते. अशावेळी महिलावर्ग ब्यूटी पार्लरमध्ये धाव घेतात. पण फक्त चेहऱ्याचे टॅन काढून उपयोग नाही. आजकाल मानेवरही मोठ्या प्रमाणात टॅनिंग होते. पण मानेकडे सहसा कोणाचे लक्ष जात नाही. त्यामुळे हा मानेचा काळेपणा वाढतच राहतो. मानेवरील घाण आपल्या एकंदर सौंदर्यावर वाईट परिणाम करते. मग हे टॅनिंग लपवण्यासाठी महिला दुपट्टा, स्कार्फचा वापर करतात.
मान काळी पडण्याची कारणे
मानेवर मळ साचणे
सतत केस खुले ठेवणे
मानेवर टॅनिंग होणे
हार्मोनल इम्बॅलन्स
घरगुती उपाय
लिंबू आणि काकडी दोन्ही पदार्थ त्वचेवरील टॅनिंग घालवण्यास मदत करतात. या पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. लिंबूच्या रसात काकडी घालून ती मानेवर घासल्यास मानेचा काळपटपणा दूर होतो. सर्व घाण निघून जाते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी, कार्बोहाइड्रेट मोठ्या प्रमाणात आढळतात. जे त्वचेची घाण काढण्यास मदत करतात.
बटाट्याची सालं काढून मानेवर चोळा आणि थोड्या वेळाने मान स्वच्छ धुवून घ्या. बटाट्यातील पोषक घटक त्वचेचा काळेपणा घालवण्यास मदत करतात.
एका वाटीत नारळाचे तेल आणि लिंबाचा रस टाकून हे मिश्रण मानेला लावा. १० ते १५ मिनिटे झाल्यावर मान स्वच्छ धुवून घ्या.आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास लवकर परिणाम दिसेल.
बेसन, हळद, लिंबू रस, दूध, गुलाबपाणी घालून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट मानेला ३० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर मान स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हळद ही टॅनिंग कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. गुलाबपाणी त्वचेचे आरोग्य सुधारते.
दातांचे आरोग्य जपणारी टूथपेस्ट मानेचा काळेपणाही दूर करते. यासाठी एका भांड्यात टूथपेस्ट आणि लिंबाचा रस , बेकिंग सोडा मिसळून तयार झालेली पेस्ट मानेला लावा. ही पेस्ट सुकल्यावर लिंबाची साल यावर चोळा आणि मान स्वच्छ करा.
डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.